१. तिरंगा
तिरंगा झेंडा आमचा फडकत राहो नभात
वीरांच्या बलिदानाने आली सुखमय प्रभात ॥धृ॥
तिरंगी झेंड्याचा पाहु आज आपण इतिहास
केशरी रंग त्याग धैर्याचा बोध होतो आम्हास
हिरवा रंग निर्सगाचा घनिष्ट आमचे नाते
कृषिप्रधान देश धाण्याची समृध्दी दर्शवते
रंग पांढराशुभ्र सत्य शांती पवित्रतेचा
निळ्या रंगाचे अशोक चक्र विश्वशांतीचा
चोवीस आर्या पुढे पुढे प्रगती सुचित करते
इतिहास संस्कृती तत्वज्ञाचे संगम दिसते
स्वातंत्र्यासाठी लढले हिंदू मुस्लिम सिख ईसाई
एकतेने बंधूत्वाने केली इंग्रजांची पिटाई
भारतीय होण्याचा आम्हा मुलांना अभिमान
जन गन मन राष्टृगीत, आमचे आहे गान
बंधू भावाने रहातो आम्ही मानत नाही जात
तिरंगा झेंडा आमचा फडकत राहो जगात
–– रचना : अनिसा सिकंदर शेख. ता.दौंड जि.पुणे
२. स्वातंत्र्य
गुलामगिरीतूनी झालो स्वतंत्र
संविधानाने दिली समानता, न्याय
सत्य निष्ठा, आरोग्यसेवा सुविधा
केली प्रगती सर्व क्षेत्रात ||१||
आज स्रीवरी होतो अन्याय
तिचा जन्म ठरतो मरण
सर्व क्षेत्रात तिची धडाडी
तरी घरात तिचे सरण ||२||
बळिराजाचा रोजचा बळी
सैन्य रोजच पडे शत्रूस बळी
युवा पिढी पैश्यामागे धावे
मनोरूंग्ण नायक, नायिका मरती ||३||
नशेने डुंबली युवा पिढी
वृध्दाश्रमाच्या वाढती छत्र्या
परदेशात ज्ञानाची किंमत
भारतात ज्ञानाकडे पाठ ||४||
विकासाच्या प्रवाहात जो न आला
त्याला द्याना लाभाची वाट
ज्ञाना समोरी समान सारे
देशसेवा करा सक्तीची बात ||५||
महागाई,मंत्र्यांचे अव्यापार
टाळा आता, न्याय वाढा समान
भ्रष्टाचार टाळा योग्यतेने पद भरा
तरच स्वातंत्र्याचे करू अमृतपान ||६||
— रचना : अंजली सामंत. डहाणू
३. माझी भारतमाता
भारत देश महान, अमुचा
भारत देश महान //
उत्तरेस हा नगाधिराज
गगन चुंबितो हा हिमराज
भारतभूचा हा शिरताज
विशाल उंची सांगे याची, ताठ आमुची मान //
मातेसम त्या यमुनागंगा
सुजल सुफल करिती निजअंगा
अंतरी त्यांच्या जीवनगंगा
नुपुर पदींचे झंकारित त्या,गाती जीवनगान //
असे भूमी ही शूरवीरांची
खाण असे ही नररत्नांची
नसे वाण त्या संतजनांची
शपथ आम्हांला तव कीर्तीची, जगी वाढवू शान //
— रचना : स्वाती दामले. बदलापूर
४. सुजलाम सुफलाम
अभिमान आम्हाला आम्ही भारती,
उज्वल उन्नत आहे, आमुची संस्कृती,
अस्थिर, शरीर मनाला, मूल्यांची जोड,
जगविख्यात आहे, हिंदू संस्कृती थोर,
अनेक संत महंत, नांदले, सुखाने येथे,
ऋषीमुनी कितीक, विद्वान नी द्रष्ट्रे होते,
संस्कृत भाषा ही जननी, बोलीभाषा कैक,
रामायण हा संस्कार, महाभारत धैर्य देख,
अभिमानाने सांगावे, कितीतरी ते येथे,
कला, काव्य बहरले, स्थापत्य,शल्य जेथे,
नृत्य नी गान निपुण, कलावंत कितीक,
प्रचंड ग्रंथ निर्मिती, भावात्मक नाटक,
सुदंर गिरिकंदरे, असंख्य नद्यांची खोरी,
विविधांगी किती प्रदेश, सौंदर्य मनोहारी,
ही धन्य धरती जेथे, मी जन्मलो, वाढलो,
वंदे मातरम् म्हणतो, मीच भारत झालो…!!!
— रचना: हेमंत भिडे. जळगांव
५. तिरंगा
हर घर तिरंगा
यही हैं आजका नारा
हर एकको प्यारा
भारत देश हमारा
तीन रंगोंसे रंगा तिरंगा
शांती प्रेम सृजन का धागा
अपनी ये पहचान है
भारत के हम संतान है
अभिमान है तिरंगा
स्वाभिमान है तिरंगा
वतन पे जो फिदा बंदा
वो हर नौजवान है तिरंगा
आन नही है शान नही है
ये तो हमारी जान है
सलाम इस तिरंगे को
प्रणाम वो बलिदानीयों को
सर झुके बस उनकी शहादत मे
जो शहीद हुए हमारी हिफाजत मे
जय हिंद वंदे मातरम्
–– रचना : मीरा जोशी. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800