Wednesday, September 11, 2024
Homeबातम्यामुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सन्मानित

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सन्मानित

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा पहिला संध्या देशमुख-मुळे उत्कृष्ट ग्रंथालय/ग्रंथपाल पुरस्कार मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, नायगाव क्रास रोड, दादर, मुंबईला देण्यात आला.
वाल्मीच्या ग्रंथपाल संध्या देशमुख-मुळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार मराठवाडा साहित्य परिषदेने सुरू केला आहे. संग्रहालयाच्या संदर्भ विभागाच्या मानद सचिव श्रीमती उमा नाबर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते भगवंतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांच्यावतीने देण्यात येणाऱ्या उर्वरित तीन साहित्य पुरस्कार डॉ. अशोक राणा, (यवतमाळ),  संतोष आळंदकर ( गंगापूर) आणि लक्ष्मीकांत धोण्ड (छत्रपती संभाजीनगर) यांना यावेळी प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाले पाटील यांनी केले. डॉ रामचंद्र काळोंखे यांनी पुरस्कार विजेत्यांचा परिचय करून दिला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सर्वांनी मनोगत व्यक्त केले. मसापचे कोषाध्यक्ष कुंडलिकराव अतकरे यांनी आभार मानले. शहरातील मान्यवरांची चांगली उपस्थिती होती.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments