अरे! जिवंतपणीच खाऊ घाला
मेल्यानंतर का वाट काकस्पर्शाची
फक्त बोला चार शब्द प्रेमाचे
नसे रे अपेक्षा जास्त आमची
जीवंतपणी छळ छळ छळता
नंतर मग ताट भरभरून वाढता
नाही रे होत खाण्याची इच्छा
वाट का बघता कावळ्याची आता
मरत का नाही एकदाचे
म्हणायचे रे नेहमीच तुम्ही
पण तुम्हा लेकरांसाठी अपशब्द
नाही कधीच काढला रे आम्ही
का हा आता दिखावा
लोकांसमोर रे तुमचा
आहोत इथे तृप्त आम्ही
विचार करा तुम्ही स्वतःचा
अमर ना या जगी कुणी
मरण चुकले का कधी कुणा
थकलेल्या माय बापाला
प्रेमाने फक्त आपले म्हणा
— रचना : अरुणा गर्जे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
काकस्पर्श ही भावस्पर्शी कविता.आईवडील जीवंत असताना, त्यांचा दुस्वास करणारी मुले ते गेल्यावर दिखाऊपणाने श्राद्ध करतात.यापेक्षा जिवंतपणीच आईवडलांना आपलं म्हणा ही मार्गदर्शक कविता भावली.