दर पाच वर्षांनी हा हक्क बजावतो,
नक्की मनापासून आम्ही आढावा घेतो ?
भावनेच्या भरात, आश्वासनांच्या माऱ्यात,
देश, प्रदेशाचा कधी विचार करतो ?
पुन्हा विचारत नाही, निवडून आलेला,
कितीतरी वेळा खरा अनुभव आला,
तरी देखील नाही उडत, लागलेली झोप,
हीच वृत्ती घात करी, चुकतसे माप,
योग्य निवडा, जो करी देशाचा विचार,
जोडतो साऱ्यांना, देई एकिवरी भर,
सुख दुःख असताना, देईल जो साथ,
तोच खरा नेता, खरी सांगतो ही बात,
स्वच्छ्ता, संस्कार ज्याच्याकडे हे आहेत,
नेतृत्वाचे गुण पहा, सोडून ती जात,
अभिमान वाटावा असा गडी निवडावा,
त्याच्यामुळे सगळ्यांचा, विकास हो व्हावा…!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800