Thursday, December 5, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
सध्या निवडणुकीचे दिवस असल्याने त्याचे प्रतिबिंब आपल्या पोर्टल वर देखील पडले आणि त्या विषयावरील लेख,कविता आठवडा भर प्रसिद्ध होत राहिल्या.
*बुधवार, २० रोजी निवडणुका आहे. आपला मतदानाचा केवळ हक्कच नव्हे तर कर्तव्य बजावयाला विसरू नका. असो* .

गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ (संपादक)

असले पुरस्कार नको रे बाप्पा.. या मी लिहिलेल्या विनोदी कथेवर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.


इथं पुरस्कार विकत मिळतात इतकेच जाहीर करणे बाकी आहे, ही वस्तुस्थिती आहे. पुरस्कार जाहीर झालेल्यांची नावे, काम कधीच प्रकाशित वा प्रसारित झालेले नसते.
— गोविंद देशपांडे.
निवृत्त माहिती अधिकारी, पुणे

असले पुरस्कार नको रे बाप्पा !…
तरीही प्रसिध्दीसाठी वखवखलेले लोक खर्च करून पुरस्कार घेतील!
— चंद्रकांत बर्वे.
लेखक तथा निवृत्त दूरदर्शन संचालक, मुंबई

सर, असे पैसे घेऊन पुरस्कार देणाऱ्या लोकांचे मला हि अनेक मेल, मेसेज, फोन येतात आणि अनेक जण असे पैसे भरुन पुरस्कार घेतातहि. हा आता एक धंदा झाला आहे. मुख्य म्हणजे अशा पुरस्कार रत्नाना त्यांच्या गल्लीत हि कोणी ओळखत नसतो. सर, अगदी परखडपणे सत्य लिहिल आहे तुम्ही🙏
— गणेश जोशी – व्यंगचित्रकार, ठाणे

असाच एखादा पुरस्कार मला पण द्या ना गडे….लै भारी राव कथा….सर्वच कथा अगदी उत्तम आहेत.
— पंडित शंकरराव वैरागकर. नाशिक

अन्य काही प्रतिक्रिया…

रिकामी झोळी सत्यकथा आवडली.
काही समाजात अजूनही स्त्री
सुरक्षित नाही या जाणिवेने मन खूप उदास झाले.
अंदमान सफर छान लिहितात
मी जाऊन आले आहे त्यामुळे उत्सुकतेने वाचते.
— मृदुला चिटणीस. नवी मुंबई

मारिओ दि अन्द्रादे कविता👌
अजीब दास्ता… 👌👌
— वंदना कापसे. नागपूर

समाज माध्यमे खूप छान लेख लिहिला👌👌👌
सुंदरच जडण घडण👌👌👌
आडे बाजी👌👌👌
My soul, कविता एकदम भारी 👌👌👌
माध्यम..सॉलिड👌👌👌
खूपच सुंदर👌👌सगळेच लेख, कविता मस्त मस्त 🤝👍👍👍
— नीता देशपांडे. पुणे

सुवर्ण धन’मधील श्री देवेंद्र भुजबळ यांच्या विचारांना दाद देत आहे…
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक

भाऊ मराठीची स्थिती…
फार मोठा चिमटा आहे.
— मलकराज पंचभाई. निवृत्त निर्माता,
मुंबई दूरदर्शन केंद्र.

विलास कुडके यांच्या हलके फुलके : रिकामा वेळ या लेखावरील अभिप्राय..


Great
— श्री सुरेश वांदिले.

आपल्यामध्ये लेखन कलागुण आहेत हे नक्की .खूपच साधी, सरळ व थेट मनाला भिडणारी भाषा. आपण हा व्यासंग वाढवावा आणि हाच मार्ग आपणासाठी योग्य मार्ग आहे असे मला वाटते. आपण लिहावे, जरूर लिहावे. आपले लेखन वाचण्यासाठी मी उत्सुक आहे.
— श्री आर पी. झरेकर.

अप्रतीम👌👌
— श्री धोंडोपंत विष्णुपुरीकर.

व्वा खूप छान
— श्री हेमंत सावंत

अप्रतिम…खूप छान
आपण लेखक ही आहात तर…
— श्रीमती सुवर्णा नाईक

खूप छान लेख लिहिला सर.
👌👌
— श्रीमती भक्ती गमरे

एक नंबर 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
श्रीमती प्रिया रामटेककर

छान, आवडले👍👍
— डॉ. संभाजी खराट

मस्त व वास्तविकता.
— श्रीमती सुनिता कर्णिक
१०
खूपच छान
— राजेंद्र साळवे.
११
संपादक देवेंद्र भुजबळ यांचा.. “समाज माध्यमे आणि मराठीची स्थिती गती”
लेख खूपच माहितीपूर्ण, विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे. मराठी वरील प्रेम म्हणजे दुसऱ्या भाषेचा दुस्वास नव्हे हे वाक्य आवडले. खरे आहे
कुसुमताईंकडून मतदारांनी प्रेरणाघ्यावी.सुट्टी समजून घरी बसू नये..एवढेच शिकावे. याच्यासाठी कुठे , काय कसे फॉर्म्स भरावे , कोणाला संपर्क करावा हे ही दिले असते तर छान झाले असते.
“सुवर्ण धन” अंक खरोखरीच संग्राह्य असाच दिसतोय. अभिनंदन.
मतदान करा ..कविता वाचनीय. योग्य सल्ला देणारी
डॉ विकास जींचा लेख मधुमेहाची संपूर्ण व्यवस्थित माहिती देणारा असल्याने उपयुक्त आहे.
माधुरी जींच्या आठवणी वाचनीय आहेत.. माहेर.. मध्ये लेखिका म्हणून प्रसिद्धी मिळणे व त्यामुळे प्रेरणास्रोत सापडणे ..उत्तम
बालकदिनाची कविता आवडली. मी बालिका असताना चाचाजींनी केलेले कौतुक आठवले.
— स्वाती वर्तक, मुंबई
१२
मधुमेह… हा डॉ. विकास रत्नपारखी यांचा माहितीपूर्ण लेख जनजागृतीच्या दृष्टीने खूप छान आहे. धन्यवाद.
— डॉ कारभारी खरात, निवृत्त सहायक संचालक
आरोग्य विभाग.
१३
छंद माझा वेगळा हा मनीषा पाटील यांचा लेख फारच आवडला. माधवी माळी यांचा हा पाना फुलांसोबतचा प्रवास अतिशय मनोरंजक आणि प्रेरणादायी आहे. या लेखासोबत जोडलेली फुलं, फळं, भाज्या यांची चित्रं पाहण्याचाही आनंद वेगळाच होता. माधवीताईंचा हा पर्यावरणपूरक छंद खरोखरच वंदनीय,
— राधिका भांडारकर. पुणे
१४
‘छंद माझा वेगळा’ खूप सुंदर आणि प्रेरणादायी लेख.
  — अरुणा गर्जे. नांदेड

*माझी जडणघडण भाग २३ अभिप्राय*

भावस्पर्शी 🙏डोळ्यासमोर घटना जिवंत झाली, डोळे ओलावले. स्वआयुष्याचे दान अरुणाताईंच्या पदरात घालून ताईंचा नुकताच उमलणारा संसार फुलवणा-या कुमुद आत्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏
— अस्मिता पंडीत. पालघर

Khoop chaan touching
— अंजोर चाफेकर. गोरेगाव

राधिकाताईंची  आवडती कुमुदआत्त्या मलाही फार भावली. व्यक्तिचित्र तर वेगवगळ्या पात्र-प्रसंगांच्या मदतीने आणि राधिकाताईंनी वाचकांशी साधलेल्या सुसंवादामुळे परिणामकारक झालंच आहे, पण प्रवाहाबरोबर वाहून जाणे किंवा संसार -प्रवाहाचा एक वेगळा काढता येणार नाही असा भाग बनून मिसळून जाऊन अव्याहत वाहत राहणे या मानसिकतेला कमी न लेखता एक दर्जा प्राप्त करून दिला आहे.स्वत:साठी जगणं हा विचार कितीही स्वागतार्ह असला मजबूत कुटुंबव्यवस्थेसाठी ती तडजोड असू शकेल हाही विचार त्यांनी नवीन पिढीला न दुखवता अप्रत्यक्षपणे मांडला आहे.अशा अनेक कुमुदआत्यांमुळे कुटुंबव्यवस्था टिकून आहे ही मोठी ‘ओळख’ त्या पिढीला देताना ‘आत्मकेंद्री’ बनत चाललेल्या नवीन पिढीला ‘सावध’ केले आहे.
— साधना नाचणे. ठाणे

शब्दाने सहज चित्र रेखाटण्याची  अलौकिक हातोटी !! अप्रतिम !
— सुमन शृंगारपुरे. पुणे

राधिका ताई,
मध्यंतरी जडणघडण चे दोन तीन भाग वाचून सुद्धा उत्तर देऊ शकले नव्हते ..आज चा हा  कुमुदआत्या हा लेख वाचला आणि खरंच डोळे माझे सुद्धा पाणावले.. ईश्वरी संकेत असावा की काय पण कुमुद आत्या गेल्या आणि अरुण भाऊजींच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली…हो खरंच ईश्वरी संकेतच..!!!

तुम्ही त्या काळच्या तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीचं किंवा व्यक्तीचं खूप सुंदर असं इत्यंभूत वर्णन केलेलं आहे ..वाचताना असं वाटतं की आम्ही ते पात्र आमच्या समोर बघत आहोत.. आमच्या समोर हे सगळं घडत आहे.. इतकं हुबहू वर्णन.. त्याकाळची परिस्थितीचा सुद्धा तुम्ही खूप छान वर्णन करता… एक एक शब्द मनात साठवून ठेवते आहे लिहून ठेवते आहे.. शब्दांचा खरोखर भांडार.. एक एक शब्द रचना.. एक एक वाक्य खूप सुंदर अप्रतिम…

त्या काळच्या स्त्रिया अबला होत्या का… तर नाहीच.. तुम्ही खूप छान मनाला पटेल असं त्याचं विश्लेषण दिलेलं आहे… त्यांचा आनंद मूलबाळ घर सांभाळणं ह्यातच होता …शिकलं सवरलं म्हणजेच आपली किंवा घराची प्रगती होते असं नाही …स्त्रिया त्याकाळी घराच्या खंबीर पाया होत्या भक्कम पाया होत्या किंवा म्हटलं तर भक्कम भिंती होत्या… त्यांच्यामुळेच संपूर्ण घर सुरक्षित वाटायचं.. खूप सुंदर असा तुमचा हा लेख …एक एक शब्द मनाच्या आत खोलवर  उतरून जाणारा… तुमच्या या सदर मुळे जुन्या काळचा मुंबई किंवा महाराष्ट्र जाणायला मिळतो.. त्या वेळची परिस्थिती , काही पदार्थ, एकमेकांमध्ये असलेलं अनामिक नातं , नात्यांची ओढ आणि या सगळ्याला तुमच्या शब्दांची जोड …अतिशय सुंदर.. खूप छान ..पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत..
— मानसी म्हसकर. बडोदा

Radhika tai Kay shabdanch bhandar aahe tumchyakade wachtanna aamhala  tya soneri kalat gheun jata n tumchi hikatha samplya nanter bhanavar yeto. kharch khoopch chhan 🙏🏻🙏🏻👌👌👍🏽👍🏽
(राधिका ताई काय शब्दांचे भांडार आहे तुमच्याकडे वाचताना आम्हाला त्या सोनेरी काळात घेऊन जाता तुम्ही आणि कथा संपल्यानंतर भानावर येतो– खरंच खूप छान)
— मीना वाघमारे. अमरावती

कुमुद आत्या वाचून मन सुन्नं झालं. आपली अत्यंत लाडकी आत्या. तिच्या फोटोकडे पाहूनच ढसढसा रडू येऊ लागलं. आईचं आणि कुमुद आत्याचं नातं तू फारच छान शब्दांतून व्यक्त केलं आहेस.
खरंतर तिच्या रोगाचं निदान आईनेच केलं.
अरूणला कुमुद आत्यानेच जीवदान दिलं. सगळे प्रसंग पुन्हा चित्रीत झाले.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका

तुझी व्यक्तीचित्रणं खूप च प्रभावी पद्धतीने रेखांकित झाली आहेत.
वाचताना मनाला स्पर्शून जातात.
— जयश्री भिसे. चेंबूर

कुमुद Atya 👌🏻👌🏻 फारच छान.
मृणाल पोरे आपल्या शाळेत होती ना ? मला आठवते.
— सुषमा पालकर. पुणे

१०
नेहमीप्रमाणेच भावस्पर्शी!
— आरती नचनानी. ठाणे

‘पालकत्व एक कला’
हट्ट आणि बालक
खूप सुंदर माहितीपूर्ण लेख. अगदी खरे आहे आपण बालकांच्या समस्यांकडे अगदी सहजतेने बालहट्ट म्हणून बघतो. पण त्यामागे सुद्धा एखादे कारण असेल हे लक्षातच येत नाही.
— अरुणा गर्जे. नांदेड

माधुरी ताम्हणे यांच्या माध्यम पन्नाशी : १४  वर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया…

माधुरीताई, तुमचा लेख वाचला. पन्नास वर्ष मुद्रित माध्यमातील तुमच्या मुक्त संचाराचे खरच कौतुक करावे तेवढे कमीच होईल. बदलत्या स्वरूपाशी जुळवून घेत, माध्यमात तुम्ही स्वतःला झोकून दिलेत, रमलात, आनंद घेतलात !! खूप अभिनंदन !!
लेख वाचून मी भूतकाळात गेले. १९८७ साल आठवले.माहेर पाक्षिकाच्या फेब्रुवारीच्या अंकातील माझी तुम्ही घेतलेली मुलाखत आठवली.”दिशाहीन वाटचालीला हेतुंचा संदर्भ चिकटलेला नसतो” हे सुरुवातीचे वाक्य अजून पाठ आहे.
आयुष्यात प्रथमच ६ पानांची मुलाखत !! तीही सुप्रसिध्द माहेरच्या अंकात !! किती भाग्यवान होते मी. त्या अंकाचे मुखपृष्ठ,आतल्या मुलाखतीची पाने अजूनही मी जपून ठेवली आहेत,त्यांना लॅमिनेशन करून. पु. वि.बेहेरे आणि सुमनताई बेहेरे माझे शेजारी होते हा देखील सुयोगच होता. या मुलाखतीमुळे च माझे खडतर जीवन लोकांना समजले. ते कागदावर ठराविक, मोजक्याच शब्दात मांडावे लागले तरी, तुम्ही खूपच सुंदर लेखन केलेले आहे. वाचल्यावर अनेकांच्या कौतुकाची थाप माझ्यावर पडली. नवीन नवीन लोकांचा परिचय झाला.अनेक पुरस्कार मला मिळाले.
तुमच्या लेखन कलेला मानाचा मुजरा !!! 🙏🙏🙏
धन्यवाद.
— आशा शिंदे. पुणे

खूप तरल अनुभव ,ओघवती भाषा, संवेदनशील प्रामाणिक मन यांच्या मिश्रणाचा परिपाक असलेला लेख मनापासून आवडला.
— अनुराधा चौधरी. कोल्हापूर

तुम्ही शब्दांकन केलेला लेख वाचला. विशेष म्हणजे माझ्या मावसदिराने अमेरिकेतून मला पाठवला. लेखात शब्दांकित केलेल्या पॉझिटिव्हिटीचा आमच्या कुटुंबाच्या सध्याच्या मनस्थितीत खूप फायदा होईल.
— रेशमा कुलकर्णी. ठाणे

खूप छान माधुरीताई. तुम्हाला असाच लेखनातून आनंद मिळत राहो.
— आरती कदम. संपादिका चतुरंग पुरवणी, लोकसत्ता

तू समोरच्या व्यक्तीचं शांतपणे ऐकून घेतेस. त्यांना व्यक्त होऊन देतेस. नंतर तेच सर्व आमच्या पुढे मांडतेस. त्यामुळे आमच्या सारख्या सामान्य माणसांना बऱ्याच गोष्टी कळतात. अशा दुर्लक्षित व उपेक्षित लोकांना आपली व्यथा कोणीतरी समजून  घेतली याचं किती बरं वाटत असेल !
— नीलिमा पाणसरे. दादर

खूप सुंदर व सखोल लेखन. सूक्ष्म निरीक्षण आणि वास्तववादी परीक्षण. अशाच लिहीत रहा. आमच्या शुभेच्छा !
— गिरीश ताम्हणे. ठाणे

सगळे लेख खरंच छान असतात. मी नेहमी  वाचतो. बऱ्याचदा तर visualise होतात गोष्टी! काही वेळा नवीन शब्द सुद्धा कळतात. काही गोष्टी पाहिलेल्या अनुभवलेल्या असतात .त्या जास्त भावतात. एक परिच्छेद तर एकदम सटीक म्हणतात तशातली गोष्ट प्रकर्षाने जाणून देणारा होता.
— शौनक ताम्हणे.  पुणे

वा ! तुझी भाषा जबरदस्त आहे. इंग्रजी माध्यमातल्या आम्हा मुलांना कळायला थोडी कठीण आहे.
— प्रसाद देशमुख. पुणे

आपल्या भावना प्रकट करता येणं ही पण एक कला आहे. ती देवाने तुला नक्कीच दिलेय. भावना प्रगट करण्यासाठी आधी ती व्यक्ती समजून घ्यावी लागते आणि त्यासाठी अत्यंत संवेदनशील मन असावं लागतं. ते सहजी होत नाही. साधारणपणे निसर्गाशी एकरूप होण्यात ज्याला खरा आनंद सापडतो त्याच्यात ही संवेदनशीलता असते. तुझे लेख वाचून असं वाटतं तू फक्त माणूस वाचत नाहीस. तर तो ज्या समाजाचा आहे तो समाज वाचण्याचा, अभ्यासण्याचा मनापासून प्रयत्न करतेस. आपला मी पणा थोडा दूर सारला की तार छान जुळते आणि मैफिल मस्त रंगते. तू मुलाखत घेताना स्वतःला विसरून जातेस असं वाटतं. म्हणूनच आम्ही वाचक त्यात गुंतत जातो. लेख नेहमीप्रमाणे अप्रतिम आहे. तुझ्या लेखाला प्रतिक्रिया देण्याची आमची खरतर कुवत नाही. पण तुझ लिखाण इतका भावतं की लिहिल्या शिवाय राहवत नाही.
— श्यामा कुलकर्णी. ठाणे
१०
तुमच्या लेखामुळे अंध व्यक्ती ही आपले जीवन महतप्रयासाने, स्वावलंबीपणे आनंदाने जगतात हे समजले. हे वाचून इतर पालकांनी आपल्या मुलांना कसे वागवावे त्याचे मार्गदर्शन मिळेल असं वाटतं.
— श्रीमती परुळेकर. ठाणे
११
खूपच छान लेखन.
दरवेळी नवीन विचार सापडतात.
— सुनिता कदम. ठाणे

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !