मुंबईतील कुर्ला (पूर्व) येथील केजीव्हीएफतर्फे वस्ती पातळीवर आरोग्यासाठी काम करणाऱ्या आरोग्य साथींसाठी प्रशिक्षणाचे विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व स्वास्थ संचालनालयाचे सेवा निवृत्त संचालक देविदास गोरे उपस्थित होते.
रुग्णमित्र विनोद साडविलकर यांनी मुंबईतील मनपाचे दवाखाने, सर्वसाधारण रुग्णालये, प्रसूती गृह, एचबीटी क्लीनीक, विशेष रुग्णालये, शासनाची रुग्णालये, धर्मादाय रूग्णालये, राज्य कामगार विम्याची रुग्णालये, सहकारी तत्त्वावरील रुग्णालये, विविध शासकीय योजना, मदत देणा-या संस्था, धर्मादाय रुग्णालयातील मदतीसाठीची उत्पन्न मर्यादा, टोल फ्री क्रमांक याची माहिती देऊन केजीव्हीएफच्या आरोग्य साथींच्या शंकांचे निरसन केले.
संस्थेच्यावतीने व रुग्ण मित्रांच्या साथीने प्रमुख पाहुणे देविदास गोरे व मान्यवरांचा संविधानाची प्रत, संस्था भेट चर्चा थेट पुस्तक, शाल इ. देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
भविष्यातील कल्याणकारी सामाजिक उपक्रमांना श्री देविदास गोरे यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
रग्णमित्र साथी गोविंद मोरे, रेहाना शेख, सारीका पटेल यांची विशेष उपस्थिती लाभली. केजीव्हीएफच्या विश्वस्त वर्षा विद्या विलास, सत्र समन्वयक सुनील चव्हाण व सहकारी यांच्या उत्तम नियोजनातून कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800