माझेच बरोबर म्हणणाऱ्याने
कधीतरी दुसरी बाजू पहावी
एखाद्या प्रश्नाचे उत्तर प्रश्नातच सापडेल
काही वेळा उत्तरालाही प्रश्न पडेल
दुसऱ्या बाजूचे ऐकताना हसऱ्या बाजूला दुखवू नये
हसऱ्या बाजूचे सौम्य विनोद दुसऱ्या बाजूवर लादू नये
अंतर दोन्ही बाजूंमधले अलगद साधावे
एकमेकांसमोर आल्यातरी त्यांनी पलटून जावे
मजल दर मजल करत पल्ला आयुष्याचा गाठावा
दुखावले कोणी जाणार नाही म्हणून समतोल गाठावा
चूक आणि बरोबर यामध्ये अंतर आहे कमी
पाहिल्या नाण्याच्या दोन्ही बाजू की मिळते स्वतःला हमी
सुखदु:खे आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू
हातात हात घालून दोघं सोबत सोबत चालू
कारुण्याचा छटा काही अशा दाखवाव्या
ओक्साबोक्शी रडण्यापेक्षा त्या दोन थेंबात ओघळाव्या…

— रचना : सायली शेंडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सायली तुझी “दुसरी बाजू” कविता खूपच भावली. अशीच लिहीत रहा. खूप खूप शुभेच्छा