Monday, February 17, 2025
Homeलेखहवा हवाई : २१

हवा हवाई : २१

“मन मे है विश्वास”…

सोनी टिव्ही वहिनीच्या “मन मे है विश्वास “…या मालिकेतील एका भागात माझ्याबाबतीत घडलेल्या सत्यघटनेवर आधारित एक भाग प्रसारित करण्यात आला. त्यात मी (म्हणजे स्क्वाड्रन लीडर शशिकांत ओक) पुण्याच्या हवाईदलाच्या केंद्रातून दिल्लीला २६ जानेवारीच्या परेडमध्ये सहभागी व्हायला जातो, शिवाय एका सीक्रेट मिशनवर गेलेला असताना त्याच्याकडून काही गफलत झाल्यामुळे कोर्ट ऑफ एन्क्वायरीची आफत येते. ते प्रकरण कोर्ट मार्शल होण्यापर्यंत जाणार हे दिसू लागते. कोर्ट मार्शल म्हणजे एखाद्याची हवाईदलातून निंदापूर्वक हकालपट्टी. ते कसे असते ? हे आपण आधीच वाचलेले आहे. तीच वेळ माझ्यावर येऊन ठेपली होती.

परंतु गुरुदत्तात्रेयांच्या कृपा आशीर्वादामुळे माझ्यावरील बदनामी आणि हकालपट्टीचे ते वादळ संपले आणि माझ्यावरील किटाळ नष्ट झाले. ही सत्य घटना होती आणि म्हणूनच सोनीच्या त्या मालिकेत दाखवली गेली. शेवटच्या प्रसंगात नाट्यमयता येण्यासाठी म्हणून घेतलेले प्रसंग सोडता जसे घडले तसेच त्यात दाखवलेले आहेत. त्याची व्हिडिओ क्लिप पुढे सादर केली आहे. ती आपण जरूर पहावी.

https://www.facebook.com/share/v/18EiRoLWY5

या घटनेच्या संदर्भात सांगावेसे वाटते की तोपर्यंत माझा नाडी ग्रंथ भविष्य या विषयाशी परिचय झालेला नव्हता. परंतु
चेष्टेचेष्टेत बोलून गेल्यामुळे मला गुरुचरित्र वाचण्याची संधी मिळाली आणि नंतर दरवर्षी दत्त जयंतीच्या दिवशी पारायण करण्याचे गेले ४० वर्षे चालू आहे.

इथे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते की न्यूज स्टोरी टुडे या पोर्टलवर माझी ही जी हवाई दलावरील लेखमाला चालू आहे त्याचे सर्व श्रेय श्री देवेंद्र भुजबळ आणि सौ. अलका भुजबळ यांना जाते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे माझ्या हवाईदलातील आठवणींना खरोखर ऊत येत आहे. कधीही न आठवणाऱ्या घटना, जणू काही नुकत्याच घडले आहेत अशा रूपाने समोर येतात आणि आपल्याला सादर करण्यासाठी उत्सुक करतात. यामधूनच मला ई-बुक या स्वरूपात वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची इच्छा होते.

माझ्याकडून काम नाडी ग्रंथ महर्षी करवून घेतात अशी माझी धारणा आहे. त्यामुळे नाडी ग्रंथ महर्षींच्या आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कृपा आशीर्वादामधून माझ्यातून शिवाजी महाराजांच्या लढायांचे वर्णन केले जाते तर कधी गूढविद्या (ऑकल्ट सायन्स) मधून ऑटोराटिंगद्वारे मार्गदर्शन मिळते. भोज बेळगाव भागातील ज्ञान तपस्वी प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी लिहिलेल्या विज्ञान आणि बुद्धिवाद, विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन अशा पुस्तकांना ई-बुकच्या रूपात सादर करण्याची संधी प्राप्त झाली आहे. सध्या त्यांच्या एका लेखमालेतील भागातून पुनर्जन्म सिद्धांत हा डार्विनच्या उत्क्रांतीवादी सिद्धांताच्या पेक्षा कसा वेगळा आणि प्रगल्भ आहे हे दाखवून देणारे अनेक अनुभव त्यांनी त्यात वर्णन केलेले आहे. भारतीय तत्त्वज्ञानामधून या अजब आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा संदर्भ कसा लावायचा हे त्यातून स्पष्ट होते.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. वरील लिंक उघडल्यावर कार्यक्रम शुरू व्हायला 30 सेकंद थांबावे लागते. तसेच मधे मधे जेंव्हा जाहिराती दाखवतात तेव्हा पडद्यावर काही येत नाही. म्हणून वाट बघत राहावे. किंवा १० सेकंद करत पुढे ढकलत रहावे ही विनंती.
    विंग कमांडर शशिकांत ओक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments