अष्टाक्षरी
कवयित्री कल्पना मापूसकर यांचं न्यूज स्टोरी टुडे परिवारात मनःपूर्वक स्वागत आहे.
आज आपल्या पोर्टल वर त्यांची पहिली रचना प्रसिद्ध करीत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
मंद फुंकर वाऱ्याची
जड गर्भित ढगाला
शुभ्र सरीतून येते
मग जाग पावसाला
घडा चौघडा ढगांचा
सौदामिनी रोषणाई
शालू नेसते हिरवा
दर्या, खोर्या, वनराई
सांग वेचाव्या कश्या मी
काच रुपी हिम गारा
वितळून क्षणार्धात
देह पाणी पाणी सारा
वर्षा वाटेकडे डोळे
नभाकडे चोच मान
तृप्त करी चातकाची
मेघ मल्हार तहान
राग मेघमल्हार तू
बहु ताकदीचे कोडे
आळविता तुला कुणी
पाणी पाणी चहूकडे
थिरकती धुंद पाय
मोर फुलवि पिसारा
माती गंधा पुढे फिका
पुष्प अत्तर फवारा
— रचना : कल्पना मापूसकर. मीरा रोड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप सुंदर अष्टाक्षरी काव्य रचना. कल्पनाताई, तुमचे ह्या पोर्टल वर मनःपूर्वक स्वागत. 🙏💐
पावसाबद्दल खूप सुंदर रचना केली मॅडम आपण, सुरेख