अंतरीचा गंध सुखवितो मना |
भक्तीचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा |
उतरला भार विश्वाचा |
विष्णूचा अवतार |
सोशिले कष्ट अपरंपार |
विठ्ठलाचा ध्यास निरंतर ||
मागीतले पसायदान |
प्रार्थना विश्व कल्याण |
सांगीतले गीतेचे ज्ञान |||
झाली विश्वाची माऊली
संजीवन समाधी |
घेतली आळंदी |
केली पावन भूमी अलंकापुरी ||||
— रचना : आशा दळवी. दुधेबावी, जि. सातारा.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800