पर्व २ – ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत !!
नमस्कार मंडळी, 2024 सालात रेषांमधली भाषा या युट्युब चॅनेलचे नवीन पर्व श्री शैलेश देशपांडे, रिचमंड, वर्जीनिया, अमेरिका हे घेऊन येत आहे.
ह्या पर्वाचे नाव आहे “ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत”. श्री शैलेश देशपांडे यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
श्री शैलेश देशपांडे, यांनी मागच्या पर्वात त्यांना प्रसिद्ध चित्रकारांनी काढलेल्या चित्रांचा गवसलेला अर्थ मांडला. पण जगात असे अनेक चित्रकार आहेत ज्यांची चित्र आणि कला ही अतिशय उत्कृष्ट आणि वाखाणण्याजोगी आहे. तरी त्या चित्रकारांना प्रोत्साहन आणि प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने अशा काही निवडक चित्रकारांची कला आणि त्यावर श्री देशपांडे त्यांनी लिहिलेल्या कविता या पर्वात सादर करणार आहेत.
खरंतर चित्रकविता हा प्रकार मराठीत नवीन नाही, परंतु जे न देखे रवि ते देखे कवी या उक्तीनुसार त्यांना रेघोट्यांमध्ये जर आकार दिसला असेल तर तुम्हाला कदाचित तिथे ऊकार दिसला असेल. म्हणूनच या चित्रावरची कविता त्यांनी सादर केली की तिथे त्यांना दिसलेला अर्थ थांबतो आणि तुम्हाला उमगलेला अर्थ चालू होतो.
आशा आहे की तुम्हालाही या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून वेगवेगळ्या कविता ऐकून त्या चित्रांची आणि त्या चित्रांवर केलेल्या कवितांची अनुभूती मिळेल.
यूट्यूब चॅनलची लिंक इथे खाली देत आहे. कविता जर आवडल्या तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
रेषांमधली भाषा ही विलोभनीय कविता .चित्रकाव्य हा मराठीतील प्रसिद्ध प्रकार. मात्र इथे समाजासाठी अविरत कार्य करणारे आमटे कुटुंबिय यांच्या कार्याचे यथोचित वर्णन एका abstract
चित्रातून शैलेश देशपांडे आपल्या आनंदवृक्ष कवितेतून करतात.