Friday, December 6, 2024
Homeसाहित्यन्युज स्टोरी पोर्टलने आम्हाला काय दिले ? बोलका प्रतिसाद...

न्युज स्टोरी पोर्टलने आम्हाला काय दिले ? बोलका प्रतिसाद…

नमस्कार मंडळी.
न्युज स्टोरी टुडे या आपल्या वेबपोर्टल ला आज ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या बद्दल आपण “न्युज स्टोरी पोर्टल ने आम्हाला काय दिले ?” अशी विचारणा सर्व लेखक, कवी, वाचक यांना केली होती. श्री सुनील चिटणीस, पनवेल सौ प्रतिभा पिटके, अमरावती, सौ मेघना साने, ठाणे, सौ रश्मी हेडे,सातारा यांनी तर इतके भरभरून लिहिले आहे की, ते रोज १ या प्रमाणे स्वतंत्र लेख म्हणून पोर्टल वर प्रसिद्ध करीत आहे. उर्वरित प्रतिसाद पुढे देत आहे.

आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
आपला
देवेंद्र भुजबळ – संपादक

१. आपले न्युज स्टोरी टुडे पोर्टल विचार मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ आहे. नवनवीन विकास प्रकल्प, प्रबोधन आणि नवनिर्माणाचे सर्वत्र घडत असलेले प्रयत्न आणि साहित्यविषयक घडामोडींचे शिक्षण व माहिती देणारे ते समर्थ विचारपीठ आहे. या सर्वसमावेशक चळवळीने चार वर्षे पूर्ण केली आहेत. अनंत काळापर्यंत याची वाटचाल चालत राहो हीच सदिच्छा.
मला आठवतं, काही दिवसांपूर्वी आपण पुण्यात ठाकूर सरांच्या घरी जमलो होतो. अनौपचारिक स्वरूपात झालेले ते गेट टुगेदर अगदी काल परवा झाल्यासारखे वाटत होते.
काल मी खूप घाईत होतो. आम्ही लंडनला गेलो होतो. यायला रात्र झाली.आज लिहायला घेतलं आहे. लिहिताना, निसर्गवर्णन, किंवा चरित्रचित्रण करण्याऐवजी, मी लिखाणाचा आकार मोठा न ठेवता, शक्य झाल्यास, एखादे तत्व किंवा विचार सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ते पाठवतो. यानंतरही जमेल तसे पाठवत जाईल. आपल्या पोर्टलचे धोरण व इतर तांत्रिक बाबी (उपलब्ध स्पेस, अनेक प्रकारचे साहित्य येत असेल, आलेल्या साहित्य प्रकाराला देण्याचे प्राधान्य इ. पाहून योग्य असल्यासच पोर्टलवर जागा द्यावी.
पुण्यात ज्या पध्दतीने आपण गेट टुगेदर आयोजित केले होते तसे इतरत्र काही कालावधीनंतर घेतले तर मला कळले तर, शक्य झाल्यास मी अशा काही ठिकाणी येण्याचा प्रयत्न करीन.
– प्रा. डाॅ.सतीश शिरसाठ. पुणे. ह मु इंग्लंड.

२. न्यूज स्टोरी टुडे या पोर्टलने मला काय दिले हे लिहिण्यापूर्वी मी श्री.देवेंद्र भुजबळ यांचे मनापासून आभार मानते.
त्याचं काय आहे मला कविता करण्याचा, लेख लिहिण्याचा छंद आहे. पण त्यांना प्रसिध्दी कशी द्यायची हे कांही मला माहित नव्हते आणि तशी कांही ओढही नव्हती. पण योगायोग म्हणा किंवा देवाची नव्हे देवेंद्राची करणी म्हणा,
मला एक मेसेज आला की तुमच्या कवितासंग्रहाची प्रत या संस्थेला पाठवा. तेव्हा हा मेसेज ज्या फोनवरून आला त्यांना मी काॅल केला. संस्था कार्यालयाचं टाईमिंग माहित करुन घेण्यासाठी आणि काय मजा, हा फोन होता देवेंद्र भुजबळ यांचा. त्यांनी आपणहून मला विचारलं की तुम्ही कविता लिहिता कां ? मी हो म्हटलं. त्यावर लगेच त्यांनी मला सांगितले की तुमच्या कविता मला पाठवित जा. आपले न्यूज स्टोरी टुडे हे वेबपोर्टल आहे, त्यावर मी टाकत जाईन.
खरंच सांगते हे ऐकतांच मला इतका आनंद झाला की या माणसाचे आभार कसे मानावेत तेच कळेना ! तेव्हांपासून आजपर्यंत मी अनेक कविता, लेख पाठवले आणि त्या सर्वांना प्रसिध्दी मिळाली. माझ्या सैनिकांवरच्या लेखाला कितीतरी देशांमधून प्रतिक्रिया आल्या. ही बातमीसुध्दां मला देवेंद्रजींनीच दिली. कारण ते लाईक्स वगैरे कसे द्यायचे, कसे बघायचे या बाबतीत मी अनभिज्ञ आहे.
पण खरंच, असं स्वतः खूप उंचीवर पोहोचलेला असूनही निर्मळ मनाने दुस-याचे कौतुक करणारा आजच्या जगात तरी कोणी सापडेल असं वाटत नाही. म्हणूनच पुन्हां एकदा देवेंद्रजींचे आभार ! तुमचे पोर्टल असेच भरभराटीला येवो हीच सदिच्छा व्यक्त करून आतां इथेच थांबते.
— स्वाती दामले. बदलापूर.

३. न्युज स्टोरी टुडे ने गेल्या चार वर्षांत आमच्या जीवनात बहुमोल अशा विविध साहित्यकृतीतून जो निखालस आनंद दिला त्याची तुलना करणे अजिबात शक्य नाही. आपले सर्वांगीण कार्य असेच सातत्याने सुरू ठेवावे, त्यात बहुविध लाभार्थीच्या, वाचकांच्या, उत्तमोत्तम सुचनांचा, अभिप्रायांचा परामर्ष घेत अवश्य स्वीकार करावा. ही या निमित्ताने प्रार्थना..

— सुधाकर तोरणे. नाशिक.

४. न्युज स्टोरी टुडे पोर्टलने ४ वर्षे पूर्ण केली हे खरोखरीच खूप आनंदाची गोष्ट आहे. पण ही चार वर्षे इतक्यात पूर्ण झाली यावर विश्वास बसत नाही. अगदीच काल परवाचीच गोष्ट आहे असेच वाटते की त्या दिवशी मला एका नंबर वरून मेसेज आला की मॅडम, मी देवेंद्र भुजबळ, आज साकव्य समुहामध्ये आपली कविता वाचली. खूप छान लिहिले आहे तुम्ही.अजून काही आपल्या कविता असतील तर पाठवा आम्ही त्या कविता न्युज स्टोरी टुडे पोर्टल मध्ये प्रकाशित करू. अरे बापरे हा मेसेज पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. लगेचच मी त्यांना माझ्या कविता पाठवल्या. सरांनी दुसऱ्याच दिवशी आपल्या पोर्टल वर कविता प्रकाशित केली. याचे मला खरंच खूप कौतुक वाटले की कविता पाठविल्या बरोबर सरांनी त्याला साजेसे चित्र देऊन प्रकाशित केले. तेव्हापासून मी न्युज स्टोरी टुडे पोर्टल परिवाराची सदस्य झाले.
तो काळ होता कोरोना नावाच्या महामारीचा. या रोगाने लोक अक्षरशः त्रासले गेले होते. रोगामुळे म्हणण्यापेक्षा याच्या भीतीने लोक जास्त आजारी पडत होते. त्याकाळात न्यूज स्टोरी टुडे वेबपोर्टलने लोकांना त्यांच्या कलेला वाव देण्याचा प्रयत्न केला. साहित्यिकाची लेखणी आणि वाचकांची पसंती याचे समीकरण बरोबर जमले. रोज वेगवेगळ्या विषयांवर लेखन वाचायला मिळू लागले. कथा, कविता, लेख प्रवास वर्णन अशी वेगवेगळी साहित्य मेजवानी वाचकांना मिळू लागली.
माझ्या कविता याचबरोबर कथा पण या वेब पोर्टलवर प्रकाशित करण्यात आल्या. याचबरोबर माझे काही हलकं फुलकं लेख आणि निवडक अलक यांना सुद्धा भुजबळ सरांनी पोर्टल वर झळकण्याचा मान दिला.
“न्युज स्टोरी टुडे पोर्टल ने आम्हाला काय दिले ?” याऐवजी मी हेच म्हणेन की न्युज स्टोरी टुडे पोर्टल ने आम्हाला थांबलेल्या जगात गुदगुल्या करणारे लेख वाचण्यासाठी दिले.यामुळे मरगळ आलेल्या जीवनाला नव्याने पालवी नवचैतन्याची फुटली. लिहिणाऱ्या हाताला पुन्हा एकदा त्यांच्या लेखणीला धार मिळाली. नवनवे लिखाण घडू लागले याचबरोबर वाचायला मिळू लागले.
अजून एक मला आवर्जून सांगावेसे वाटते की कधीही केव्हाही मी सरांना माझे साहित्य पाठवले तर लगेचच सर त्या साहित्याची दखल घेऊन त्याला आपल्या पोर्टल वर स्थान देतात. ही गोष्ट खरोखरच खूप अभिमानाची आहे. प्रत्येक साहित्याला मान देऊन त्याचा गौरव करुन त्याला अगदी वेळेवर प्रकाशित करणारे एकमेव पोर्टल म्हणजे न्युज स्टोरी टुडे पोर्टल.
आज या वेब पोर्टलला त्याचे चार वर्षे पूर्ण झाली याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. अशीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल होत राहो हीच सदिच्छा.
— परवीन कौसर. बेंगलोर

५. News Story Today Is a great temptation for readers.
This innovative portal is contributing many ways in our lives. It’s informative, creative n regenerative of ur ideas, giving new zeal and inspiration added with a literary touch in it. Reader can find new things here everyday that include stories on science, art, cultural developments, success stories and what not.
In addition to the above, views on developments in the world of media. U get thoughts of great personalities like Gandhi, Phule, Ambedkar and several other eminent persons on the respective occasions. Reading such occasional articles on them u develop ideas on nationalism and also build up in u universal brotherhood. U can gain poetic pleasure after reading poetry composed by the writers who write for the portal.Vociferous writings by connected authors on portal tempt you to read and i develop a taste for reading if you lack it and it gets a boost if you have it. Their writings make you think, make you act and also make you write thus unveils your hidden writing talents. In short the portal makes it’s reader enlightened, knowledgeable and communicative making more and more societal. We are lucky to have the most learned and well-versed editor Devendra Bhujbal sir and equally capable publisher Alka Bhujbal madam who are the assets for the readers. They are working tirelessly to make our portal most innovative and popular that gave it universal identity connecting with number of countries in the world.
– Ranjitsing Chandel.
Retd. District Information Officer, Yavatmal
.

६. न्युज पोर्टल ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • — चंद्रकांत बर्वे. निवृत्त दूरदर्शन संचालक मुंबई

७. नमस्कार…
न्युज स्टोरी टुडे ला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मा.श्री. देवेंद्र भुजबळ सर व अलका ताई तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.
यातील सर्वच लेख वाचनीय माहितीपूर्ण असतात.
नवनवीन माहिती समजते. तसेच यामध्ये माझे “साहित्य तारका” हे सदर सुरु आहे.. याचा खूप आनंद होत आहे.
आपणा सर्वांचे असेच प्रेम लाभत राहो. ही नम्र विनंती.
– लेखिका / कवयित्री, संगीता कुलकर्णी. ठाणे

८. आपले न्यूज स्टोरी टुडे पोर्टल आज पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट आहे. तुम्हा उभयतांचे आणि सर्व लेखक परिवाराचे मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
— प्रा डॉ किरण ठाकूर. पुणे

९. नमस्कार, मंडळी.
न्यूज स्टोरी टुडे या पोर्टलने ९० देशातल्या उत्कृष्ट लेखकांना एकत्रित जोडले आहे आणि या संयुक्त कुटुंबातील मी नवी सदस्या ! नवी असून देखील या कुटुंबात मला कधीही परकेपणा जाणवला नाही.
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या सगळ्यांना एकत्रित जोडणारे या पोर्टलचे संपादक माननीय देवेंद्र भुजबळ सर !

सरांची आणि माझी ओळख अवघ्या पंधरा दिवसापूर्वीची आणि तीही फोनवरची! या पंधरा दिवसात सरांनी मला आपल्या पोर्टलची रूपरेषा समजून लेख लिहिण्यास प्रोत्साहन दिले आणि माझ्या पहिल्याच लेखास योग्य तो आकार देऊन तो लेख पोर्टलला प्रकाशित केला.
लेख लिहिताना त्यांनी मला वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले. आणि घरच्या कामाचा योग्य तो समतोल राखून माझा लिहिण्याचा छंद जोपासण्याचा मोलाचा सल्ला दिला. या योग्य सल्लामुळे माझा अजून एक लेख पूर्ण होऊन लवकरच पोर्टलला आपल्या भेटीस येणार आहे. पहिल्या लेखाप्रमाणे याही लेखास योग्य तो प्रतिसाद द्यावा ही विनंती ! एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, गेल्या पंधरा दिवसात माझ्यातला एक वेगळा बदल मला जाणवतो आणि तो म्हणजे, रोज काय स्वयंपाक करावा याबरोबर आता कुठल्या विषयावर लेख लिहिता येईल ? हेही विचार आता माझ्या डोक्यात घोळतात. जगात रोज घडणाऱ्या घटनांकडे, मी आता “हा माझ्या लेखाचा विषय होऊ शकतो का ?” या नजरेने पाहू लागली आहे. एकंदरीत माझ्या रिकाम्या डोक्याला विचारांचे चांगले खत मिळाले आहे. माझ्यात एक आत्मविश्वास निर्माण होऊन काहीतरी अजून करू पाहायची उमेद जागी झाली आहे. निव्वळ पंधरा दिवसाच्या अनुभवातून एवढं मात्र मला नक्कीच कळलं की हे पोर्टल म्हणजे लेखकांसाठी आपले विचार लेखणीतून लेखात उतरवण्याचे उत्तम व्यासपीठ आहे. यासाठी मी भुजबळ सरांची आणि मॅडमची खूप खूप आभारी आहे. असेच या पोर्टलचे भविष्य उज्वल राहू दे आणि आपल्या कुटुंबात नवनवीन लेखकांची भर पडू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

— आश्लेषा गान. सातारा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. श्री देवेंद्र आणि सौ अलका भुजबळ यांनी, न्यूज स्टोरी टुडे हे पोर्टल रोजच्या रोज सतत उच्च दर्जाची गुणवत्ता टिकवून ठेवून ४ वर्षे चालवणे ही साधी सोपी गोष्ट नाही. नव्या पिढीला वाचनार्थ दर्जेदार लेखन मिळवून सादर करताना आपल्याला किती कष्ट पडतात याची कल्पना फार कमी लोकांना असते. ४थ्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.

  2. ह्या पोर्टलमध्ये पुस्तक परीचय प्रकाशित होत असल्याने परिचय लिहिणाऱ्या लेखकाला तर आनंद होत आहेच परंतु पुस्तक लिहिणाऱ्या लेखक , प्रकाशक , विक्रेते यांना सुध्दा त्याचा प्रत्यक्ष फायदा झाला.काही वाचनालये अशा पुस्तकांची नोंद घेऊन ते विकत घेत आहेत.या सर्वांमुळे वाचक चळवळीला प्रेरणा मिळाली आहे.

    दिलीप प्रभाकर गडकरी
    कर्जत – रायगड

  3. आ.संपादक साहेब
    आदरपूर्वक नमस्कार
    आपण मला संपादक लेखक आहेत तेवढेच ज्ञात होते.आपण तर अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी व सौ.अलका ताईसाहेब मालकिण आहात.
    कारण आपण अख्खा महाराष्ट्रातील कवी साहित्यिक आपल्या पोर्टल वर सामावून घेत आहात व तरुण तरुणी समोर यशस्वी अधिकारी आय एस आय साहेबांचे अनुभव शिदोरी व एकदातरी वाचनीय, संग्रहातील ठेवा झटपट एक दोन आवृत्त्या काढल्या आहेत.

    आपले दोघांचे, टिमचे मनापासून अभिनंदन…

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव महाराष्ट्र.
    ८७८८३३४८८२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !