Friday, February 7, 2025
Homeलेखविजयादशमी

विजयादशमी

नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाच्या देवी विषयी माहिती, तीचे वैशिष्ट्यं याविषयी पौर्णिमा शेंडे यांनी नऊ दिवस छान दिली. आज वाचू या विजयादशमी अर्थात दसरा या सणाचे महत्त्व. आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

आदिमाता, आदिशक्ती दुर्गादेवीने नऊ दिवस, नऊ अवतार घेऊन दुर्गासुराला मारले तेव्हा सर्व प्रजाजनांना, ॠषीमूनीना अत्यानंद झाला. तेव्हा जय जय दुर्गा माता, चामुंडा माता, भवानीमाता, कालिमाता अशा नावांनी, अशा हाकांनी देवीचा मोठा जयजयकार केला. हे प्रचंड युद्ध घनदाट रानात झालं. नऊ दिवसाच्या अथक युद्धांनी देवीच्या अंगाची लाही लाही होत होती.

दहाव्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध दशमीला दुर्गासुरावर म्हणजेच महिषासुरावर विजय मिळवला. म्हणून दशमीला विजयोत्सव साजरा करण्यात येतो. ती ही विजयादशमी, म्हणून ‘या दशमीला “विजयादशमी

तेथे रानात आजूबाजूला झेंडू आणि तिळ ही रानफुले फुलली होती. ॠषिमुनी रोज नविन नविन अशी रानफुलाची चढती माळ देवीसाठी बांधू लागले. अखंड नंदादीप तेवत ठेवले जाऊ लागले. संतप्त झालेल्या देवीच्या अंगाची आग कमी व्हावी म्हणून ऋषिमुनींनी तेथे उगवलेला हिरवागार आघाडा, दूर्वा आणि अन्य फुलांची लाखोली देवीला वाहिली, सप्तशतीचा पाठ ऋषिमुनींनी सुरू केले. अनेक प्रकारचे प्रसाद देवीसाठी नेवैद्य म्हणून दिले. दुर्गादेवी शांत शांत झाली.

कुठल्याही क्षेत्रात विजय संपादन करीत असताना काही साधनांचे म्हणजे काही वस्तुंचा वापर केला जातो देवीचे वाहन वाघ, सिहं, बैल, अश्व यांची पुजा करतात. तसेच देवीची विविध शस्त्रे शंख, धनुष्य, बाण, तलवार, भाला, त्रिशूल, ढाल, गदा अशी विविध अवजारे, आयूधं म्हणून लागतात. अशा साधनांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजा केली जाते. तो दिवस म्हणून ‘विजयादशमी’. यालाच दसरा म्हणतात.

ऐतिहासिक काळात राजे स्वारीला निघत तेव्हा परमूलखाची लुटून आणलेली संपत्ती धनरूपी आणत ही संपत्ती सुवर्णाची असे. ते सोने देवाला वाहत. त्याचे प्रतिक म्हणुन ‘आपट्याची पाने’ सोन्याची पाने कल्पून ती देवीला अर्पण करतात. एकमेकांना देतात घेतात. दसऱ्याला शमीची पूजा करतात कारण शमी पापांचे क्षालन करते.

दसरा हा सण सरस्वती पूजनाचा दिवस आहे. लहान मुलं पाटीवर सरस्वतीदेवीची प्रतिकात्मक चित्र काढून पूजा करतात. शिक्षण घेणारे विद्यार्थी अभ्यासाची वह्या, पुस्तकाची पूजा करतात.

दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. नविन कामाची सुरवात या दिवशी करतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन व शस्त्र पूजन केले जाते.

भारतात विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने दसरा साजरा केला जातो. दक्षिण आणि पूर्वेकडे दुर्गादेवीची पूजा करतात. विजय मिळवून धर्माचे रक्षण केले म्हणून दसरा सण साजरा करतात तर उत्तर मध्य आणि पश्चिम राज्यात रामाने रावणावर केलेल्या विजयाचा सण म्हणून रामलीला नाट्य करत दसरा सण साजरा करतात.
दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा.
आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

पूर्णिमा शेंडे.

— लेखन : पूर्णिमा शेंडे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. पूर्णिमा शेंडे ह्यांनी सलग नऊ दिवस देवीच्या विविध रुपांची माहिती देत,समारोपाला विजया दशमी सणाचे महत्त्व छान शब्दात वर्णन केले आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना व न्यूजस्टोरी च्या संपादक वर्गालाही विजया दशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on रेषांमधली भाषा : १०
प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी