Friday, December 6, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात… सदरात आपलं स्वागत आहे.गेला आठवडा दिवाळीत गेला. आपली दिवाळी मजेत गेली असेल,nअशी आशा आहे. मागच्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ. (संपादक)


देवेंद्रजी, मानलं तुम्हाला. सामान्यातल्या सामान्य नागरिकाला सुद्धा “निवडणूक आचार संहिता l” या विषयी पुरेशी माहिती नसते. त्यामुळे अनेक पात्र उमेदवार सुद्धा मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राकडे फिरकत नाही.
काही काही वेळा तर सुशिक्षित मतदारसुद्धा सुटी घेऊन सहली किंवा करमणुकीचा कार्यक्रम आखून मतदान करत नाहीत.
आपला हा छोटेखानी लेख परिवारातील सदस्य, जवळपासच्या अनेकांना मतदान केंद्राकडे नेईल, असा मला विश्वास वाटतो.
सुलभ आणि योग्य समाज प्रबोधन केलेय. धन्यवाद.

  • — प्रकाश पळशीकर, पुणे.


“निवडणूक आचारसंहिता” ही मतदारांनाही तेवढीच लागू असते हे ध्यान राखणे महत्वाचे. सध्या मोबाईलचा काळ आहे.लोकांनी उगाच राजकारणी मिम्स, व्यंगचित्र, आरोप, प्रत्यारोप करणारे लेख, विडिओ देखील थांबवायला नकोत का ?

  • — स्वाती वर्तक, मुंबई.


आदरणीय महोदय, सर्वप्रथम दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!! केंद्र शासनाने नुकताच “मराठी” भाषेस अभिजात भाषा म्हणून दर्जा दिला आहे, या पार्श्वभूमीवर आज दिनांक ३०/१०/२०२४ रोजी आपण मराठी भाषेच्या सद्यस्थितीतीबाबत नमुद केलेला लेख, मनोगत व विचार खरोखरच चिंतनिय आहे, याबाबत मराठी माणसाने सर्व बाबी देनंदिन आचरणात आणणे आवश्यक आहे, असो सूंदर विचार मांडल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !!💐💐

  • — नरेंद्र अष्टेकर
  • निवृत्त उपायुक्त नगरपालिका प्रशासन
  • छ्त्रपती संभाजीनगर


आदरणीय सर ‘समाज माध्यमे व मराठीची स्थिती व गती’ हा आपले वेब पोर्टल वरचा दिनांक 30/10/2024 चा लेख वाचला. अत्यंत अभ्यासपूर्ण व वस्तुस्थितीवर लेख लिहला आहे सर.आपणमराठी माणसेच मराठी भाषेची उपेक्षा करत आहोत साहेब.
उदा.लोकल मध्ये फर्स्टक्लास डब्यात मराठीत बोलणार्‍या कडे असे तुच्छतेने बघीतले जाते. फाडफाड इंग्रजी (मग तो काॅनव्हेंट 10वी पास नापास) का असेना त्याला जितकी किंमत मिळते तितकी मराठीत पदवीधर असलेल्या व्यक्तीस मिळत नाही.
मी जेंव्हा पत्रकारीता डिप्लोमा (क्षमस्व डिप्लोमा मराठी शब्द आठवत नाही) तेंव्हा प्रकर्षाने कळले की मातृभाषा जपली तर तीची संस्कृती टिकते त्याच प्रमाणे जितकी आपली भाषेचा जास्त वापर होईल तेवढी ती विश्व कोषात येते (सुज्ञ लोक जाणतीलच इंग्रजी ची एवढी महिमा का?त्यामागील षडयंत्र काय).
आता तरी शासन पातळी वर मराठी भाषा संवर्धन व मराठी भाषेचा सन्मान होईल हे पाहीले जाईल ही अपेक्षा, कारण मराठी ही अभिजात भाषा असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
धन्यवाद.

  • — सुनीता नाशिककर.
  • निवृत्त पोलिस उप अधीक्षक, मुंबई.


विंग कमांडर शशिकांत ओक यांचा “प्लॅचेट” हा लेख वाचला खूपच विस्तृत माहिती दिली आहे. मी कॉलेजमधे असताना नातातल्या मृत आत्म्याला बोलावून अनेकवेळा फ्लॅचेट केले आहे त्याकाळी आम्ही वजनाने जरा हलका स्टीलचा पेला वापरत असू अन इंग्रजी अक्षरांचा तक्ता व Yes आणि No हे दोन शब्द असत. मृतात्म्याच्या शक्तीने तो पेला हलतो व उत्तरे मिळतात याची मला खात्री आहे कॉलेज संपल्यापासून आजपर्यंत मी फ्लॅचेट केले नाही पण यावर माहितीपूर्ण नक्की बोलू शकतो. ओकसाहेब लेख वाचून जुन्या स्मृती पुन्हां जाग्या झाल्या.

  • — सुनील चिटणीस, पनवेल.

राधिका भांडारकर यांच्या “जडणघडण” भाग २१ वर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.


दिवाळीचे औचित्य साधून हा आठवणीतल्या दिवाळी वरील लेख खूप छान झाला आहे.
— नंlदिनी चांदवले, पुणे

Simply beautiful.
Very good thought process.
— अंजोर चाफेकर, मुंबई.


अप्रतीम लेख! सुसंस्कृत विचार मनातील अंधःकार दूर सारणारा प्रकाशमय, तेजोमय !

  • — अरुणा मुल्हेरकर, अमेरिका


मा. राधिकाताई ,
आपला “चैतन्याचा दिवा” हा लेख वाचला.
दिव्याने दिवा लावू
प्रकाश चैतन्याचा ।
मन आरोग्य उजळू
उत्साह अनुभवांचा ।।
दीपावलीच्या अनंत शुभेच्छा …
— अरुण पुराणिक, पुणे


अतिशय सुंदर लेख!जीवनात प्रकाशाची वाट दाखवणारा लेख !
— आरती नचनानी, ठाणे


चैतन्याचा दिवा” खूपच छान
दिपावलीचा एव्हढा व्यापक , सर्व विचार ,छान विचार केला राधिकाताई तुम्ही.खूपच आवडले.
— छायाताई मठकर, पुणे


खूप छान विचार व्यक्त केले आहेत. आपण थोडी तरी मदत अशा लोकांना करायला हवी.
— अजित महाडकर ,ठाणे


बिंबा (राधिका)आपल्या गल्लीतली गंमत डोळ्यासमोर आली.‌
धोबिणीकडून दीवा उतरवला जातो हे नविन कळलं.
— अलका वढावकर ,ठाणे.


फारच सुंदर अभिप्राय.
तुमच्यासारख्या वाचकांमुळे लिहावसं वाटतं.
धन्यवाद!
शुभ दीपावली.
— अस्मिता पंडीत, पालघर

” माध्यम पन्नाशी” (भाग १२) वरील वाचकांच्या प्रतिक्रिया
१) “माध्यम पन्नाशी” मधील लेखन शैली चित्रदर्शी आहे .आत्ता घटना घडल्यात असं वाटतं. तुमच्या स्मरणशक्तीला दाद द्यावीशी वाटते. लेखाचा शेवट एकदम मस्त!
— आरती कदम, संपादिका चतुरंग पुरवणी, लोकसत्ता
२) माधुरी ताईंचा लेखन प्रवास हा केवळ त्यांचा अनुभव नसून, तो एक सांस्कृतिक दस्ताऐवज आहे ज्यातून त्या काळांतील लोकांचे भाव विश्व पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचते. रेडिओचा काळ म्हणजे आकाशवाणीच्या कार्यक्रमांचे सोनेरी युग होते आणि त्या दिवसांच्या आठवणी लेखनातून अत्यंत जिवंतपणे उमटतात.
— चंद्रकुमार देशमुख, गोरेगाव
३) माधुरी ताईंचे निवेदन अतिशय रसाळ आहे. खरं आहे. त्या लिहितात खरा अपंग कोण? एका जागेवर बसून ऋतूंचे सोहळे बघणारा, त्यावर कविता करणारा श्रेष्ठच! अपंग नाही. माधुरी ताईंना सनदी साहेब देखील किती संयमी सुप्रशिक्षक मिळाले. आनंद झाला वाचून. हे सर्व लिहून त्यांनी एक प्रकारे त्यांचे ऋणच फेडले आहे.
— स्वाती वर्तक, मुंबई
४) आपला लेख आवडला. खूपच छान लिखाण! कर्तव्य तत्परता व संवेदनशीलता अशा मिश्र भावना आपल्या लेखातून व्यक्त केल्या गेल्या आहेत. करिअरच्या सुरुवातीला अनवधानाने किंवा नकळत काही चुका होत असतात व त्या अनुभवातून आपलं करिअर चोखपणे व अचूक कसे उभारता येईल याची मांडणी होत असते. त्यात श्री. सनदी साहेबांसारखे वरिष्ठ अधिकारी लाभल्यावर ते आपल्या चुका पोटात घालून आपल्याला वडीलकीच्या नात्याने आपल्या कामाबाबत मार्गदर्शन करतात. त्यांच्याकडून योग्य संस्कार आपल्याला मिळतात व तीच शिदोरी कायम आपल्याबरोबर राहते. असाच काहीसा अनुभव प्रत्येकाच्या बाबतीत येत असतो. अशा आदरणीय व प्रेमळ वरिष्ठांच्या संस्कारांचे व शिस्तीचे लेणे आपल्याला लाभले. त्यामुळे आपण आज या उच्च पदापर्यंत पोहोचला आहात. आपल्या लिखाणाच्या दुसऱ्या बाजूवर आपण खूप हळव्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. अपंग व्यक्ती शरीराने अधू असू शकते. पण मनाने किती खंबीर व जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती लाभलेली असते त्याचं हे उत्तम उदाहरण आपण आपल्या सुंदर लेखनातून व्यक्त केले आहे. एक अपंग व्यक्ती मनाने किती रसिक व सुंदर विचार धारण करते ते दिसून येते. खरोखर अशा गोष्टी इतरांच्या मनाला उभारी देतात आणि आपणास खूप काही शिकवून जातात
— मो.र. अंजारिया, कळवा. ठाणे

४) या माध्यमात काम करताना माधुरीताई किती प्रचंड मेहनत घेतात हे कळतं. शंभर टक्के योगदान!
तुमचं खूप कौतुक वाटतं आणि अभिमानही
वाटतो.
— मनीषा ताम्हणे, गोरेगाव
५) माधुरीताईंचे “माध्यम पन्नाशी” हे लेखन खरोखरच त्या सुवर्णकाळातील रेडिओचे यथार्थ दर्शन घडवते. रेडिओच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेले कार्यक्रम, त्यातले कलाकार आणि त्यांची समाजावरची पकड यांचे अत्यंत प्रभावी वर्णन त्यांनी केले आहे. त्या काळात रेडिओचा महत्वाचा भाग असलेल्या समाजाप्रबोधनाच्या कार्यक्रमाने लोकांच्या जीवनात मोठी जागा निर्माण केली होती. गंमत जंमत, युववाणी, श्रुतिका, कामगार सभा, विविध भारती यासारख्या कार्यक्रमांनी अनेक पिढ्यांना आनंद दिलेला आहे.
— तनुजा नायक, कळवा
६) मी सगळे भाग एकदम वाचले. खूप छान आहेत. सलग वाचल्यामुळे मी त्यात अगदी रमून गेले. आता पुढील भागांंची उत्सुकताl !
— शोभा कर्णिक , पुणे
७) लिहायची शैली छान आहे. आपण तिथेच हजर असल्यासारखं वाटतं. सगळे लेख वाचून छान माहिती पण मिळते.
— विभा देशपांडे, पुणे
८) माधुरी तुझ्या चाहत्यांकडून आलेले अभिप्राय मी वाचते. तुझ्यासारखा तुझा चाहता वर्ग पण खूप टॅलेंटेड आहे. अशा अपंग मुलांना बघून, त्यांच्याशी बोलून, मन शांत ठेवून लिहीणं खरंच ग्रेट! नेहमीप्रमाणे सुंदर लेखन.
‌– निशा प्रभू, बोरिवली

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !