Sunday, June 22, 2025
Homeसाहित्यआपला शिवाजी

आपला शिवाजी

आज शिवराज्याभिषेक दिन आहे. त्यानिमित्त ही रचना.
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक.

शिवबावरल्या वक्तव्याने
व्यथित झाले सगळे नेते
जो तो भाजे अपुली पोळी
प्रेम उमाळे सारे खोटे

शिवरायाची सांघिक शक्ती
कधी न कळली यांना
आरोपांच्या फैरी झाडत
भ्रमिष्ट करती सकल जनांना

देव देश अन् धर्मासाठी
थोर शिवाजी लढले होते
जातीमध्ये फुट पाडुनी
मते मागती आता नेते

राज्य खजिना वर्धित करण्या
आक्रमणाने लुटली सूरत
अपुला खजिना लुटण्या आता
नेते सक्षम अन् पारंगत

जरी शिवाजी इथे जन्मला
विचार त्याचे ना आचरती
सत्तेवरचे लोणी खाण्या
त्या नावाचा वापर करती

शिवरायांच्या कर्तृत्वाचा
फक्त मिरवता थोर वारसा
जरा आपल्या मना विचारा
महाराष्ट्र हा बिघडला कसा

— रचना : सुरेश शेठ. कोथरूड, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on जिचे तिचे आकाश…: १३
सौ. सुनीता फडणीस on योग : काही कविता…
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश…: १३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे
ज्ञानेश्वर वि जाचक on करवंदे
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १२
अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?