Monday, September 9, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.

मला उत्कृष्ट संपादक पुरस्कार प्राप्त झाला, हे केवळ माझ्या एकट्याचे श्रेय नसून सर्व लेखक, कवी, सर्व संबधित आणि पोर्टल ची सुंदर सजावट करण्यासाठी सतत प्रयत्न करणारी माझी पत्नी सौ अलका असे सर्वांचे सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. हा पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल ज्या सर्वांनी कौतुक केले, अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
तसेच गेल्या सोमवारी आपल्या पोर्टल च्या लेखिका, कवयित्री शिल्पा तगलपल्लेवार गंपावार लिहीत, मी संपादित केलेल्या आणि न्यूज स्टोरी टुडे ने प्रकाशित केलेल्या
“मी शिल्पा…..
चंद्रपूर ते केमॅन आयलंड्स” या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आम्ही  नागपूर येथे असल्याने खूप गडबडीत होतो. त्यामुळे आपले लोकप्रिय वाचक लिहितात… हे सदर प्रसिद्ध करता आले नाही, या बद्दल दिलगीर आहोत. आजच्या वाचक लिहितात सदरात गेल्या २ आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.

आपला
देवेंद्र भुजबळ (संपादक)

मला प्राप्त झालेल्या उत्कृष्ट संपादक पुरस्काराविषयी प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत. या सर्वाचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार.

१. उत्कृष्ट संपादक पुरस्काराबद्दल श्री. देवेंद्र भुजबळ यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा.
— प्रकाश कुलकर्णी अहिल्यानगर.

२. देवेंद्र मित्रा पुरस्कारासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा. — शरण बिराजदार. निवृत्त दूरदर्शन निर्माता, मुंबई.

३. 👍👍देवेन्द्रजी तुम्हाला उत्कृष्टतेचा पुरस्कार जाहीर करून गौरविण्यात येत आहे, त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या दृकश्राव्य, लेखन क्षेत्रातील कौतुकास्पद योगदानाबद्दल, प्रशंसनीय कामगिरीबद्दल तुम्ही असेच अनेक पुरस्काराने सन्मानित होत रहाल हीच मनःपूर्वक सदिच्छा .💐💐💐💐💐
— वीणा गावडे.
मा.मुख्यमंत्र्यांच्या निवृत्त जनसंपर्क अधिकारी, मुंबई.

४. देवेंद्रजी तुमचं मन:पूर्वक अभिनंदन. हा पुरस्कार म्हणजे तुम्ही करत असलेल्या साहित्य सेवेचा गौरव आहे. 👍🏼 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏
— अलका वढावकर. ठाणे

५. खुपच छान अभिनंदन. — उल्हास मराठे🌹💐

मी शिल्पा….
या पुस्तकाच्या प्रकाशना बाबत प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

१. मी शिल्पा.. पुस्तक प्रकाशन सोहळा… छान झाला. अभिनंदन.
— अनिता व्यवहारे. श्रीरामपूर.

२. मी शिल्पा.. चंद्रपूर ते केमॅन आयलंड या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मी उपस्थित होते. खूप छान हा सोहळा संपन्न झाला. धन्यवाद अलका मॅडम 🙏मला निमंत्रित केल्याबद्दल. नाही तर मी एका साहित्यसंपन्न कार्यक्रमाला मुकले असते. मान्यवरांची मनोगते खूप स्फूर्तीदायक होती. उत्सवमूर्ती शिल्पा मॅडमचं मनोगत पण खूप छान होतं. मला एका छान सोहळ्याला उपस्थित रहाता आले हे माझं भाग्य. धन्यवाद परत एकदा🙏🙏😊
— वंदना कापसे. नागपूर.

३. प्रदीप दीक्षित हे माझ्या भावाचे व्याही आहेत. मागल्या आठवड्यात आमच्या घरी राहून गेलेत.
— डॉ मीना श्रीवास्तव. ठाणे

४. मी, शिल्पा… हे पुस्तक इंटरेस्टिंग दिसतंय.
— चंद्रकांत बर्वे. निवृत्त दूरदर्शन संचालक, मुंबई.

दूरदर्शन च्या निवृत्त निर्मात्या डॉ किरण चित्रे यांच्या चित्र सफर मधील “रसिकराज विद्याधर” वर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
१. संपूर्ण तासभर बसून विद्याधर गोखले यांचे उतुंग व्यक्तिमत्त्व सलग पाहिले. खुप आनंद वाटला आता प्रत्येक ध्वनिफीत. चित्रं मालिका दूरदर्शन माहितीपट संगीत कार्यक्रम पाहणे म्हणजे जुन्या स्मृतींना उजाळा. आजच्या काळातील कार्यक्रम म्हणजे नुसता थिल्लर पणा वाटतो. कालाय तस्मै नमः. हेच खर. विद्याधर गोखले यांच्या वरील चित्रफीत खुपचं छान झालीं आहे. धन्यवाद आपले आणि किरण चित्रे यांचे चित्रं सफर साठी.
— जयंत ओक ‘गप्पागोष्टी’कार, मुंबई🌹🌹

२. अत्यंत सुंदर माहिती पट….. 🙏🏻🙏🏻🙏🏻 — विनोद गणात्रा. मुंबई.

३. किरण किती गोड फोटो…. — विजया जोगळेकर धुमाळे. मुंबई.

४. चित्र सफर… लेखाच्या वर किरण ऐवजीं विद्याधर गोखलेंचा फोटो हवा.
— चंद्रकांत बर्वे. निवृत्त दूरदर्शन संचालक, मुंबई.

५. देवेन्द्रजी, किरण चित्रे ही रूईया कॉलेजमधील माझी वर्गमैत्रिण आहे. लग्न होऊनचं कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यामुळे सुरूवातीला तशी ती वर्गात अलिप्त, मितभाषी, शांतच राहायची. तो स्वभाव तिचा दूरदर्शनवर असतानाही तसाच राहिला. मी दूरदर्शनवर मंत्रीमहोदयांबरोबर मुलाखतींच्या कार्यक्रमाला गेली असताना तिची भेट होत असे. तिचं लोभस दिसणं आणि प्रसन्न हसणं अजूनही तसचं आहे, त्याचं कौतुक वाटतं. ईश्वर तिला दीर्घायुष्य देवो, कारण अजूनही खूप काही करायच्या तिच्या मनातल्या ईच्छा ती नक्कीच पूर्ण करील मला विश्वास आहे. 👍👍
किरण मुळातचं खंबीर, महत्वाकांक्षी, हुशार, जिद्दी मुलगी सुरूवातीपासूनच आहे आणि याच जिद्दीने लग्नानंतरही तीने शिक्षण पूर्ण करायला कॉलेज जॉईंन केलंचं ना ? त्याच जिद्दीने ती आजारावर सहज मात करून आपलं ईप्सित साध्य करणारचं, आपली जिद्दच आपल्याला मार्ग आणि यश देत असते हे तिने दाखवून दिलं आहे. ग्रेटचं आहे ती. 👍👍
— वीणा गावडे.
मा.मुख्यमंत्र्यांची निवृत्त जनसंपर्क अधिकारी, मुंबई.

सौ शीतल अहेर, यांनी लिहिलेल्या “जीवन म्हणजे काय ?” या लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
१. संघर्ष हा सदवर्तन कडे जाण्याचा उत्तम मार्ग असतो. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष नाही त्यांचे जीवन अळणी असते. वाचनीय लेख.
— गोविंद पाटील सर. जळगाव            

२. जीवन म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि येणारा भविष्यकाळ याची योग्य (संघर्ष, तडजोड व सुकर मार्ग) सांगड घालुन मार्गक्रमण करणे होय. सौ शितल ताईंनी जीवनाची व्याख्या अगदी सहज सोपी शब्द मालिकेची गुंफण करुन प्रस्तुत केली आहे. असेच आणखी वाचनीय साहित्य भांडार साहित्य प्रेमींना प्राप्त होवो ही सदिच्छा.
— संजय श्रीनिवास पवार. खोपोली        

३. शितल, आजचा तिचा जीवन म्हणजे काय हा लेख वाचला किती छान पद्धतीने तिने सांगितले आहे की जीवनात कोणाशी ही हेवेदावे न करता. जे आहे त्यात समाधान मानून जीवन छान, आनंदाने जगा. इथे मराठी चित्रपट चौकाठ राजा मधील एक गाणे आठवले. “हे जीवन सुंदर आहे”. खुप छान ,सुंदर लेख लिहला आहेस शितल. तुझा हा छान लेख वाचून अनेकांना जीवन कसे जगावे याची प्रेरणा मिळेल. असेच छान लेख लिहित जा. keep it up
— सौ.समीधा हसबे. खोपोली    

४. छान लेख आहे…👌🏻👍🏻 त्यातील खालील ओळी या लेखाचा सारांश आहे असं मला वाटतं… देवाने निर्माण केलेल्या जन्म आणि मृत्यू मधील रिकामी जागा म्हणजे जीवन. ती रिकामी जागा कशी भरायची ? हे आपल्या हातात असते.  
— अमोल पालेकर, अभिनेता
              
५. शीतल, खूप छान आहे तुझा लेख.अभिनंदन. लिहीत रहा  — उल्हास देशमुख सर, विरश्वर कलामंच, संचालक      

6. जीवन म्हणजे काय ? हे या लेखा अत्यंत मार्मिक भाषेत उदहारणसह उत्तम प्रकारे समजावून सांगितले आहे. 
— आश्लेषा गान. सातारा.   

७. सुरेख लिहिलं ग, प्रेरणादायी लिखाण आहे — विद्या भोयर. कामठी, नागपूर.  

  ८. खरंच खूप सुंदर लिहिलंय, जीवनात संघर्ष आणि समाधानाचे महत्त्व छान पटवून दिले 👌
— सोनल पेढे. रायपूर       

९. सौ.शितल  ! खरंच खूप सुंदर लेख लिहीला. सुख दु:ख येवो कितीही मन ना हलावे ! या प्रमाणे जीवनात समाधान मानले तरच आपण चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो. हे या लेखातून कळते.👌🏻👌🏻🌹
— सौ.रेखा पांडे. पुसद               

१०. खुप छान लेख शीतल 👌👌👏💐🍫 — अनिषा बेवारे.           
  
११. शितल लेख खूप छान झाला आहे अभिनंदन  — सौ.सुधा इतराज.  कवयित्री

१२. फारच छान व अभिनंदन गं   — सौ.जयश्री पोळ. (लेखिका, कवयित्री).            

१३. शितल लेख खूप छान झाला आहे अभिनंदन — सौ. उज्वला दीघे. कोमसाप अध्यक्षा, खोपोली.

१४. खूप छान लेख लिहीलाय, जीवन महत्व पटवून सांगितले आहे, असेच लिहित चला.
— प्रविण पुरी. (अभिनेता & दिग्दर्शक)

माधुरी ताम्हणे यांच्या “माध्यम पन्नाशी” वर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
१. दुसरा भाग ही छान 👍👌पुढच्या भागाची उत्सुकता वाढविणारा.
— रश्मी मुल्हेरकर. मुंबई.

२. खूप छान शब्दांकन. पुढील भाग वाचण्याची उत्सुकता वाढली. — अजित महाडकर. ठाणे

३. तिसऱ्या भागाची वाट पहात आहे — मृणाल मोरे. मुंबई

४. खूप मजा वाटली वाचताना. हे तुझे अनुभव खरं तर प्रत्यक्ष तुझ्या तोंडून एकत्र बसून ऐकायला जास्त छान वाटेल गं. पण मस्त. हे ही नसे थोडके.
— माधुरी ताम्हणे. तळेगाव

५. २० वर्षांच्या मैत्रीत रोज काही ऐकत होते पण आज वाचतना खूप वेगळं वाटलं खूप एन्जॉय केलं. पुढच्या भागाची वाट पहाते.
— अंजली गुप्ते.

६. खूपच exciting लेख आहे आजचा, जणू काही तू सांगते आहेस, असे वाटत होते, अगदी तुला तेव्हा कसे धडधड झाले असेल, ते पण तुझ्या लिखाणातून जाणवत होते.
— अंजली चौबळ. पुणे

राधिका भांडारकर लिखित, “माझी जडण घडण” भाग ११ वर प्राप्त झालेले अभिप्राय….
१. Radhika Tai tumcha ha lekha wachun majha balapan aathval khoopch chhan Apratim 🙏🏼🙏🏼
— मीनाताई वाघमारे. अमरावती

२. 👌🏾👌🏾 आठवणी सांगण्याची तुझी जी युनिक कला आहे त्याला तोड नाही. खरं तर  तुझ्या बहुतेक सर्व आठवणी त्यावेळच्या कोणालाही  थोडाफार फरक करून व काही नावं बदलून स्वतः:ची कहाणी म्हणून खपवता येतील. अगदी श्रावणी सोमवार शनिवारच्या खाद्यपदार्थांसह. परंतु आठवणी सारख्या असल्या तरी त्या कागदावर उतरवणं सोपं नाही.
— प्रमोद शृंगारपुरे. पुणे

३. किती छान आठवणी लिहिल्या आहेत तुम्ही ! माझं बालपण प्रथम कोकणात, रत्नागिरी ला आणि नंतर काॅलेज शिक्षण देशावर सांगली कोल्हापूरला झाले.
आजोळ बेळगाव चे.. त्यामुळे कर्नाटकाचा संस्कार घरात होता.. त्यामुळे लेखनात हे सगळं येतं अधूनमधून…
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे

४. तुझा लेख वाचल्यावर श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे 😊
— शुभदा कुलकर्णी. जळगाव

५. राधिका ताई, आपल्या बालपणीच्या आठवणीत, जडण घडणीत खूप खूप साम्य आहे. माझेच बालपण जणू तुम्ही लिहीत आहात असे वाटते.(आयते). खूप आनंद मिळतो.
— सुलभा गुप्ते. ईजीप्त.

७. नेहमीप्रमाणेच हा लेख देखील छान उतरला आहे. स्त्री लेखिकांसाठी असे विषय म्हणजे “फ्री हीट” ! आणि हा विषय माहेर व बालपण या दोन जिव्हाळ्यांनी ओतप्रोत भरलेला ! मग ठरवून सुद्धा कमअस्सल न होणारा. लहानपणीच्या आठवणी एवढ्या तपशीलवार जागवता येणे हे देखील कौतुकास्पद. छान, छान, अशाच लिहित राहा. शुभेच्छा तर चिरंतन आहेतच. तुमच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे तुमचं घर, आसपासचा परिसर, त्या गल्ल्या, भरती आलेली खाडी हे सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. हे सगळं आठवून ते जसच्या तसं शब्दात उतरवणं हे फार मोठं कौशल्य आहे.
— निवेदिता रिसबुड. पुणे

८. राधिका खूप आवडलं जडणं घडणं मधलं हे श्रावण पर्व. बऱ्याच आठवणीत साधर्म्या मुळे परत मी ही माझ्या बालपणातल्या श्रावणात रमले आणि  ताजीतवानी झाले.
— वंदना जोशी. पुणे

९. राधिकाताई खूप भावनिक शब्दांत व्यक्त झाल्या आहात. बालपणीच्या आठवणी आपल्या मनात रूंजी घालत असतात. तुमचा लेख वाचल्यानंतर मलाही श्रावण महिन्यातले दिवस आठवले. माझी आई नोकरी करूनही श्रावण महिन्यातील सण उत्साहाने साजरी करायची. सुंदर लेख.
— अजित महाडकर.

१०. खूप छान श्रावणमास. एकदम ओघवती भाषेत केले आहे वर्णन. वाचताना कुठे थांबूच नये असे वाटले. पूर्ण वाश्रावणमास अनुभवला. खूप छान 👌👌
— छायाताई मठकर. पुणे

११. Ga kaaay best lihile aahe Just amazing. Tu full Shravan ubha kelas. Just awesome
— Archana Gupta.Thane

१२. किती सुंदर लिहितेस गं ! अगदी भावुक व्हायला होतं, प्रत्येक एपिसोड वाचताना !
— आरती नचनानी. ठाणे

मस्त 👍 — पूनम मानुधने. जळगाव.

१४. Good narration abt Shrawan Mahina. — जयश्री कोतवाल. पुणे

१५. नमस्कार राधिकाताई आपलं लेखन म्हणजे एकदा वाचायला घेतलं की थेट पर्यंत बस संपेपर्यंत वाचत राहावं असं वाटतं. वाचनात पुष्कळ काही येतं असतं, पण काही चार ओळीतच वाचन कंटाळवाण होवून जात.
परंतु सतत खेळवून ठेवणारी आपली कथा, लेख, कविता कोणत्याही साहित्याचा प्रकार असो हे आपले वैशिष्ट्य आहे.
ही कथा वाचत असताना, मला माझ्या बालपणात आणून सोडले. तसं म्हटलं तर आयुष्य हे फार छोटं असतं, पण त्या आयुष्यात बालपण आपल्याला शेवटपर्यंत जगवत असतं. म्हणून हे म्हणजेच बालपण मला मोठं वाटतं.
माझ्या आयुष्यातील काहीश्या सारख्याच घटना याच्यात आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी हरवणं असतं, हे लक्षात आलं आहे.
पण मी इथे एक गोष्ट मात्र नक्कीच नमूद करेल. ते असे की ईश्वर जेही आपल्याला देतो ते आपल्या भल्यासाठी असतं. मग ते शरीर असो व परिवार असो निसर्ग असो का हे संपूर्ण चराचर सृष्टी असो.
आज डोळ्यांनी केवढं मोठं काम केलं क्या बात है…
या ठिकाणी असं म्हणायला काही हरकत नाही, ऐसा भी होता है ?…. जी बिल्कुल ऐसा भी होता है….
तुमचे हे सुंदर सुंदर अनुभव गोष्टी रुपात तुम्ही सादर करतात ते खरोखर मनास भावतात आणि आयुष्याच्या तसेच निसर्गाच्या अगदी जवळ नेऊन ठेवतात. आपल्या लेखणीला सुद्धा हृदय आहे. ते भरून येत असताना काय वेदना होत असेल याची मला पुर्ण जाणीव आहे.
असंच लिहित रहा. वाचकांच्या हृदयात भाएक विशेष स्थान सन्माननीय राधिकाताई भांडारकर यांनी मिळवले आहे यात काही नाही.
— सौ सोनाली जगताप. वांद्रे, मुंबई

१६. अप्रतिम लेख 🙏😊 — अस्मिता पंडीत. पालघर

१७. श्रावण स्पेशल….The Best….Radhikatai,you have a flair for writing !🙏🙏👌👌
— सुवर्णा वाघमोडे. मुंबई

१८. श्रावणातल्या इतक्या सुंदर आठवणी आणि प्रत्येक सणाचं वर्णन, फारच छान 👌👌👌
— किरण कालवे. मुंबई

१९. प्रिय राधिकाताई तुमचा हा श्रावणावरील लेख वाचला आणि मी सुद्धा माझ्या बालपणीत अशीच जाऊन पोहोचले.. श्रावण म्हंटला की आई आणि आजी दोघेही आठवतात .. तुमच्या सारखंच आमची आई आणि आजी सुद्धा असंच सगळं करायची.. परंपरा जपायची.. शुक्रवारचा चण्या गुळाचा प्रसाद, खीर, सोमवारच्या उपासाचे पदार्थ निरनिराळे… सगळं अगदी डोळ्यासमोरून तो आठवणीतला वीस वर्षांचा प्रवास वीस वेळा वाचला तुमचा लेख तरी थांबलाच नाही… सोबतच राहिला… अतीत कोण आमची आई पण विचारायची आणि आम्ही सुद्धा असेच मी मी म्हणत तिघी बहिणी तिच्या मागे लागायचो ..  त्या चण्या गुळाच्या नैवेद्यात सुद्धा इतकी गोडी असायची .. आई भरपूर चणे गुळ ठेवायची प्रसादात आणि आम्ही तिघी बहिणी मोठी मुठ भरून त्या काढून खायचो.. आता हा अतीत पण अतित झाला … पण तुमच्या या लेखामुळे पुन्हा ते वीस वर्षे जगले मी… खूप छान लेख.. ताई तुम्ही लिहीत राहा जडणघडण.. मला सुद्धा माझ्या बालपणात पुन्हा फेरफटका मारून आल्यासारखं वाटतं.. खरंच लिहित जा.
— मानसी म्हसकर. अहमदाबाद

“माझी जडण घडण” भाग १२ वर प्राप्त झालेले अभिप्राय….
१. अप्रतिम. दमदार आजचे लेखन. पंचकन्या फोटो मस्तच. — सुलभा गुप्ते. इजीप्त

२. Khoop chan Sadhya Saral bhashet Bimba tu lihile ahes Sadha Saral ayushya agdi gharghuti bhashet mana pasun tuze vichar mandle ahes Mala tuzi style of writing avadli. Congrats
— जयश्री कोतवाल. पुणे

३. सोमवार कधी उजाडतो आणि राधिकाचे (बिंबाचे) जडणघडण हे सदर कधी वाचते असं होत आहे सध्या. याला कारणे दोन.
१) आजच्या सदरात उल्लेखिलेली तिची मी ताई. माझी आज तिने थोडी बुर्राई केली असली तरी आमचे एकमेकींवर खूप प्रेम आहे बरं का ! त्या नकळत्या वयातल्या भावना आहेत.
२) राधिकेच्या अत्यंत प्रवाही भाषाशैलीमुळे मी रम्य स्मृतीत रमते.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका

४. नेहमीप्रमाणेच सुंदर “जडण घडण”! — आरती नचनानी.  ठाणे

५. संपूर्ण वाचलं. चांगलं लिहिलंयस. शेवट छान हृदयस्पर्शी झालाय.
— डॉ. निशिकांत श्रोत्री. पुणे

६. डोळ्यातच ढग्यांची प्रतिमा.. फार सुंदर लेख आहे.. वाचता वाचता चिकटूनच गेले मी…
— प्रा सुमती पवार. नाशिक

७. आम्ही पाच वाचताना, हाताची पाच बोट जशी एकत्र येऊन एक ताकद बनते, तशी पाच बहिणी एकत्र म्हणजे मायेचा प्रचंड सागर. वाचत असताना हातातून ठेऊ नये, असं एकसंध वाचन करावं वाटतं, हेच या लेखाचे वैशिष्ठय आहे. उषाताई यांना पाहून जुन्या आठवणी जागृत झाल्या.
मा .राधिकाताई यांचे लेखनास मनःपूर्वक सदिच्छा ….
— अरुण पुराणिक. पुणे

८. अप्रतिम👏👏 — सुवर्णा वाघमोडे. मुंबई

९. हळूहळू जडणघडण पुढे सरकत आहे आता. बहुतेक आता गाडी सुसाट सुटणार असे दिसते. छान लिहिले आहे “जडणघडण”
— छायाताई मठकर. पुणे

१०. राधिका, आत्ता वाचलं मी. रात्री निवांत वाचायचं असत मला तुझं  हे जडणघडण. अप्रतिम नेहमीप्रमाणे.
— वंदना जोशी. औंध

११. हाताची पाच बोटं सारखी नसतात, हे अगदी खरं आहे. तुम्ही पाच बहिणी तुमच्या दिसण्यात, वागण्यात, स्वभावात आणि सगळ्या  पाच बहिणींच्या पाच तर्‍हा होत्या. असणारच ना, हाताची पाचही बोटं सारखी नसतात तसेच व्यक्ती तितक्या प्रकृती परमेश्वराने प्रेम, विश्वास, श्रद्धा प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळी वेगळी ठेवलेली आहे. तुमच्या पाचही बहिणीचं आयुष्य संपूर्ण माझ्या डोळ्यासमोर उभं आहे.
तुम्हा पाचही बहिणींच्या वयातली अंतर जरी जास्त होत तरी, किती लहान पण चांगलं होतं, ते वाचताना आपल्या पाच बहिणींचा मी एक भाऊच झालो.आपण प्रत्येक लेख अतिशय सुंदर लिहित असता. आपल्या स्वतःच्या बहिणींवर लिहिलेला लेख वाचताना पुन्हा एकदा आपण सर्वजण लहान झालो आहोत.
आपण सगळे जण मिळून देवाला एक प्रश्न विचारु देवा का केलंस आम्हाला मोठं ? लहानपणच पाहिजे आहे. देवा देशील का रे एक तरी दिवस आम्हा सर्व जणांना एकत्र राहण्याचा तो क्षण. आपल्याच परिवारातला मी पांडुरंग दादा.
— पांडुरंगशास्त्री कुलकर्णी. मुंबई.

१२. रम्य ते खट्याळ निरागस बालपण 👌👌 — अस्मिता पंडीत. पालघर

इतर प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत. १. “आरती भारत मातेची” स्वतंत्र भारतात जन्मलेल्या सगळ्या भारतीयांना थोडक्यात का होईना पण स्वातंत्र्य लढ्याची झलक या लेखातून पहायला मिळते. उत्क्रुष्ट लेख ! बाकी सगळेच लेख छानच आहेत. धन्यवाद देवेंद्रजी आणि अलकाताई.
— प्रा सुनीता पाठक. छ. संभाजीनगर

२. पुणे आकाशावाणीवरून प्रसारित होणार्‍या प्रादेशिक बातम्या देणार्‍या मा. सुधा नरवणे यांचा आवाज आजही कानात आहे. त्यांच्या साहित्य संसारावरचा हा लेख वाचताना मन आठवणीत रमले. संगीताताई धन्यवाद!
— राधिका भांडारकर. पुणे

३. अगदी बरोबर वृद्धाश्रम नाहीसे झाले पाहिजे पूर्वी सारखीच एकत्र कुटुंब पद्धती सर्वत्र दिसली पाहिजे हम और हमारे बच्चे ही संकल्पना  संपुष्टात आली पाहिजे. पण आज कालच्या नोकरी वाले मुलीना हे पटत नाही त्यांना फक्त नवरा हवा असतो. सासू-सासर्‍यांची त्यांना अडचण होते. यामध्ये सूनेची काही चूक नसते यासाठी मुलगा कडक शिस्तीचा पाहिजे. मुलाने जर हे स्वीकारले नाही तर हे सर्व शक्य होईल हे सर्व आई-वडिलांच्या किंवा सूनेच्या हातात नाही तर मुलाच्या हातात आहे त्याने जर बरोबर न्याय दिला तर प्रत्येक मुलाने जर खडक राहून आपली वागणूक अशी ठेवली तर हे सर्व शक्य होईल. असे माझे मत आहे.
— अनीसा शेख. दौंड, पुणे

४. Dear Vijay I read your article, “Photo Magachi Batmi” that unveils your perseverance and obsession towards gaining this great skill of Photography and you made it. This art stimulates imagination and creation, reduce stress,renders solace. Hence it is very well said that one picture is equal to 1000 words. It’s a boon to society. As a part and parcel of the society I must thank you photographers who gave me a lot. I also thank our editor Bhujbal sir and Alka madam for publishing such unique stories on the portal. “Let your skill grow for ever” with this wishes I stop here.
— Ranjitsinh Chandel. Yavatmal.

५. आजचे लेख एकदम चेरी अॅान द केक. संस्क्रुत भाषेवर फारच अभ्यासपूर्ण लेख लिहीलाय . व्रुद्धाश्रमा बाबतचा लेख अगदी वाचनीय आणि चिंतनीय.
— प्रा सुनीता पाठक. छ. संभाजीनगर

६. लेखकाच्या स्वप्नांचा आवाका इतका मोठा… पण परिक्षण ही तितकेच विस्तृत पण अत्यंत माहितीपूर्ण झालेय, तोरणे सर. कित्ती गोष्टी समजल्या…!!!!
— सौ रेखा भावसार. मंडी, हिमाचल प्रदेश

७. स्वप्नं पहा उघड्या डोळ्यांनी ! फारच छान. तोरणेजी आपला पुस्तक वाचनाचा छंद असाच सुरू रहावा या करिता मंगलमय शुभेच्छा.
— प्रकाशराव नाईक. अमेरिका

८. तारा वनारसे परिचय खूपच भावणारा आहे. — सुषमा देशपांडे. नासिक

९. मस्त ! विकासाकडून विनाशाकडे हे तर इतकं वास्तव आहे की डोकं सुन्न होऊन जातं. सध्या ही परिस्थिती फार ठिकाणी पहायला मिळते. जिथे मुलं सुद्धा सुरक्षित नाहीत तिथे मुली बायकांची व्यथा काय सांगावी. लोकांची मानसिकताच बदलायला पाहिजे. त्यासाठी संस्कार पण चांगले पाहिजेत ; जे सध्या अभावानेच दिसताहेत.
आकाशवाणीची ‘पुन्हा प्रपंच’ ही मालिका ऐकण्यासाठी घरातले आम्ही सगळे एकत्र जमायचो. नीलम प्रभू, बाळ कुरडतकर आणि प्रभाकर जोशी हे खरोखरच त्या त्या नात्यात असतील असेच वाटे. संवादाला जिवंत करणं म्हणजे काय ते या मालिकेतून समजतं. आवाजाची जादू किती सशक्त असते ते ही या मालिकेने दाखऊन दिलंय. आठवणीत रमतांना फार छान वाटलं. धन्यवाद.
सर्वच लेख माहिती पूर्ण !
शशिकांत ओक सरांची व्यक्तिचित्रणं फारच मजेशीर वाटली. हवा हवाई  मस्त.
डॅा. शंतनू अभ्यंकर सरांचे व्यक्तिमत्व किती मोठे होते आजच्या लेखावरून कळले.
— प्रा सुनीता पाठक. छ. संभाजीनगर

१०. देवेंद्र जी, ‘दादर ते दादर’ या पुस्तक प्रकाशन समारंभाची बातमी न्यूज स्टोरी टुडे वर प्रकाशित केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.‌👍🤝🙏🙏तुमचं कार्य अतिशय मोलाचं आहे🙏🙏🙏
— सुमंत जुवेकर. मुंबई

११. अनुजा बर्वे लिखित ‘हलकंफुलकं’ मधील ‘जेष्ठ संवाद’ खूप आवडला. घरोघरी घडणारा असा हा प्रसंग आहे.
श्री. विजय पांढरीपांडे यांचा ‘विकासाकडून विनाशाकडे’  प्रबोधनपर आणि विचार करायला लावणारा अप्रतिम लेख.
— अरुणा गर्जे. नांदेड

१२. श्री देवेंद्र जी आपले कितीही कौतुक केले तरी शब्द अपुरेच पडतील असे वाटते.. मनःपूर्वक अगदी हार्दिक अभिनंदन.. इतकी सुंदर पुस्तके आपल्या नावावर आहेत .. वाचायची इच्छा खूप आहे … हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे का ?
कॅन्सर असताना काम पूर्णत्वाला नेणे खरोखर किती स्तुत्य आहे हे सांगताच येणार नाही. डॉ किरण चित्रेजींच्या स्वास्थासाठी खूप शुभेच्छा.
डॉ सुधीरजींच्या लेखामुळे छान माहिती मिळते. मी स्वतः यासाठी फॉर्म भरलेला आहे.
गडकरीजींचा लेख खूप आवडला. खरोखर बहिणाबाईंचे तत्वज्ञान सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोचविण्याचे काम। सोपानदेव आणि अत्रे यांनी नसते केले तर .. हा विचार कधी कधी मनात येऊन या साऱ्यांचे खूप आभार मानावे से वाटतात आणि बहिणाबाईंसाठी चार ओळी नोंदवाव्या असे ही वाटते.
शारदेने शब्दमाया
तिजवरी धरली
लेवा गणबोलीत तिने
मौक्तिके पेरली
गर्जेताईंची ..जड पापाची गाठोडी..खूप क्लेशदायक कटू सत्य अशी कविता आहे ..छान लिहिली आहे.
— स्वाती वर्तक. मुंबई

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments