Thursday, December 5, 2024
Homeबातम्या'मीट द ऑथर' : राजदीप सरदेसाई

‘मीट द ऑथर’ : राजदीप सरदेसाई

छ्त्रपती संभाजीनगर येथील रीड अँड लीड फाउंडेशन आयोजित ‘मीट द ऑथर’ या उपक्रमात इंडिया टुडे चे वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी नुकताच सहभाग नोंदवला.

श्री राजदीप सरदेसाई यांनी ‘मीट द ऑथर’ या कार्यक्रमाच्या ‘पेजेस कम टू लाईफ’ या सत्रात भाग घेत महाराष्ट्रात होत असलेली विधानसभा निवडणुक, मराठा व मुस्लिम आरक्षण, आरोग्य, शैक्षणीक सक्षमीकरण, शहरातील पाणी प्रश्न आदी विषयी सखोल चर्चा केली.

राजकीय घडामोडींचा सखोल अभ्यास असलेले राजदीप सरदेसाई यांनी आगामी काळात येणाऱ्या आव्हानांबद्दल सुद्धा सखोल चर्चा केली.

या वेळी मराठा आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक डॉ.राजेंद्र दाते पाटील यांनी घटनापीठाच्या अनेक न्यायनिवाड्यांचा संदर्भ देत आरक्षणाची घटनात्मक नक्की स्थिती काय आहे याचे अभ्यासु असे सविस्तर सादरीकरण केले.

या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात प्रा.गणी पटेल, प्रा.जिया, रविंद्र काळे पाटील, विधिज्ञ शेख अनिस, जमील खान, किड्स स्कुलचे इरफान, मिर्झा हरूण बेग, रीड अँड लीड फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी आदी मान्यवरांनी आपापले विचार मांडले.

मरियम मिर्झा मोहल्ला लायब्ररी सारख्या उपक्रमाद्वारे साक्षरता आणि समुदयांच्या सहभागाला चालना देण्याच्या आपल्या ध्येयावर प्रकाश टाकत मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी यांनी उपस्थितीना रीड अँड लीड फाउंडेशनच्या वाटचालीची ओळख करून दिली.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !