“डोळे हे जुलमी गडे” हे काव्यात लिहिताना किती ही छान वाटत असले तरी जे दृष्टिहीन आहेत, ते कसे जगत असतील ? याची आपण कल्पना ही करू शकत नाही.
भारतात अंदाजे ४.९५ दशलक्ष व्यक्ती तर महाराष्ट्रात ९ लाखांपेक्षा अधिक व्यक्ती दृष्टिहीन आहेत. या पैकी अनेक व्यक्तींना एक जरी डोळा बसविला तर त्यांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. पण अजून ही ज्या प्रमाणात नेत्रदान व्हायला हवे त्या प्रमाणात ते होत नसल्याने भारतात २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा पंधरवडा “नेत्रदान जन जागरण पंधरवडा” आयोजित करण्यात येतो. या निमित्ताने जन जागरणाचे विविध कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांमध्ये अनेक संस्था, व्यक्ती सामाजिक बांधिलकी म्हणून सहभागी होत असतात.
असेच एक जन जागरण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पुणे येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ समीर दातार हे आहेत.
त्यांनी नुकताच नेत्रदानाचे महत्व सांगणारा, त्या विषयी असलेले गैर समज दूर करणारा अतिशय सुंदर, प्रभावी लघु पट बनविला आहे. हा लघुपट आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
तर मंडळी, चला तर मग नेत्रदानाचा संकल्प करू या.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800