Wednesday, October 9, 2024
Homeसाहित्यभक्तिशास्त्र

भक्तिशास्त्र

ओळख करून घ्या हो,
नवीन अभ्यासक्रम आहे
अजब मात्र इतर शास्त्रांपेक्षा
अगदी वेगळं नाव त्याच
भक्तिशास्त्र

ठिकाण ? 🤔
निर्मळ प्रसन्न ज्याला म्हणतात ‘देवालय’
आत सर्वोत्तम एक ‘प्रशिक्षक’
ज्याला देव म्हणतात –

वेळ -?? 🤔
काही ठराविक नाही
केव्हाही, सकाळ, संध्याकाळ, रात्र
आपणच ठरवून यायचे,
जेव्हा असतो निवांत !

कालावधी – ? 🤔
ग्रहणशक्तीवर अवलंबून
किती लागतील वर्ष

फी – ? 🤔
जवळ जवळ
शिक्षण मोफतच किंवा
ऐच्छिक खर्च.

माध्यम – ? 🤔
कुठलही
जे तुम्हाला आवडतं

परिक्षा – ? 🤔
फक्त प्रॅक्टिकल
बरेच वर्षांनी एखादा पेच- प्रसंग
किंवा मोठं संकट

पुस्तकं, वह्या-? 🤔
काहिच नाही
सारं काही अदृश्य,
विचारांचं पेन आणि
वही मनाची सदृश्य

पदवी ? 🤔
खूपच महत्त्वाची
पण जी सहजी मिळतच नाही
नाव तिचे ‘वैराग्य’
कळतय ना सारं काही ?

आता तुम्हीच ठरवायचं,
कुठला क्लास नि कुठले सर ?
म्हटलं आहे सारं कठिणच !
पण घेऊयांत तर मनावर

सारं काही निश्चित करून क्लास धरला ‘ओंकारांचा’
पहिल्याच दिवशी सांगितले- निश्चय कर रोज नेमाने येण्याचा

बरेच दिवस, महिने, वर्ष – शिकवणी आहेच सुरू,
खरचं काहीतरी
कळायला लागलयं,
वाटतयं हे करू का ते करू.??? 😊

एके दिवशी खूपच ऊशिरा गेले बघते तर,
नंबर माझा एकटीचा *‘ओंकार’* म्हणाले…
बस शांत आढावा घेऊ
तुझ्या प्रगतीचा !

एक मी पहातोय,
प्रश्नांत तुझ्या अडसर आहे, तुझाच अहंम् !
पण आहे सोप्पं जर मन केलंस खंबीर,
आणि ठेवलास थोडा संयम.-

मी म्हटलं तुला वाटतयं सोप्पं
पण कळायला भाषा आहे किती जड
प्रत्येक ‘चॅप्टर’ क्लिष्ट नि अंगवळणी पडायला तर
खूपच अवघड .. 😲-

‘याला कारण तुझे मन नाही एकाग्र आणि स्थिरं चित्त !
वय- प्रश्न पहाता तुला समजावू शकतील माझ्याहून
वरिष्ठ शिक्षक फक्त !’

आता आली का पंचाईत ? कोण शोधायचा शिक्षक वरिष्ठ तुझ्याशिवाय ? 🤔

काळजी नको करूस आहेत की माझेच वडिल
*ॐ नमः शिवाय !* -🙏🏻

तेव्हापासून खरंच की मला लागली गोडी
भक्तिशास्त्राची आणि ऊठता बसता सवयच लागली
‘ॐ नमः शिवाय’ मंत्राची.!

— रचना : माणिक चिपळूणकर गानु.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments