Wednesday, October 9, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
सध्या गणेशबाप्पा विराजमान झाले असल्यामुळे सर्वी कडे वातावरण भारलेलं आहे. त्याचे प्रतिबिंब आपल्या पोर्टल वर साहजिकच उमटलं आहे. काही कवी, लेखकांनी खटकणाऱ्या बाबी कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेत मांडल्या आहेत. या वर्षी त्या त्या लेखातील, कवितेतील भावना, कल्पना, सूचना अमलात येऊ शकत नसतील तरी या निमित्ताने केलेल्या सूचना पुढील इतर सण साजरे करताना जरूर लक्षात घ्याव्या अशा आहेत. या सर्व लेखक, कवी यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला,
देवेंद्र भुजबळ (संपादक)

गणपती बाप्पा विषयक लेख आणि कविता यावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

१. “बाप्पा आणि बाम” अप्रतिम असा अरुणा गर्जे यांचा लेख आहे. हीच स्थिती सर्व ठिकाणी आहे आणि ही खूपच वाढत चालली आहे. अगदी खरं त्यांनी रेखाटलं आणि हे फक्त गणपती बाप्पा पुरतं नाही. प्रत्येक धर्मातील महापुरुषांच्या जयंतीला हे होत आहे. आणि प्रत्येक चौकात एका वेळेस चार चार डीजे लावले जाते. जवळ हॉस्पिटल असते मुलांची शाळा असते. प्रत्येकाच्या घरात वयोरुद्ध आहेत कसलाही विचार केला जात नाही मुलं शिकत आहेत मुलांच्या परीक्षा आहेत लहान बाळ घरात आहे इतक्या मोठ्याने डीजे असतो की भिंती हदरतात. ज्या महापुरुषांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला हे लोक असे डीजे लावून गोंधळ घालतात महापुरुष वरून रडत असतील जर त्यांनी यांच्यासारखे केले असते . आपण त्यांना महापुरुष बहूमान दिला असता का? जे महापुरुष झाले समाजासाठी आपल्या तत्त्वासाठी लढले . त्यांनी जे केले त्यांना करता आले असते का? नुसते डीजेच वाजवत नाही तर दारू पिऊन गोंधळ ही घालतात. खरंच तुम्हाला महापुरुषांची जयंती साजरी करायची असेल त्यांच्याविषयी तुम्हाला खूपच आपुलकी आहे. महापुरुषांविषयी प्रत्येकाला आपुलकी असलीच पाहिजे. त्यांनी त्या काळात जे कार्य केले ते अद्वितीय आहे. ते कोणतेही जाती धर्माचे असो त्यांचे स्मरण हे झालेच पाहिजे त्यांची जयंती पुण्यतिथी ही साजरी झालीच पाहिजे आजच्या मुलांना त्यांचे कार्य माहिती पडलेच पाहिजे पण त्यांच्याविषयी कोणालाही माहीत नसते मुलांपर्यंत ते कोणत्याही प्रकारे दिले जात नाही ते ऐवजी डीजे वाजून रस्त्यावर नंगानाच केला जातो. त्या ऐवजी तुम्ही त्या दिवशी अन्नदान करा फळ वाटप करा जे मुलं मुली शिक्षणासाठी वंचित आहे त्यांना शिक्षणासाठी खर्च करा, रक्तदान शिबिर आयोजित करा, समाज प्रबोधनात्मक भाषणे आयोजित करा ,कितीतरी सामाजिक कार्य तुम्हाला करता येतील शांततेने आणि हे सर्व सर्वांना उपयुक्त होईल किती मुलांना वह्या पुस्तक कपडे नाहीत तुम्ही ते देऊ शकता. गरीब लोकांना तुम्ही अन्नदान करू शकता पण हे असे डीजे वाजवणे किंवा गोंधळ घालणे सर्वच लोकांना त्रास देणे हे कितपत योग्य आहे यापुढे याचा विचार व्हायला पाहिजे आणि हे बंद व्हायला पाहिजे असे मला वाटते.
— अनिसा सिकंदर. माजी प्राचार्य, जुनिअर कॉलेज, दौंड.

“बाप्पा आणि बाम” – अरूणाताई, शीर्षकासारखंच कल्पक-लेखनही खूप आकर्षक झालंय.👌👌
हलकं-फुलकं करून मांडणी केलेलं हे वास्तव म्हणजे खरोखर अनेकांच्या मनातला, ‘पण खरंच गरज आहे का ह्या ढॅणढॅणची ? बुध्दीदात्या बाप्पापुढे इतकं निर्बुध्द वर्तन का करतात ?’
असा प्रश्न कल्लोळ आहे. 😔

— अनुजा बर्वे. मुंबई.

श्री श्रीकांत पट्टलवार ,इंग्लंड यांच्या “मोदक कुणाचा ?” या लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

१. it is so apt and perfect for this occasion, I feel it will be stupid to wait for magzine.
This is the right occasion for such a wonderful article. People would love it.

हिंदीत काय ते “सोने पे सुहागा” किंवा इंग्रजीत cherry on cake का कायसं म्हणतात ते !!

तुम्हाला त्या गजाननाच वरदान आहे. तुम्ही मनात आणलंत तर असे छप्पन लेख तुमच्या लेखणीतून उतरतील

  • – Ravi Date. Manchester, UK

२. श्रीकांत सुरेख मजेदार लेख आहे, खूप आवडला. पुढचा भाग मोदक स्पर्धा झाल्यावर वाचायला आवडेल 👏👏

  • — रवी माने. इंग्लंड

३. अप्रतिम लेख ! त्यातले शाब्दिक आणि प्रासंगिक दोन्ही विनोद आवडले. ग गूगल चा, अष्टविनायक म्हणून आठ मोदक, उपवास म्हणून स्मार्ट फोन इत्यादी.

  • — कुमार जावडेकर. इंग्लंड

पुनर्भेट
आवडते खाद्य तुला एक जुडी दुर्वांची
सारणही मोदाचे पारी पण भक्तीची
डॉक्टसाहेब आनंदला जीव माझा
आपल्या काव्य रचनेची गोडी बाप्पाला तर आवडेलच माझ्यासारख्या काव्य वेड्या रसिकालाही. पण आता dr आपली पुनर्भेट मात्र लांबवू नका.

  • – प्रकाश पळशीकर. पुणे.

शितल अहेर यांच्या गणपती बाप्पा या कवितेवर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

१. कविता छान आहे. काहीतरी जबरदस्त चमत्कार झाल्याशिवाय काहीही सुधारणा होणं शक्य नाही.
ज्या पोलीस प्रशासनाने कडक पावलं उचलायची, ते राजकारण्यांचे मिंधे आहेत. राजकारण मतपेटीशी मिंधे आहे आणि सर्वसामान्य जनता निर्बुद्ध आहे आणि तो बुद्धीदाता काही सद्बुद्धी देत नाही. असं हे दुष्टचक्र आहे.
म.फुलेंनी स्त्रीशिक्षणाची चळवळ केली, त्याला यश मिळायला आणि जन जागृती व्हायला 60/70 वर्षे लागली, त्या हिशोबाने समाज प्रबोधन व्हायला कीती वेळ लागेल?
— शुभदा मुळेकर. कवयित्री.

२. शितल तुझी कविता खरंच छान आहे. सध्याच्या परिस्थितीवर मोठी चपराक मारली आहे. खरीखुरी परीस्थिती मांडली आहेस. असेच छान लिहीत जा

  • — प्रज्ञा कांबळे. खोपोली.

३. खुप छान शितल. खरच आहे भक्तीच्या नावाखाली स्वत: मौज मजा करतात. अगदी तंतोतंत खरे आहे. खुप छान संदेश
— जयश्री बावस्कर.

४. खूप सु़ंदर पद्धतीने वास्तव मांडले आहे
– अनिलकुमार रानडे. कवी.

५. सत्य परिस्थिती नुसार कविता
— डॉ. सई खेर्डेकर

६. मस्त वास्तव मांडलस.
— जयश्री पोळ. कवयित्री.

७. खूप छान कविता शितल😊
— वैशाली लांडगे.

८. वा … ताई ..एकदम भारी लिहिली आहे ग कविता..खूपच सुदंर आणि अगदी सटीक शब्दात वर्णन केलं आहे कविता च…
आणि खरंच बरोबर लिहिला आहे .. गणेशोत्सवाच्या नावाखाली सगळीकडे नुसता धिंगाणा सुरू आहे…
– सोनल पेदे. रायपूर.

९. खुपच छान कविता आहेत ग. नेमकी हिच परिस्थिती आहेत. 🙏🙏👍🏻👍🏻
— रुचिरा पांडे.. पुसद.

१०. कवितेत अतिशय सुंदर आणि मार्मिक शब्दात सत्य परिस्थितीच वर्णन केले आहे..
— आश्लेषा गाण. सातारा.

राधिका भांडारकर यांच्या माझी जडणघडण भाग १५ वरील प्रतिक्रिया….

१. अतिशय सुंदर आणि प्रभावी लेखन.लेखिकेच्या विचारातली परिपक्वता चांगलीच जाणवते.
— अरुणाताई मुल्हेरकर. अमेरिका.

२. आपल्या आठवणींशी निगडित असे हे सणवार पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतात.. प्रत्येकाच्या घरातील पद्धतींमध्ये थोडाफार फरक असतो. पण सगळ्याचा मूळ हेतू हा निसर्गाशी जोडलेला असतो. माणसा माणसाचे एकत्र येणे सर्वांनी मिळून उत्सव साजरा करणे आणि आपल्या संस्कृती, परंपरा जमतील त्याप्रमाणे कायम चालू ठेवणे यामध्ये जी गंमत आहे, ती हिंदू धर्मातच आपल्याला खरी बघायला मिळते…..छान आठवणी…
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे

३. वर्णन बहारदार ! एखाद्या क्रिकेटपटूला हवे तसे ‘पिच’ आणि हवे तसे ‘बाॅल’ डिलिवर व्हावेत त्यावर त्याने चौकार षटकारांची आतिषबाजी करावी तसा हा खास ‘स्त्रियांचा’ प्रांत तुम्ही शब्दांत सजवला आहे. लिहित राहा. शुभेच्छा.
— पुरुषोत्तम रामदासी. मुंबई.

४. अप्रतिम लेख
— अस्मिता पंडीत. पालघर

५. राधिकाताई, गौराईचे वर्णन वाचताना मन भरून आले.अंगावर भक्तीभावाचे रोमांच उभे राहिले. तुमच्या लिखाणात इतकी जबरदस्त ताकद आहे की जणु काही हे सर्व समक्ष घडत आहे असे वाटते.
आईच्या रूपात मायेने भरलेली गौरी दिसते.
आत्याच्या रूपात माहेरवाशिण गौरी दिसते.
हळदीकुंकवाचा समारंभ हा सामाजिक भेदभाव न मानणारा संस्कार देतो.
स्री हे शक्तीचे प्रतीक भासते.
पूजा अर्चा हे नात्यातला जिव्हाळा टिकवण्यासाठी, कलात्मकता व सौंदर्य द्रुष्टी वाढविण्यासाठी किती उपयोगी पडते हे छान समजावलेत.
— अंजोर चाफेकर. मुंबई

६. किती सुंदर गौराईचे वर्णन. तो काळ डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभा केलास. तुझी नं पाहिलेली आई गौरीच्या रूपात नजरेसमोर उभी राहिली. मनात खूप विचार आहेत, ते व्यक्त करायचे आहेत. नक्की सविस्तर लिहीन.
— अनुपमा आंबर्डेकर. मुंबई

७. राधिका किती साग्रसंगीत वर्णन केलं आहेस ग बाप्पा आणि गौराईचं .डोळ्यासमोर उभं राहिलं सारं चित्रं. तुझ्या आईपाशी असलेली कलात्मक दृष्टी आणि त्याची कदर करणारं तुझं कुटुंब मी जवळून बघितलं आहे. आपल्या पिढीची जडणघडण थोड्याफार फरकाने अशीच असायची नाही का ? ओघवत्या शैलीतला तुझा लेख खूप भावला. तू एक परिपक्व विचारांची लेखिका आहेस.

  • – अलका वढावकर.

८. गौरी पूजनाचे खूप खूप छान वर्णन केले आहेस.
– जयश्री कोतवाल. पुणे

९. राधिकाचे लेख हे लेख वाटतच नाही. तो वाचकांशी साधलेला संवाद असतो.सुरवातीलाच पप्पांचा गणपती आणि आईची गौर अशी दोन उत्सवांची अनौपचारिक, अगदी मैत्रिणीला सांगावं तशी विभागणी करून परंपरा पाळताना कोण कोण काय काय करायचं ते हसत,खेळत सांगितलंय.सुंदरतेला अधिक सुंदर करणं,निर्जीवतेला सजीव, चैतन्यमय करणं अशा शब्दात त्या गौरीचं डोळ्यांना सुख आणि मनाला उत्साह आणि ऊर्जा देणारं रूप सहज साकार केलंय. तेरडा, पत्री, केळीची पानं,विड्याची पानं.. यातून शोधलेली आपल्या परंपरेतली निसर्गाशी जवळीक, गौरी कोणत्या गुणांचं प्रतिनिधित्व करते म्हणून तिला ‘परंपरेत स्थान’ मिळालंय आणि आपण तिचं पूजन करतो या सर्व गोष्टी सहज सांगितल्या आहेत. त्यांची लेखणी कशी ‘सिद्धहस्त’ आहे, लेखन किती प्रभावी आहे हे सोदाहरण सांगायचं म्हटलं तर तेवढाच मोठा लेख लिहावा लागेल.
— साधना नाचणे. ठाणे

माधुरी ताम्हणे यांच्या, “माध्यम पन्नाशी भाग ६” प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया…

१. किती छान शिकायला मिळालं तुमच्या लेखातून. तुमचा प्रत्यक्ष अनुभव तर किती समृद्ध करणारा असेल.
— डॉ. शलाका गोरे. मुंबई

२. Live program मध्ये बोलणे किती जबाबदारीचे काम आहे ना, खरच खूप विचार करून बोलावे लागत असेल. तुझे लेखन नेहमीप्रमाणेच मस्त आणि ओघवते आहे.👍🏻
— अंजली चौबळ. पुणे.

३. खूप सुंदर शब्दांकन. वाचल्यानंतर हा कार्यक्रम आपणही ऐकत होतो व आताच तो कार्यक्रम संपला आहे असं वाटलं.
— अजित महाडकर. ठाणे

४. “माध्यम पन्नाशी” चा ६ वा भाग खूपच रोचक झाला आहे. माधुरीने शब्दबध्द केलेला ‘लाईव्ह कार्यक्रमासाठीच्या’ प्रयत्नांचा लागलेला कस वाचणं हा एक छान अनुभव होता.

देवा, पाहिलंय मी खूप सडेतोड काव्यरचना !
‘काय करू नको’ हे हक्काने डायरेक्ट देवाला सांगणारी ही शब्द -गुंफण म्हणजे सांप्रतचं (करूण) वास्तव आहे.

  • — अनुजा बर्वे मुंबई.

आदर्श सून, आदर्श सासू या मी (देवेंद्र भुजबळ) यांनी लिहिलेल्या लेखावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

१. नमस्कार सर,
खूप सुंदर लिहलंय तुम्ही. एक स्त्री ची खरी ओळख तुम्ही या लेखातून मांडली. खूप सुंदर 💐💐

  • प्रकाश फासाटे. मोरोक्को.

  • २. खुप सकारात्मक विचार.मला वाटतं सासुबाई या सुशिक्षित असाव्यात म्हणूनच त्यांनी असा विचार केला. सुशिक्षित असूनही काही लोक अशिक्षित सारखं वागतात आणि अशिक्षित असूनही काही लोक सुशिक्षित सारखे वागतात हे मी खूप वेळा अनुभवला आहे.
    हा पेच सोडवणे खूप अवघड आहे. मला असं वाटतं की यात सुशिक्षित शिक्षित काही नसून वृत्तीचा प्रश्न आहे. एखादा कितीही सुशिक्षित असेल पण त्याची वृत्ती वाईट असेल तर तो नकारात्मकच विचार करणार.असो
    ऋतुजा यांना पुढील संशोधन यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
    असे प्रत्येक घरातील सासू सासरे व नवऱ्याने विचार केला तर आजच्या महिलांची अजूनही प्रगती होऊ शकते. त्यांना संसारिक जबाबदारीत न गुरफटका त्यांना त्यांचे करिअर करू द्यावे. संसार तर त्या सोबत चालूच असतो. परंतु एकदा आलेली स़ंधी पुन्हा मिळत नाही. प्रत्येक जेष्ठाने दोन पाऊल पुढे येऊन आपल्या सूनेला ही समजून घेतले तर समाजातील चित्र वेगळे दिसेल
    — अनिसा सिकंदर शेख. माजी प्राचार्य. दौंड.

३. ग्रेट… उत्तुंग भरारी… गर्जे परिवाराचे अभिनंदन, विचार करण्यायोग्य हा लेख 🌹– संगीता कुलकर्णी, ठाणे.

४. माझ्याही मनःपूर्वक शुभेच्छा. 👍👍🙏🙏💐💐💐— सुनील चिटणीस, पनवेल.
५ वाह, खूप छान लेख लिहून आणि यथोचित उदाहरण देऊन “आदर्श सासू, आदर्श सून ” ह्यांची माहिती पुरवली आहेत. तुमचे मनःपूर्वक आभार आणि सौ. अरुणा गर्जे व सौ. ऋतुजा गर्जे ह्या सासूबाई-सूनबाई जोडीचे हार्दिक अभिनंदन. 🙏💐— मृदुला राजे. जमशेदपूर

६. प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे एक आदर्श सासर असू शकत, ही नवी संकल्पना या कुटुंबाने आपल्या समाजापुढे मांडली आहे. एक आदर्श कुटुंबाचं उत्तम उदाहरण आहे.

  • — आश्लेषा गान. सातारा.

७. श्रीमान देवेन्द्रजी सप्रेम नमस्कार,
आदर्श सुन, आदर्श सासर हा लेख वाचला. कवयित्री, लेखिका सौ अरुणाताई गर्जे यांच्या अनेक कविता आणि काही लेख मला वाचण्याचे भाग्य मिळाले तेही देवेंद्रजी आपल्या मुळेच न्यूज स्टोरी टूडे हे पोर्टल अनेक नवोदित लेखक कवी कवयित्री तथा विविध प्रकारच्या विषयावरील लेखाना प्रकाशित करून त्यांना प्रोत्साहन देत असता आणि वर्गाला सुखवित असता
जेंव्हा अरूणा ताईना आपल्या सुनेची ऋतुजाची निवड जपान सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या विद्यमानै जपान फाऊंडेशन तर्फे २०२४-२५ सालच्या जपानी भाषा प्रशिक्षण व संशोधन कार्यक्रमासाठी झाली. सुमारे १८-२० देशांमधील जपानी भाषा शिक्षक ह्यांत सहभागी होणार असून ऋतुजा भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. असे कळताच किती आनंद झाला असेल याची कल्पना करणंच अवघड आहे.

परंतु दुसऱ्याच क्षणी त्यांच्यातली सासू नव्हे तर आईच जागी झाली कारण सद्ध्या जपान मध्ये साथीचा रोग पसरला आहे अशी माहिती त्यांच्या वाचनात आली काय करावे पाठवू का नको असा प्रश्न त्यांच्या मनात आला त्याचक्षणी त्यांना तुमची आठवण आली आपल्याला योग्य मार्गदर्शन श्री देवेंद्रजी नक्कीच करतील याची खात्री होती म्हणूनच विलंब न करता आपल्या संपर्कात आल्या आणि त्यांच्या मनातील धाकधूक तुम्ही दूर केलीत सर्व दृष्टीकोनातून जपान देश सुरक्षित आहे याचा भरवसा दिलात आणि म्हणूनच आज ऋतुजा भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जपान मध्ये पोहोचली सुद्धा
त्यांना घवघवीत यश लाभो.
देवेंद्रजी सलाम तुम्हाला आणि अलका ताईना
— प्रकाश पळशीकर. बावधन पुणे

इतर प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

प्रशांत कुलकर्णी यांच्या भक्ती बर्वेच्या आठवणी रंगभूमीच्या त्या काळात घेऊन गेल्या. खरंच तिच्यासारखी तीच…
मा. सुधाकर तोरणे यांना ८५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ! 💐
राधिका भांडारकर. पुणे.

२. Very nice article and thank you for remembering her & I which took me to my memory lane as she was a very good friend of mine. I was working as an editor in Doordarshan during that period. 👌🏻👌🏻🙏🏻

  • — Vinod Ganatra. Mumbai.

३. तोरणेसाहेब यांचे ८५व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि शंभराव्या वाढदिवसासाठी त्यांना आतापासूनच हार्दिक शुभेच्छा ! तुमच्याकडे सुरू असणाऱ्या त्यांच्या पुस्तक-परिचयाची शंभरीसुद्धा यशस्वीरित्या लवकरच पूर्ण होवो…

  • — प्रल्हाद जाधव. लेखक, नाटककार, निवृत्त माहिती संचालक, मुंबई.

४. तोरणे सर, “डोंगराने गाव गिळला”..
या पुस्तकाचे परीक्षण वाचले. तुम्ही किती सखोल वाचन करता…. आणि तेही फार आवडीनं… म्हणून च परिक्षण ही इतकं उत्तम लिहू शकता… प्रत्येक बारीकसारीक तपशीलासह…. निसर्ग प्रेमी असणा-या सर्वांनाच हे परीक्षण खूप आवडेल…
मला तर फार च भावलं 👌
— सौ.रेखा भावसार. मंडी (हि.प्र.)

५. वन आणि मानव सुंदर लेख. — सुधीर थोरवे. पर्यावरण तज्ज्ञ, नवी मुंबई.

६. अनुजा बर्वे लिखित ‘वाटा वाटा वाटा गं’
खूप आवडले. हे लिखाण हलकं फुलकं जरी वाटत असलं तरी विचार करायला लावणारे आहे. मराठी भाषेत अशा शब्दांचा खूप खजिना दडलेला आहे. तो फक्त शोधून काढता आला पाहिजे. शब्द एक अर्थ अनेक. एकाच शब्दाचे बोलतांना कसे सहज अर्थ बदलतात ते अगदी सहज संवादातून पटवून सांगितले आणि मला हे खूप आवडले.
— अरुणा गर्जे. नांदेड

७. श्री देवेन्द्रजी,
प्रा डॉ श्री विजय पांढरीपांडे यांचा आज आपण प्रसिद्ध केलेला हा दुसरा लेख मी गांभीर्याने वाचला. या पूर्वीचे त्यांचे लेखन सुद्धा राष्ट्र प्रेमाने आणि सामान्य जनते विषयी त्यांना वाटणाऱ्या काळजीने व्यापलेले आहेत.
आजच्या लेखातील शेवटून दुसरा परिच्छेद ( तांत्रिक प्रगती झाली pasun—— वास्तवाला धरून नाही ) सभोवती चालेल्या राजकीय आणि सामाजिक घसरणी विषयी त्यांच्या मनातील तळमळ व्यक्त झालेली जाणवते असो फोन करून बोलता आले तर उत्तमच. लिखाण करून त्यांच्याशी संपर्क साधावा तर अशक्य म्हणून म्हणतो त्यांना वाटणाऱ्या भावनेला जबाबदारीच्या जाणिवेला माझा नमस्कार कळवला तर आनंद.
अस लेखन साहित्य NST मधून जमेल तितक्या नागरिकांना वाचण्यासाठी उपलब्ध करून दिल्या बद्दल मनपूर्वक आभार लेख प्रसिद्ध करताना कोणाच्याही भावना दुखावणारे नाहीत राजकीय वाद निर्माण होणार नाहीत आपला परिवार जवळजवळ पांच लाखाहून अधिक रोज NST मोबाईल फोन वर कधी येतोय याची वाट पाहत असतो
देवा तुमच जगणं म्हणजे समाजाला जागिण्यासाठी कोणतही मानधन न देता विधात्याने केलेली नियुक्तीच आहे.

  • — प्रकाश पळशीकर. पुणे.

८. देवेंद्रजी सप्रेम नमस्कार,
दृष्टीदोष असणाऱ्यांच्या डोळ्यांवर वेळीच योग्य त्या नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया झाली तर एकवेळ त्याच्यातला दृष्टीदोष नाहीसा होतो. पण एखाद्याचा दृष्टिकोन बदलण मात्र खूप जीकिररीच होऊन बसलय.
सद्ध्या भोवतालच्या अंदाधुंदी वातावरणात कोणकोण समाजविघातक, देशद्रोही आणि गद्दार झालेत त्यांच्यात मनपरिवर्तन म्हणजे एकप्रकारे दृष्टिकोनच बदलून एक सच्चा भारतीय नागरिक नात्याने देशसेवा करण्याची संधीही उपलब्ध करून दिल्या तर अवघड नाही पण वेळ जुळली आणि साधली पाहिजे.
जयहिंद.

  • — प्रकाश पळशीकर. पुणे.

९. डोळे अतिशय सुंदर, हृदयस्पर्शी आणि उद्बोधक लघुपट.
राधिका भांडारकर. पुणे

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments