“न्युज स्टोरी टुडे” या आपल्या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या ‘जीवनप्रवास, मी पोलीस अधिकारी, समाजभूषण २’ या लेखमाला स्वरूपात लिहिलेल्या सौ वर्षा भाबल, निवृत्त पोलीस उपअधिक्षक सुनीता नाशिककर, सौ रश्मी हेडे यांनी वेबपोर्टल च्या निर्मात्या, सौ अलका भुजबळ यांना गळ घातली की, आम्ही कुणा प्रकाशकाला ओळखत नाही, त्यामुळे तुम्हीच आमची पुस्तकं प्रकाशित करा. यातूनच जन्म झाला, न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशनचा.
भारत सरकार च्या संबंधित विभागाकडे रितसर नोंदणी करून ही प्रकाशन संस्था सुरू करण्यात आली. अलकाताई स्वतः प्रिंटर कडे तासंतास बसून प्रकाशनातील धडे गिरवू लागल्या.
याचेच फलित म्हणून या पब्लिकेशन ने अल्पावधीतच जीवनप्रवास, मी पोलीस अधिकारी, समाजभूषण २, अजिंक्यवीर, अंधारयात्रीचे स्वप्न, चंद्रकला, हुंदके सामाजिक वेदनेचे, पूर्णिमानंद (कविता संग्रह), आम्ही अधिकारी झालो ही पुस्तके यशस्वीरीत्या प्रकाशित केली आहेत.

यापैकी निवृत्त सहसचिव, श्री राजाराम जाधव लिखित ”अजिंक्यवीर” या पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा “उत्कृष्ट आत्मकथन” म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर “जीवनप्रवास” या आत्मकथनाला, “संत नामदेव उत्कृष्ट आत्मकथन पुरस्कार” मिळाला आहे.

मी पोलीस अधिकारी आणि आम्ही अधिकारी झालो या पुस्तकांचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते राजभवनात झाले. त्यांनी ही दोन्ही पुस्तके गौरविलेली आहेत. यातील “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाची पहिली आवृत्ती एका महिन्यातच संपली. या आणि “मी पोलीस अधिकारी” या दोन्हीं पुस्तकांची दुसरी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

श्री राजाराम जाधव यांच्या “हुंदके सामाजिक वेदनेचे” या पुस्तकाचे प्रकाशन, नेपाळ मध्ये तर “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाचे प्रकाशन, जपान मध्ये बुलेट ट्रेन मध्ये करण्यात आले. अशा प्रकारे प्रकाशित ९ पुस्तकांपैकी २ पुस्तकांना परदेशात प्रकाशित होण्याचा मान मिळाला.

आता, निवृत्त दूरदर्शन संचालक श्री चंद्रकांत बर्वे यांचे सत्तरीतील सेल्फी, केमन आयलंड्स मधील शिल्पा तगलपल्लेवार यांचे “मी शिल्पा, चंद्रपूर ते केमन आयलंड्स” हे आत्मकथन, प्रा डॉ विजया राऊत यांचे “महानुभवांचे मराठी योगदान” अमेरिका स्थित डॉ गौरी जोशी कंसारा यांचे २५ थोर मराठी कविंवरील समीक्षात्मक पुस्तक, मानसी चेऊलकर यांचे
“माझी नर्मदा परिक्रमा”, देवेंद्र भुजबळ यांचे “माध्यमातील माणसं” ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
या पुस्तकांविषयी बोलताना प्रकाशिका, सौ अलका भुजबळ म्हणतात, लेखकांचा विश्वास आणि पुस्तकांना मिळणारा वाचकांचा प्रतिसाद हीच आमची खरी कमाई आहे”
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
या निमित्ताने वाचकांना एक नवीन साहित्य उपलब्ध झाले.भुजबळ दांपत्याचे हार्दिक अभिनंदन.
वाचकांचा प्रतिसाद हा वाढतच आहे आणि वाढतच राहणार यात शंकाच नाही. तुम्हां दोघांना, तुमच्या ‘टुडे न्यूज स्टोरी’ पब्लिकेशन साठी आभाळा एवढ्या शुभेच्छां. वाचक वाढतच आहेत हिच खरी आपली कमाई आहे.