जगाबरोबर हसत राहिले
दु:ख आतले जळत राहिले
सोबत न्हवती मला कुणाची
एकटीच धडपडत राहिले
तुला पाहणे ठरल्यावरती
वाट रात्रभर बघत राहिले
सत्य कळावे जगास माझे
म्हणून देवा झटत राहिले
स्वप्ने जेव्हा धूसर झाली
इच्छा मारत जगत राहिले
— रचना : सौ.गौरी शिरसाट. विक्रोळी, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800