Friday, May 16, 2025
Homeबातम्याठाणे : कथालेखन कार्यशाळा संपन्न

ठाणे : कथालेखन कार्यशाळा संपन्न

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि ऑगस्ट मीडिया अँड ट्रेनिंग या माध्यम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच नवलेखकांसाठी कथालेखन कार्यशाळा ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून ग्रंथालीचे प्रमुख विश्वस्त सुदेश हिंगलासपुरकर आणि मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे चे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुदेश हिंगलासपुरकर यांनी या पुढच्या काळातले लेखन कसे असेल यावर भाध्यी केले. तर विद्याधर ठाणेकर यांनी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथील पुस्तकांची माहिती दिली.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना लेखिका डॉ स्मिता दातार यांनी कथालेखनाचे तंत्र आणि कथेचा इतिहास यावर अतिशय विस्तृत विवेचन केले. कथेचा आरंभ, मध्य, शेवट याबद्दल सांगितले.

दुसऱ्या मार्गदर्शक हर्षदा बोरकर यांनी सुचलेला विषय कसा फुलवावा, कथा कशी बांधावी याबद्दल विस्तृत माहिती दिली. वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे त्यांनी हे सत्र फुलविले.

तर तिसरे मार्गदर्शक किरण येले म्हणाले, ”स्वतःला लेखक समजायला लागलात तर तुम्ही लेखक होणार नाही”. एखादी उत्तम कलाकृती किंवा लेखन जर आपल्या हातून घडायचे असेल तर त्यासाठी काय काय आवश्यक आहे त्यासाठी किती वेळ द्यावा लागेल आणि काही वेळ थांबावे ही लागेल याबद्दल त्यांनी विवेचन केले.

ऑगस्ट मीडिया अँड ट्रेनिंग च्या संचालिका डॉ मृण्मयी भजक यांनी कार्यशाळेची प्रस्तावना केली. तसेच शेवटी आभार प्रदर्शन केले.

या कार्यशाळेसाठी ठाणे, मुंबई, पेण, वसई, नवी मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणहून शिबिरार्थी आले होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. कथा-लेखन कार्यशाळेतील अनुभवांविषयी विस्तृत माहिती देणारा लेख वाचून आनंद झाला. सर्व संयोजक आणि निमंत्रित अतिथींचे हार्दिक अभिनंदन आणि सर्व सहभागी सदस्यांना मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
    सौ.मृदुला राजे ,जमशेदपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on स्नेहाची रेसिपी’ – १३
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : ४८
विजया वाळुंज on जशाच तसे
अरविंद विनायक ढवळे on “पद्मश्री” उदय देशपांडे
पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी on माझी जडणघडण : ४८
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम गोंधळ : संनियंत्रण आवश्यक
Pratibha Saraph on काही अलक
शितल अहेर on जशाच तसे
प्रदीप पाटील on जिचे तिचे आकाश : ८
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री मधु मंगेश कर्णिक