हायकू रचना
गुरू सद्भाव
अखंडित प्रेमाचा
घालतो घाव
गुरू माऊली
धन्य ती जीवनात
मारतो फुली
गुरू नात्याने
वाम मार्गी चालतो
डसे काट्याने
गुरू महान
मुलाच्या जीवनात
ठरतो छान
गुरू अधिन
समजतो बालक
चुकवे रिन
गुरू मालक
देवरुप मानतो
शोभे चालक
मानती बाप
गुरू गृही सज्ञान
मिटतो ताप
मिळतो शाप
गुरुची विटंबना
वाढतो ताप
गुरू मारतो
चुक भूल जाणीव
तोच तारतो
शिस्तीचा फार
गुरू देई आधार
मिळे संस्कार
— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869454800