मुंबई येथील सर्वद फाऊंडेशन, महाराष्ट्र या समाजसेवी संस्थेतर्फे साहित्य, सामाजिक कार्य आणि पत्रकारितेसाठी दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
समाज कल्याणासाठी डिजिटल माध्यमाचा प्रभावी वापर करीत असल्याबद्दल न्युज स्टोरी टुडे पोर्टल चे संपादक देवेंद्र भुजबळ यांना सर्वद पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा उद्या, शनिवार, दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी अभय इंटरनॅशनल स्कूल, विक्रोळी येथे होत आहे.

सर्वद पुरस्काराच्या अन्य मानकर्यांमध्ये ज्येष्ठ पत्रकार, श्री. जगन्नाथ पाटील, समाजसेवक श्री. महेश राऊत, रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष डाॕ. आशुतोष रारावीकर- विणा रारावीकर, सुप्रसिद्ध लेखक श्री. आनंद शेट्ये आदि मान्यवरांचा समावेश आहे. तर सुप्रसिद्ध उद्योजक श्री. नरेश राऊत, ज्येष्ठ पत्रकार श्री. विजय वैद्य यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षपद सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष श्री. महादेव रानडे हे भूषविणार आहेत तर कार्यक्रमाचे अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लेखक, कवी श्री. ना. म. शिंदे आणि कवयित्रि, निवेदिका, संत साहित्याच्या तज्ञ अभ्यासक श्रीमती प्राची गडकरी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूञसंचालन प्रा डाॕ. सुचिता पाटील करणार आहेत.
समाजात उत्तुंग कार्य घडत असते, यासाठी सक्रिय कार्य करणाऱ्या उत्तुंग व्यक्तीत्वांच्या कार्याला प्रेरणा मिळण्यासाठी या पारितोषिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते असे सर्वद ठाणे जिल्हा अध्यक्ष डाॕ. अंजुषा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
सर्वद पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
आदरणीय सर जय हिंद. हार्दिक अमिनंदन सर.आदरपूर्वक
हार्दिक अभिनंदन 💐💐
आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
आपल्या शुभेच्छा मला अधिक काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देतील.
देवेंद्र सर आपले त्रिवार मनःपूर्वक अभिनंदन ! अभिनंदनाचा ! अभिनंदन !
सौ.वर्षा भाबल.
अभिनंदन💐💐
अभिनंदन सर 👏👏💐💐💐
आपणास जाहिर सर्वद पुरस्काराबद्दल मनापासून खुप खुप अभिनंदन. हा सर्वद पुरस्काराचाही गौरव आहे
खूप खूप अभिंदन
देवेंद्र भुजबळ सर, खूप अभिनंदन तुमचे
श्री.देवेंद्र सर, पुरस्कार मिळाला याबद्दल आपले मनापासून अभिनंदन.असेच पुरस्कार
मिळोत याबद्दल मनापासून शुभेच्छा.
सोमनाथ साखरे
अभिनंदन