दिवाळी निमित्ताने सातारा जिल्हा कारागृहात बंदीवानांसाठी अहमदनगरची सामाजिक संस्था कला विश्व प्रतिष्ठान प्रस्तुत व संयुक्त सुरसंगम संगीत समुह तर्फे संगीतमय कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, हरहुन्नरी कलाकार हेमंत दंडवते व सह गायक, गायिका सौ अश्विनी वैद्य, सौ श्रध्दा देशपांडे, श्री
किशोर बन्साेडे यांनी म्युझिक थेरपी व्दारे जुन्या मराठी-हिंदी चित्रपटातील उडत्या चालीचे गीत, भजन, भावगीत इ. अशा
विविध संगीत शैली प्रकाराचे गीते सुमधुर आवाजात सादर केलीत. तसेच कारागृह शिपाई प्रभाकर माळी यांनी देखील दोन गाणी गायली.

संगीत रजनी सुरूवात कानडा राजा पंढरीचा, अप्सरा आली, दिल की आवाज भी सून, हि गुलाबी हवा, चोरीचा मामला मामाही, खईके पान बना रस वाला, पुकारता चला हू मैं, बेबीब्रिंग ईट ऑन, दम मारो दम इ. गाणी सादर केली.
कारागृहातील एकूण ३५० बंदीवानांनी दाद देऊन मनमुराद आनंद घेतला व ताणतणाव दूर झाल्याचे अनुभवले.

या वेळी सातारा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे यांनीही गीत गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. भारतीय संगीत किती मधुर व हृदयास भिडणारे,त्यातले भाव हे सर्व गायकांनी त्यांच्या गायकीतून दाखवून दिले.
कारागृहातील बंदीवानांचे खूप छान मनोरंजन झाले. संगीताचा मानवावर प्रसन्न व आनंदी परिणाम होत असतो. भविष्यात अशीच संगीत सेवा घडत राहो अशी आशा व्यक्त करून सर्व गायकांचे आभार मानले.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800