माणसाळलेली हरणे आणि हरणाळलेली माणसे !
नारा पार्क हा परिसर एक चमत्कारच म्हटला पाहिजे. आयुष्यात कधी बघितले नव्हते, असे दृश्य इथे जागोजागी दिसत होते. ते म्हणजे केवळ येथील बागेतच नव्हे तर जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे तिथे एकेकटे हरण आणि हरणांचे कळप स्वच्छंदपणे बागडत होते, चरत होते. कोणी माणूस त्यांच्या जवळ गेला तर हात लावू देत होते, हात फिरवू देत होते.
त्यांच्या सोबत फोटो काढायचे असतील तर छान पैकी फोटोही काढू देत होते. एखाद्या शहरात ही मनोहारी दृश्ये आपण बघतोय, यावर विश्र्वासच बसत नव्हता. खरंच माणूस आणि आधुनिक माणूस यांचे हे विलोभनीय नाते इथे पहायला मिळत होते. या सह जीवनाची सुरुवात कधी, कशी सुरु झाली ? याची काही माहिती मिळू शकली नाही.
याच परिसरात मोठ्ठे नारा राष्ट्रीय संग्रहालय आहे पण वेळेअभावी आम्हाला ते आतून पाहता आले नाही. पण बाहेर लावलेल्या जाहिरातींवर तिथेच चित्र प्रदर्शन ही भरत असतात, तेव्हढे कळाले.
क्रमश:
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सुरेख लेख.
माणसाळलेल्या हरणांनी, हरणींनी सर्वानाच प्रेमानी आपुलकीने जिव्हाळाने हरण….केले…