अविरत, निरपेक्ष आणि सामाजिक बांधिलकी ठेऊन आयुष्यभर केलेल्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल लातूर येथील जेष्ठ पत्रकार, श्री जयप्रकाश दगडे यांना पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या दहाव्या जागतिक विज्ञान, अध्यात्म व तत्वज्ञान संसदेत एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डाॅ. वि.दा. कराड यांच्याहस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

श्री दगडे यांच्या उल्लेखनीय पत्रकरितेबद्दल आज पर्यंत त्यांना ७० हून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या या जागतिक विज्ञान, धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञान परिषदेत आयोजिण्यात आलेल्या ‘विश्वशांतीसाठी पत्रकारांची भूमिका’ ह्या विषयावरील चर्चासत्रातही श्री दगडे यांचे व्याख्यान झाले.
या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याआधी जगातील सर्व धर्मांचे प्रतिनिधीनी आपापल्या धर्मग्रंथांसह विश्वशांती दिंडीत तसेच वर्ल्ड पार्लमेंटच्या व्यासपीठावरुन संपूर्ण जगाला शांतता आणि मानव कल्याणाचा संदेश दिला. या परिषदेत जगभरातील विविध धर्मांचे प्रमुख, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, विचारवंत उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800