१. आपल्या वेबपोर्टलला २२ जुलैला चार वर्ष पूर्ण झाली हे वाचून खुप खुप आनंद झालाय. प्रगती अशीच चालू राहो व असाच किंवा याच्याहून अधिक प्रतिसाद जगभरात मिळत राहो याच शुभ कामना. या माझ्या उशीरा पाठवत असलेल्या शुभेच्छा तुम्हा दोघांपर्यंत पोहोचवत आहे.
माझ्यासाठी तर हे पोर्टल म्हणजे “God’s Send” अशीच एक पर्वणी वाटते. माझ्यासारखे नवीन लिहू पहाणार्यांना हा एक सन्मानच आहे. मनात खूप विषयावर विचार पिंगा घालत असतात. त्यांना कागदावर किंवा आता डिजिटली कुठेतरी उतरवून टाकले कि एकदम रिकामे, हलके पण छान समाधान वाटते. त्यात भरीला कोणीतरी वाचतय हे कळले कि परमोच्च आनंद मिळतो. तुम्हा दोघांसारखे उत्तेजन देणारे लाभले तर लिहायला आणखीन उत्साह येतो. ते मला मिळाले हे मी माझे भाग्य समजते. लिखाणाचा हा नव्यानेच समजलेला, उमगलेला छंद आता जोपासून तर ठेवीनच पण वाढवून त्याचा आनंद जेवढा लूटता येईल तितका घेणार आहे. तुम्हा दोघांचा आधार, उत्तेजन मिळत राहीलच याची खात्री आहेच. असाच लोभ राहो हीच आशा करते. धन्यवाद .
- — लीना फाटक. इंग्लंड.
२. मनात आपल्या भाषेविषयीचं प्रेम आणि मनातील भावनांचा उत्कट अविष्कार जेव्हा आपला छंद म्हणून साकार होतो… ती अनुभूती खरंच अवर्णनीय असते.
काळाच्या ओघात अन दैनंदिन व्यापात आपण कुठेतरी स्वतः लाच हरवत आहोत की काय असं वाटतं…..
प्रत्येक कलाकाराची अभिव्यक्ती हि त्याची ओळख असते…….
ती ओळख कित्येक वर्षांनंतर मला ह्या पोर्टल च्या माध्यमातून पुन्हा दिल्याबद्दल अगदी मनःपूर्वक आभार……!
हे पोर्टल असेच वर्षानुवर्षे सुरु राहून माझ्यासारख्या कित्येकांना त्यांच्या मनातला, तो कुठेतरी हरवत चाललेला कोपरा उजळून निघण्यास मदत होवो..!
धन्यवाद….!- — सौ प्रीती प्रवीण रोडे. अकोला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800