Friday, November 8, 2024
Homeबातम्याचलो, अमरावती !

चलो, अमरावती !

अमरावती शहर हे ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टींसाठी ओळखले जाते. तर अमरावती जिल्हा हा प्रामुख्याने चिखलदरा या पर्यटन स्थळा मुळे आणि मेळघाट मधील कुपोषण यामुळे प्रामुख्याने ओळखला जातो. पण अमरावती जिल्ह्याची “पर्यटन जिल्हा” म्हणून ओळख निर्माण करण्याचा स्तुत्य उपक्रम अमरावतीच्या जिल्हा माहिती कार्यालयाने केला आहे.

हा उपक्रम म्हणजे या माहिती कार्यालयाने तयार केलेले सुंदरसे ‘अमरावतीचे वनवैभव’ हे कॉफी टेबल बुक होय.

अमरावती जिल्ह्यातील वनराईने नटलेले वनवैभव, त्यातही मेळघाट परिसरातील निसर्ग वनसंपदा व वन्यजीव असा नैसर्गिक ठेव्याची समृद्धी दर्शविणाऱ्या ‘अमरावतीचे वनवैभव’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना श्री पाटील म्हणाले की, ‘अमरावतीचे वनवैभव’ या पुस्तकात मेळघाटातील नयनरम्य निसर्ग सौंदर्य, अरण्य संपन्न मेळघाटातील वन्यजीव, जैवविविधता यासह आदिवासी संस्कृती यांची उत्तम छायाचित्रासह माहिती देण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक वारसा, वनसंपदा, कोरकू बांधवांची संस्कृती, चालीरीती यांची दुर्मिळ छायाचित्रे ही कॉफी टेबल बुकची वैशिष्ट्य आहेत.

“अमरावतीचे वनवैभव” हे कॉफी टेबल पर्यटन क्षेत्राला सहाय्यभूत तसेच संदर्भग्रथ म्हणून निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. पर्यावरणीय मूल्य जाणून जीवसृष्टीचे स्वरूप आणि वनसंपत्तीचे जतन करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. यामुळे यावर आधारित पुस्तक हे महत्त्वाचे पाऊल आहे. जिल्ह्यामध्ये येणारे पर्यटक, अभ्यासक यांनाही हे पुस्तक फायदेशीर ठरणार आहे, असेही श्री. पाटील यावेळी म्हणाले.

या कॉफी टेबल बुकसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे झालेल्या, कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यास खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस उपायुक्त शिवाजी शिंदे, सागर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

या कॉफी टेबल बुकच्या निर्मितीबद्दल माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांचा पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या अभिनव उपक्रमाबद्दल न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे अमरावती जिल्हा माहिती कार्यालयाचे हार्दिक अभिनंदन.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. “अमरावतीचे वनवैभव” हे काॅफी टेबल बुक पर्यटन क्षेत्रासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.तसेच ह्यापुढचे पाऊल म्हणजे ह्यावर आधारित पुस्तक. हे पुस्तक पर्यटकांना,अभ्यासकांना मार्गदर्शक ठरेलच.

  2. अमरावती जिल्ह्यातील वनपर्यटन विषयक माहिती देणारा आणि काॅफी टेबल बुकच्या प्रकाशनाची माहिती देणारा लेख खूपच छान आहे. माहिती साठी धन्यवाद 🙏💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on मतदान करा हो मतदान…..
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण भाग : २२
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” – १२
माधुरी ताम्हणे on अनुकरणीय “आडे”बाजी !
माधुरी ताम्हणे on
माधुरी ताम्हणे on
विजया केळकर on
Manisha Shekhar Tamhane on
Shrikant Pattalwar on