Tuesday, November 12, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक

१. “एकल महिलांनी साजरी केली वट पौर्णिमा”
खूप चांगला विचार या लेखात मांडला आहे. समाजात अशा नव्या विचारांचे स्वागत करायला हवे.
— मेघना साने. ठाणे.

२. एकल महिलांची वटपौर्णिमा खूप छान उपक्रम.
— मीना खोंड. हैद्राबाद.

३. दिलीप गडकरी यांचा लेख खूप छान आहे. जेव्हा आपण विकासाच्या नावाखाली ही झाडे तोडतो तेव्हा अतिशय दुःख होते. पुण्याच्या पश्चिमेकडे एक रस्ता आहे. फक्त आणि फक्त वटवृक्षांनी भरलेला.
मी त्याचे नावच वटवृक्षवाट असे ठेवले होते प्रेमाने. त्या वाटेने जायला मला फार आवडत असे. आता परवा तिकडून गेले तर पाहिलेले  दृश्य डोळ्यात पाणी आणणारे होते. त्या वाटेची “वाट” लागली होती. मोठं मोठाले 100, 200 वर्ष जुने वृक्ष मुळासकट उपटलेले. गडकरीजींच्या लेखाप्रमाणे किती लक्ष रुपयांचे ऑक्सिजन आपण हरवून बसलो आहोत !
मेरा जूता है जापानी.. हे सर्व भाग मी आवर्जून वाचतेय. आवडतात. छान माहिती मिळतेय.
प्रा.पांढरीपांडे यांचा लेख खूप आवडला. ते म्हणतात ते खरेच आहे. आपल्याला उद्योगी तरुण पिढी निर्माण करायची आहे, आळशी नाही. प्रलोभनामुळे मिळणारा आनंद तात्कालिक असतो. शाश्वत नसतो. पण सुजाण नागरिक कसे असतात, कुठे मिळतात हे विचारावेसे वाटते खेदाने.
— स्वाती वर्तक. मुंबई

४. भारतीय नागरिकाला मंडेला जीवन गौरव पुरस्कार मिळाला याचा अभिमान वाटला. दिलीप गडकरी यांचा वटपौर्णिमेवरचा विचार आवडला.
— विलास प्रधान. मुंबई.

५. मानसशास्त्रज्ञ फ्राॅईड ह्यांच्या ग्रंथाचा अतिशय सुंदर अनुवाद असलेले “स्वप्नमीमासा” हे पुस्तक श्री.सुधाकर तोरणे सरांनी उत्तम परिचय करून दिल्यामुळेच वाचकांपर्यंत पोहोचले आहे. त्यासाठीच तोरणे सरांचे हार्दिक आभार आणि अभिनंदन.
आजचा संपूर्ण अंक अतिशय उत्तम आणि वाचनीय आहे. 
— मृदुला राजे. जमशेदपूर

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments