Sunday, July 20, 2025
Homeसाहित्यहे असं कां होतं ?

हे असं कां होतं ?

देशाला हिरो मिळत असतांना,
जरा बरे दिवस येत असतांना,
भयानक आघात होऊन, हे असं …
कोलमडायला होतं…

हे असं कां होतं ?

कुटुंब प्रमुखाची भूमिका
समर्थपणे सांभाळतांना,
परिवाराचे रक्षण न करताच,
हे असं हिरोला अगतिकेने जावे लागले…

हे असं कां होतं ?

डॅाक्टर म्हणून जगायचंय,
पण संधीही न मिळता,
जगाचे मैदान … हे असं
भरल्या ताटावरून सोडावं लागलं,

हे असं कां होतं ?

सप्तपदी चालून साथ देतांना
स्वप्नातही नसतांना,
अखेरच्या क्षणी ही, हे असं
सतीसारखं जावं लागलं….

हे असं कां होतं ?

वैऱ्याच्या वाटेलाही येऊ नये
असे हे ज्वलंत मरण , हे असं …
देशाला चटका नी फटका
लावून जातं…

हे असं कां होतं ?

चित्रा मेहेंदळे

— रचना : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यमभूषण याकूब सईद
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक – देवेंद्र भुजबळ
कविता बिरारी on मम गाव राहिले दूर…..
प्राची उदय जोगळेकर on सांगा, कसं जगायचं ?