जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बेंगळूरू येथील विख्यात चित्रकार, शिल्पकार व स्थापत्य विशारद डॉ.पुष्पा द्रविड यांना कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा चि. कार्तिक मिलिंद उमाळकर स्मरणार्थ पुरस्कृत ‘कल्याण रत्न’. पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. कलबुरगी येथे २ मार्च रोजी झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमास त्या येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बेंगळूरू येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन करामसाप अध्यक्ष गुरय्या रे.स्वामी, कोषाध्यक्ष मिलिंद उमाळकर, कार्यवाह प्रभाकर सलगरे, बेंगळूरू विभाग अध्यक्षा दिपाली वझे, गौरवाध्यक्ष राजेंद्र पडतुरे, उपाध्यक्ष डॉ अनुराग लव्हेकर, कार्यवाह प्रतिभा टेकाडे, सहकार्यवाह नूतन शेटे, जेष्ठ कवयित्री स्नेहा घाटे, जगप्रसिद्ध आर्ट हिस्टोरीयन डॉ. दीपक कन्नल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रतिभा टेकाडे आणि नूतन शेटे यांनी डॉ.पुष्प द्रविड यांच्या कार्याचा गौरव करणारी कविता सादर केली. तर दिपाली वझे यांनी रेखाटलेले पुष्पा द्रविड व राहुल द्रविड स्कुटरवर बसलेले व्यंगचित्र भेट म्हणून दिले. डॉ.पडतुरे यांनी मातृ देवो भव पुस्तक दिले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800