महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातर्फे 15 जुलै रोजी जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या आयटीआय प्रशिक्षणार्थींचा सन्मान सोहळा, नुकताच एलफिस्टंट तांत्रिक विद्यालय परिसरातील राज्य नाविन्यता सोसायटी येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आयटीआय ह्या संस्थेतून यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्याबरोबरच या संस्थेतून बाहेर पडून आपल्या कौशल्यात वेगळा ठसा उमटवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
मुंबई दूरदर्शन केंद्राच्या लोकप्रिय रंगभूषाकार शिवानी यांचाही ह्या वेळी सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच या विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त निधी चौधरी, कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर, संचालक दिगंबर दळवी यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य व कौशल्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
अल्प परिचय
शिवानी गोंडाळ या गेली २८ वर्षे दूरदर्शन केंद्रात रंगभूषाकार म्हणून काम करीत आहे. या बरोबरच त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कौशल्याचा ठसा उमटविला आहे.
दूरदर्शनच्या सहकारी पत संस्थेच्या अध्यक्ष म्हणून काम पाहतानाच दूरदर्शनच्या क्लब च्या उपाध्यक्ष म्हणून त्या काम करत आहे. त्या एक रंगभूमी कलका असून, व्हॉइस ओव्हर तसेच वेगवेगळ्या मासिकांमधून हिंदी व मराठी कविता लेखन ही करत असतात. रंगभूषा या विषयावर वेगवेगळ्या मासिकांमधून त्यांनी लेखन केले असून गेली दोन वर्ष त्या याच विषयावर ‘सामना’ या वर्तमानपत्रातून लेखन करीत होती.
दूरदर्शनवर नौशाद अली, आशा भोसले ,अनुपम खेर, पद्मिनी कोल्हापुरे, यामी गौतम, मनोज वाजपेयी, आशिष विद्यार्थी, सुबोध भावे, तेजश्री प्रधान, अदिती सारंगधर, सोनाली कुलकर्णी अशा अनेक मराठी व बॉलीवूड कलाकारांची रंगभूषा त्यांनी केली असून, श्री गौतम राजाध्यक्ष या जागतिक कीर्तीच्या छायाचित्रकारा बरोबर त्यांनी एका मासिकाचे मुखपृष्ठही केले आहे.
शिवानी यांनी दूरदर्शनवर रंगभूषा करत असतानाच वेगवेगळी कौशल्य अनुभवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रंगभूषा केल्या आहेत. ब्रायडल मेकअप, मासिकांचे मुखपृष्ठ, कालनिर्णय सारख्या अनेक जाहिराती, महाराष्ट्र टाइम्स मधील नऊ दिवसांचे “नवरंग” व महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकातील ‘अ ट्रीब्युट’ म्हणजेच नवीन कलाकारांना जुन्या कलाकारांचे रूप देऊन त्यांना दिलेली मानवंदना अशा प्रकारची विविध कामे केली असल्यामुळे कौशल्य विकास आयुक्त निधी चौधरी यांनी त्यांचं हे कौशल्य ओळखून त्यांचा सन्मान करायचं ठरवलं.
एखाद्या व्यक्तीमधील कौशल्य ओळखून त्याचा योग्य प्रकारे सन्मान करण्यासाठी योग्य अधिकाऱ्यांची गरज असते असं शिवानी यांना वाटतं आणि त्यासाठी त्या आयुक्त निधी चौधरी मॅडमचे मनापासून आभार मानतात. तसेच दूरदर्शन मध्ये काम करत असताना दूरदर्शन चे तत्कालीन अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, डॉ शैलेश श्रीवास्तव यांचेही त्या मनापासून आभार मानतात कारण आपल्या कामाला ओळखणाऱ्या व आपल्याला पाठिंबा देणाऱ्या व्यक्ती असल्याशिवाय आपल्याला कधीच पुढे जाता येत नाही. तसंच योग्य गुरू मिळाल्यामुळेच त्या या क्षेत्रात उत्कृष्ट काम करू शकल्या, असं त्या म्हणतात. यासाठी त्या त्यांचे राज्य पुरस्कार प्राप्त गुरु प्रभाकर भावे, संपदा जोगळेकर, मिकी कॉन्ट्रॅक्टर यांना मनःपूर्वक धन्यवाद देतात.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
– “I’m constantly amazed by your talent and perseverance. You deserve every bit of this success!”
Kharach kup kup abhinandan….
…tai
अभिनंदन खुप छान ताई तुझा आम्हाला खुप अभिमान वाटतो, 🙏
Shivani Tai khup sunder makeup kartat but khu chan personality pan ahet. Premal ahet ani kamat ekdum perfect.
Congratulations Shivani. आम्ही तुमचा मेकअप अनुभवला आहे. उत्कृष्ट
Congratulations