दिवंगत पंतप्रधान,कवी अटलबिहारी वाजपेयी यांची 98 वी जयंती 25 डिसेंबर 2023 रोजी होऊन गेली. या निमित्ताने मुंबई येथील दैनिक शिवनेर ने काल मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात “अटल काव्य संध्या” आयोजित केली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ माजी खासदार तथा अटलबिहारी वाजपेयी यांचे जवळचे सहकारी डॉ आर के सिन्हा हे होते. यावेळी बोलताना त्यांनी अटलजींच्या अनेक आठवणी सांगून त्यांच्या काही कविता सादर केल्या.
यानंतर सर्वश्री अनिल गणाचार्य, निडर जौंनपुरी, राधेश्याम मिश्र, नीलिमा राणे, राही भिडे यांनी अटलजींच्या हिंदी कविता सादर केल्या.
न्युज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी 25 डिसेंबर रोजी पोर्टल वर प्रसिध्द झालेली कवियत्री स्वाती दामले यांची “अमर अटलजी” ही मराठी कविता सादर केली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी सुरेश मिश्र यांनी केले.
प्रारंभी शिवनेर चे संपादक तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री नरेंद्र वाबळे यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमामागील भूमिका विशद केली.
या कार्यक्रमास विविध मान्यवर, रसिक उपस्थित होते.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800