गुढी पाडवा हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असून साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच नवीन संकल्पना नवीन उपक्रम यांची सुरुवात केली जाते. हे आपणांस माहीतच असेल परंतु आपल्या मुलांना हे माहीत आहे का तर याचे उत्तर कदाचित नाही असे असेल कारण सध्या आपण काही सण हे पूर्वी घरात करायचे ती परंपरा पुढे चालू ठेवावी या उद्देशाने साजरे केले जातात हा एक भाग झाला दुसरी गोष्ट म्हणजे असे की विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे अशा प्रकारचे सण कदाचित साजरे केले जात नाहीत म्हणजेच सध्या ज्या प्रकारची घरं आहेत त्या घरांमध्ये गुढी उभारण्यासाठी वेगळी जागा किंवा त्या घरात तशी काही सोयच नसते हा दुसरा भाग झाला आणि या गुढी उभारण्यामागचे कारण माहीत नसणे हे ही आहेच की.
आता तुम्ही म्हणाल की गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्या पारंपारिक वेशात शोभा यात्रा निघतात की, हो निघतात आणि सांस्कृतिक आणि परंपरा टिकवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. परंतु या शोभायात्रेमध्ये सामील झालेल्या प्रत्येकास गुढीपाडव्याची माहिती आहे का तर नाही ! म्हणूनच कल्याण (पूर्व) येथील उपक्रमशील नूतन ज्ञानमंदिर कल्याण (पूर्व) शाळेमध्ये पारंपारिक गुढी उभारून त्या मागचे वैज्ञानिक तसेच पारंपारिक कथा सांगून विद्यार्थ्यांना गुढीपाडव्याचे महत्त्व पटवून दिले,
याच दिवशी शाळेमध्ये वाचनाची संस्कृती वाढीस लागावी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी पुस्तकाची ही गुढी उभारली. या वेळी इयत्ता पाचवी व सहावीचे विद्यार्थी आपल्या पारंपारिक वेशभूषेमध्ये शाळेमध्ये हजर होते त्याचप्रमाणे ढोल पथक लेझीम पथक हे ही या कार्यक्रमासाठी सज्ज होते.

आपल्या संस्कृतीचे प्रतीक म्हणजेच कलश अनेक विद्यार्थिनींनी आपल्या घरातून कलश सजवून आणले होते. याही मुली शोभा यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या.

आमच्या शाळेची ही गुढी शाळेच्या गेट पासून शाळेत मध्ये आणण्यात आली या वेळेला लेझीम नृत्य ढोल ताशाच्या गजरात गुडीचे स्वागत करण्यात आले. याचवेळी आमच्या मुख्याध्यापिका सौ गागरे मॅडम यांच्या शुभहस्ते या गुढीची पूजा करून ती उभारण्यात आली. शाळेला समृद्धी प्राप्त व्हावी शाळेत वाचनाची परंपरा रुजावी यासाठी सर्वानी प्रार्थना केली.

शाळेतल्या विद्यार्थ्यांनी वाचनाचा संकल्प गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केला. गुढीला नैवेद्य दाखवण्यात आला गुढीपाडव्या चे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून दिले पारंपारिक गुळ, खोबरे, कडूलिंबाची पाने, धने यांचा प्रसाद बनवून तो विद्यार्थ्यांना वाटण्यात आला.
या दिवशी पुस्तक परीक्षण स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांनी आपण वाचलेल्या पुस्तका विषयी माहिती सांगितली व एक निकोप स्पर्धा पार पडली. विद्यार्थ्यांना वाचनाची अधिकाधिक गोडी लागण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्न करत असते यावर्षी हा वेगळा प्रयत्न शाळेने केला की पुस्तकांची गुढी उभारून साहित्य परंपरेची एक वेगळी ओळख करून देण्याचा शाळेचा हा प्रयत्न आहे. या उत्सवात सांस्कृतिक समितीच्या सौ मोटघरे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गागरे मॅडम व शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहभाग होता. मराठी माध्यमाच्या शाळा मराठी रूढी परंपरा आणि संस्कृती जोपासण्याचे काम जोमाने करत करत आहेत.

— लेखन : आस, कल्याण
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800