कवीचा दृष्टिकोन संवेदनशील असल्यामुळे प्रेमभावना जपत हृदयाच्या अंतर्मनातून कविता जन्माला येते, असे प्रतिपादन कवयित्री आणि गायिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी नुकतेच केले. नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारक येथे ‘पुस्तकावर बोलू काही…’ या उपक्रमात ‘हृदयरंग’ या त्यांच्या पुस्तकावर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका स्वाती पाचपांडे होत्या.
विजयालक्ष्मी पुढे म्हणाल्या की,शब्दाची ओंजळ रिती करण्यासाठी सामर्थ्य असले पाहिजे. त्यासाठी ‘स्व’चा शोध घेतला पाहिजे. माणूस प्रेमाशिवाय जगू शकत नाही. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, मीराबाई यांनी सुद्धा अभंग, कविता, गवळण यातून प्रेमगीत व्यक्त केले असून हे प्रेमाचे प्रतीक आहे. म्हणून संवेदना आणि भावना यांचा मेळ साधता आला पाहिजे.
यावेळी निवृत्त कारागृह उप अधीक्षक श्री जी के गोपाळ, श्री अजित कुलकर्णी, ॲड. मिलिंद चिंधडे यांना ग्रंथ भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री दत्तात्रय कोठावदे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास साहित्य रसिक मोठ्या उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
कवयित्री विजयलक्ष्मी गणोरकर ह्यांचे विचार पटले. इतक्या तरुण वयात मिळवलेल्या ह्या सन्माननीय पुरस्काराबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
कवयित्री विजयालक्ष्मी मणेरीकर ह्यांचे विचार पटले. इतक्या तरुण वयात मिळवलेल्या ह्या सन्माननीय पुरस्कारासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐