Thursday, December 5, 2024
Homeयशकथाराज्यपालांकडून श्रेयस चे कौतुक

राज्यपालांकडून श्रेयस चे कौतुक

महाराष्ट्र राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना यथायोग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून तरुण मतदान दुत श्रेयस झरकर याने तयार केलेली “लोकशाही चे जनजागरण” ही प्रभावी आणि कल्पक फेसबुक मालिका आपण आपल्या वेबपोर्टल वर १६ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केली होती.

या फेसबुक मालिकेची दखल घेऊन राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांनी पत्र लिहून श्रेयस झरकर च्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. राज्यपालांचे हे पत्र देत आहे.

अल्प परिचय

श्रेयस चे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद केंद्र शाळा, केडगाव,ता.जिल्हा अहिल्यानगर येथे तर पाचवी ते दहावी पर्यंत चे शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे श्री अंबिका विद्यालय, केडगाव येथे झाले. त्याचे पुढील शिक्षण आजोळी म्हणजे सोन‌ई, ता. नेवासा, जिल्हा अहिल्यानगर येथे झाले. त्याची अकरावी, बारावी मुळा एज्युकेशन सोसायटीचे श्री शनीश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोन‌ई येथे झाली. पुढे त्याने मुळा एज्युकेशन सोसायटी च्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनई, येथुन बी एससी (रसायनशास्त्र) ही पदवी प्राप्त केली.

पदवी प्राप्त केल्यानंतर श्रेयस ची २०१८ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने “सोशल मीडिया महामित्र” म्हणून निवड झाली. त्याच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ मार्च २०१८ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात त्याला सन्मानित करण्यात आले. तर २०१९ मध्ये तो भारत सरकारच्या जिल्हा युवा संसदेमध्ये सहभागी झाला.

२०२० मध्ये भारत सरकारच्या शहरी व आवास मंत्रालय यांच्या “प्रधान मंत्री आवास योजना” प्रश्नमंजुषा स्पर्धे मध्ये १,२५,०००+ स्पर्धक सहभागी झाले होते, यामध्ये श्रेयसने पाचवा क्रमांक पटकावला होता.२०१९ ते २०२१ मध्ये भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र संघटनेमध्ये त्याने “राष्ट्रीय युवा स्वयंसेवक” म्हणून काम केले आहे. या काळात भारत सरकारचे युवां विषयक विविध उपक्रम त्याने राबविले.

नेहरू युवा केंद्र मध्ये काम करत असताना भारत सरकारच्या फिट इंडिया या मोहिमेचा प्रचार प्रसार करण्या करिता झीरो बजेट सायक्लोथोन आयोजित केली होती…

श्रेयस सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. अगदी लहानपणापासून भारतीय प्रशासन सेवेत काम करण्याची त्याची इच्छा आहे. समाजकारण आणि राजकारण यांची त्याला विशेष आवड आहे.

घरामध्ये धार्मिक वातावरण असल्याने श्रेयस ला अध्यात्माची विशेष रूची आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तो अगदी लहानपणापासून स्वयंसेवक असल्यामुळे वक्तशीरपणा, शिस्त आणि राष्ट्र सेवा हे गुण त्याने आत्मसात केले आहे.

श्रेयसच्या आईचा बांगडीचा छोटासा व्यवसाय असून त्यावरच त्याचे शिक्षण झाले आहे. आईचे कष्ट, त्याग हेच माझे प्रेरणा स्थान आहे, असे श्रेयस अभिमानाने सांगतो. श्रेयस च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !