डोलत, प्रकृतीच्या सूर, लयीत
मौनाचे स्पंदन, आकारे संगीत
जीवनाची ही कविता मुग्ध प्रीत
आनंदाची ठेव, मनाच्या कुपीत
संगीत अलवार, हृदयस्पर्शी असे
कलाकारांच्या जीवनाचे खरे आरसे
विसरुनी हुरहूर, तमा, दुःख जसे
संगीताविना विश्व हे अपूर्ण भासे
तबल्याचा ठेका वाजे ताक धिन
सतारीची तार छेडी सुरेल वीण
सुरांच्या लहरी जणू समुद्राची गाज
कधी उधाणलेले तर कधी शांत,शांत
सत्य, सुंदर, शिव असे संगीत
शाश्वत, दिव्य, अमर्त्य ते सत्य
चमचमणारे आभाळी तेज नक्षत्र
जोडती मने विसरुनी जात पात
प्रेरणादायी, उर्जादायी सुरेल संगीत
अभंग, आलापी वा असो भक्तिगीत
विश्वात भरून राहे, सूर अनाहत
उपकार त्याचे आम्हांवरी अनंत
— रचना : सौ.स्वाती वर्तक. खार(प), मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800