Thursday, May 30, 2024
Homeबातम्यासावित्रीच्या लेकींचा सन्मान

सावित्रीच्या लेकींचा सन्मान

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईतील सानपाडा येथील, विवेकानंद शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वसा पुढे नेणाऱ्या, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री रमेश पतंगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री रमेश पतंगे, साप्ताहिक विवेकचे संपादक श्री रविंद्र गोळे, छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ नंदकिशोर जोशी, संस्थेचे उपकार्याध्यक्ष श्री विश्वास सोनवणे, संस्थेच्या चिटणीस सौ मीनाक्षी गागरे व सौ भारती वेदपाठक हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, सामाजिक व स्त्री-मुक्ती आंदोलने या दिशादर्शक कार्याचा वसा सहेतुक व डोळसपणे पुढे चालविणाऱ्या सौ सुवर्षा सागवेकर, श्रद्धा चौगुले, हिरा धोत्रे यांनी तुर्भे येथील झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना संस्कारक्षम कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेत अध्यापनाचे कार्य करता करता वंचित, वनवासी विद्यार्थी स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे केले व समाजातील स्त्री सक्षमीकरण करण्याच्या कामी पुढाकार घेण्याचे दिशादर्शक कार्य केल्याबद्दल सौ उर्मिला जाधव विद्यामंदिर मांडा टिटवाळा तसेच सौ शुभांगी भोसले नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण यांचाही सन्मान श्री पतंगे सरांच्या हस्ते करण्यात आला.

कष्टप्रद व बिकट परिस्थितीत कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या प्रसंगी उपासमार सोसून आपली मुले मोठी करणाऱ्या माता पालक श्रीमती मानसी पाटणे व सौ शुभा थाटे यांचाही सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर जोशी यांनी प्रत्येक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करणे हा संस्कृती जोपासण्याचा भाग आहेच पण संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. यापुढेही असे पथदर्शी कार्य करणाऱ्या मातृशक्तीला वंदन म्हणून हा सन्मान सोहळा मोठ्या स्वरूपात करण्यात येईल, असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पदमश्री रमेश पतंगे यांनी आपल्या मनोगतात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य जपस्थितांना मोजक्या शब्दात सांगितलेच त्याचबरोबर भारतीय संविधान निर्मितीसाठी ज्या 15 स्रियांनी योगदान दिले आहे त्यांच्याबद्दलही महत्वपूर्ण माहिती दिली. केवळ भाषणांमधून या थोर विभूतींचा गौरव करून न थांबता त्यांच्या विचारांचे आचरण करण्याचा मौलिक मार्गदर्शक अपेक्षाही व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून ऍडव्होकेट स्वाती खरे, ऍडव्होकेट शीतल मॅडम, सौ अलका भुजबळ मॅडम सौ स्वाती टिल्लू व श्री अभिजित लांमतुरे हे उपस्थित होते.

या कर्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री विलास वाव्हळ यांनी केले तर श्री अविनाश ठाणगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला .सौ स्वाती इंदोरे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

विलास वाव्हळ

— लेखन : विलास वाव्हळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments