Wednesday, September 11, 2024
HomeUncategorizedसमाज सेवेसाठी एक पाऊल पुढे…

समाज सेवेसाठी एक पाऊल पुढे…

पर्यावरण आणि मानवतेच्या सेवेसाठी उभी राहिलेली हृदया आणि पर्यावरण संशोधन संस्था ही संस्था आजच्या काळातील एक महत्त्वपूर्ण गरज ओळखून स्थापन करण्यात आली आहे. वाढत्या पर्यावरणीय समस्यांचा सामना करताना मानवाचा निसर्गाशी असलेला संबंध सखोल अभ्यासून, संस्था एक सशक्त आणि शाश्वत भविष्य घडवण्याचा संस्थेचा संकल्प आहे.

संत-महात्मे, सिद्धगुरू आणि सिद्धपुरुषांच्या कृपा आशीर्वादाने स्थापन झालेली ही संस्था “वसुधैव कुटुंबकम” हे ध्येय आणि “सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः।” हे उद्दिष्ट घेऊन प्रेम, करुणा, एकता या सद्गुणांच्या आधारे कार्यरत आहे.

कार्य आरंभ सोहळा

१५ ऑगस्ट २०२४ रोजी हृदया आणि पर्यावरण संशोधन संस्थेचा अधिकृत कार्यारंभ सोहळा सिद्धायोगी सद्गुरू श्री झिपरूअण्णा महाराजांच्या पवित्र आणि भव्य चित्राचं लोकार्पण करून करण्यात येणार आहे. हे चित्र प. पू. झिपरूअण्णा महाराज स्मारक समिती, झिपरूअण्णा नगर (नशिराबाद), जि. जळगाव यांना अर्पण केले जाईल. हा सोहळा संस्थेच्या भविष्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल ठरेल, जिथे पर्यावरण आणि मानवतेच्या संवर्धनासाठी संस्थेच्या भविष्यातील कार्याची सुरुवात होईल. या शुभप्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहणे आणि आशीर्वाद देणे हीच संस्थेची अपेक्षा आहे.

संस्थेची ध्येय आणि उद्दिष्ट

हृदया आणि पर्यावरण संशोधन संस्थेचा मुख्य उद्देश आहे मानवता आणि पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाद्वारे एक आनंदी आणि सशक्त समाज निर्माण करणे. “वसुधैव कुटुंबकम” या विचारसरणीवर आधारित, संस्थेने जगातील प्रत्येक जीवासाठी सुख-समृद्धी आणि शांततेची दिशा आखली आहे.

विविध उपक्रम

हृदया आणि पर्यावरण संशोधन संस्था ही फक्त एक संस्था नाही, तर एक चळवळ आहे जी प्रत्येक हृदय आणि पर्यावरणाशी जोडलेली आहे. संस्थेचे उद्दिष्ट आहे की, प्रत्येकाचे जीवन अधिक निरोगी, सुखदायी आणि पर्यावरणपूरक बनवणे. मानवता आणि पर्यावरणाच्या दिशेने एक पाऊल उचलत संस्था खालील सात उपक्रम निस्वार्थपणे राबवणार आहे:

१. हृदया बालगोपाल: मुलांचे पोषण आणि त्यांच्या भविष्याचा आधार.
२. हृदया शक्ती:महिलांचे सबलीकरण आणि आत्मनिर्भरता.
३. हृदया शिव: पुरुषांचे सशक्तीकरण आणि संवेदनशीलता.
४. हृदया सृष्टी: निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरणाची जपणूक.
५. हृदया आरोग्य सेवा: आरोग्याचे रक्षण आणि जीवनाची गुणवत्ता वाढवणे.
६. हृदया विद्या दान: ज्ञानाचे संवर्धन आणि भविष्याची दिशा.
७. हृदया संस्कृती: सांस्कृतिक वारसा संवर्धन आणि समाजाचे सशक्तीकरण.
चला, आपल्या सहकार्याने या चळवळीचा भाग बनू या आणि एक चांगले आणि सशक्त भविष्य घडवू या.

संस्थेच्या या निःस्वार्थ महान कार्यात आपले स्वागत आहे. आपण आर्थिक सहभाग देऊ शकता. आपल्या आर्थिक मदतीने या उपक्रमांचे कार्यक्षेत्र वाढवता येईल आणि त्यातून समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सुधारणा घडवता येईल.

हृदया आणि पर्यावरण संशोधन संस्थेत आपले प्रेमाने स्वागत आहे. चला, आपण सर्वजण एकत्र येऊन एक सुंदर, सशक्त आणि शाश्वत भविष्य निर्माण करूया. संस्थेच्या या मार्गदर्शनाखाली, प्रत्येकाचं जीवन एक नवीन दिशा आणि उंची मिळवेल. आपला प्रत्येकाचा सहभाग हा एका सकारात्मक परिवर्तनाची सुरुवात आहे. ठरलं तर मग, एकत्र येऊ, भविष्य घडवू, मानवता आणि पर्यावरण टिकवू.
ll शुभं भवंतु ll

— लेखन : अतुल सोनवणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments