नमस्कार मंडळी.
मागे मी एक वस्तुस्थितीवर आधारीत, विनोदी शैलीतील “असले पुरस्कार नको रे बाप्पा” हा लेख लिहिला होता. तो लेख आवडल्याचे खूप जणांनी सांगितले होते.
पण त्या लेखात नमूद केल्याप्रमाणे सर्वच पुरस्कार हे काही पैसे घेऊन दिले जात नाहीत तर ते खरोखरच त्या त्या व्यक्तींचे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील योगदान पाहून दिले जातात. त्यामुळे अशा पुरस्कारांचे आजच्या काळात खूप महत्व आहे आणि असे पुरस्कार ते मिळणाऱ्या व्यक्तींना निखळ आनंद देतात आणि अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देतात.

असाच एक पुरस्कार म्हणजे सर्वद फाउंडेशनच्या संचालक, प्रा डॉ.सुचिता पाटील व त्यांच्या टीम तर्फे देण्यात येणारा “सर्वद फाउंडेशन स्टार पुरस्कार” होय. उत्कृष्ट पोर्टल संपादक म्हणून गेल्यावर्षी हा पुरस्कार मला (देवेंद्र भुजबळ), तसेच सातारा येथील आपल्या लेखिका, कवयित्री सौ रश्मी हेडे यांना प्रदान करण्यात आला होता.

तर या वर्षी या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या व्यक्तींमध्येही आपल्या पोर्टल चे ३ लेखक – लेखिका यांचा समावेश आहे, ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
आपले हे ३ लेखक, लेखिका, कवयित्री पुढील प्रमाणे आहेत.
१) डॉ उषा रामवाणी गायकवाड :-
सिंधी असूनही मराठी साहित्यावर पीएचडी केलेल्या, मराठी साहित्यात अमूल्य योगदान देणाऱ्या आणि “निर्वासित” हे प्रांजल आत्मकथन लिहिणाऱ्या डॉ उषा रामवाणी गायकवाड यांना “सर्वद कवी कुसुमाग्रज” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पुरस्कार सोहळ्यात त्यांच्यावर दाखविण्यात आलेली चित्रफीत आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
२) श्री अरुण देशपांडे :-
पुणे येथील कवी श्री अरुण देशपांडे यांना “सर्वद जीवनगौरव पुरस्कार” प्रसिद्ध मालिका अभिनेत्री पूनम चांदोरकर यांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले.

३) श्रीमती राधिका भांडारकर :-
अवघ्या ७६ वर्षांच्या, बँकेतून अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या श्रीमती राधिका भांडारकर या गेली ६० वर्षे सातत्याने लेखन करीत आहेत. त्यांनाही “सर्वद कवी कुसुमाग्रज” पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

त्यांच्या कार्याची चित्रफीत आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
या वर्षी, नुकत्याच झालेल्या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून श्री. देवेंद्र खन्ना, तर प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री पूनम चांदोरकर व स्त्री रोगतज्ञ डॉ. प्रशंसा राऊत-दळवी हे मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त व्यक्तींची २ ते ३ मिनिटांची चित्रफीत मोठ्या स्क्रीनवर दाखवून मग त्यांना पुरस्कार देणे, ही संकल्पना खूप सुखद वाटली, असे एक पुरस्कारार्थी श्री अरुण देशपांडे यांनी न्यूज स्टोरी टुडे शी बोलताना सांगून पुरस्कार घेताना पुरस्कारार्थीनी आपल्या परिवारासमवेत पुरस्कार स्वीकारणे हा भावनिक तसेच अविस्मरणीय क्षण होता, असेही सांगितले.
या सोहोळ्याचे नियोजन अतिशय नेटकेपणाने केले होते.
डॉ.सुचिता पाटील, श्री ओंकार देशमुख, सौ.रुपाली राऊत आणि सर्वदच्या सर्व सदस्यांना धन्यवाद. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन
सर्वद पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐
अभिनंदन आणि शुभेच्छा सर्वद च्या सर्व मानकऱ्यांना🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्वद पुरस्काराच्या सर्वच मानक-यांचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा. भुजबळ सर, आपल्याला पुरस्कार मिळाल्याने ह्या पुरस्काराचे मूल्य वृद्धिंगत झाले आहे. आपले हार्दिक अभिनंदन 🙏💐