जळगाव जिल्हा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे मतदान जनजागृतीसाठी नियुक्त केलेले ऑयकॉन मदन रामनाथ लाठी यांनी जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या दोनही म़तदार संघात प्रभावी जनजागृती केल्याबद्दल जळगाव जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी श्री आयुष प़साद यांनी मदन रामनाथ लाठी यांचा प्रमाण पत्र देऊन गौरव केला.
यावेळी उपजिल्हाधिकारी श्री अंतुर्लीकर, जिल्हा माहिती अधिकारी श्री युवराज पाटील, जिल्हा परिषदचे डेप्युटी सिईओ श्री अनिकेत पाटील, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त श्री योगेश पाटील आदी उपस्थित होते.
जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदारसंघासाठी दि. १३ मे रोजी मतदान घेण्यात आले. अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे या साठी जिल्हा प्रशासन आणि विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी स्वतः दिड महिन्यांपासून रात्रंदिवस विविध प्रकारे जनजागृती करीत असल्याने त्यांची प्रेरणा ७० वर्षांवरील नागरिकांना सुध्दा मिळत होती. त्यांच्या प्रेरणेमुळे मदन लाठी यांनी विविध ठिकाणी, विविध संस्थां त्यात शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय या बरोबर जळगाव येथे कोळी समाजातील १७ नवदाम्पत्यांचे लग्नात जावुन त्यांना आणि लग्नात आलेल्या मंडळीत जनजागृतीची सोबत शपथ दिली. या आगळ्यावेगळ्या जनजागृती बदल मदन लाठींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800