आज श्री गणेश जयंती आहे. त्यानिमित्ताने “श्री गणेश” तर उद्या माघ शुध्द पंचमी म्हणजेच वसंत पंचमी आहे. या निमित्याने दोन भक्ति गीते सादर करीत आहे. आशा आहे की आपण दोन्ही गीतांचे स्वागत कराल.
– संपादक
श्री गणेश
एकदंत तू गणनायक तू…
सिद्धिविनायक तू..
दे तू बुद्धी हे गणेश..
वक्रतुंड तू हे गणेश..
एकदंत तू गणनायक तू…….१
दे शांती तू आम्हा…
प्रति दिन येतो तुझ्या दर्शना….
वरदहस्त आम्हावरी…
तुझा असू दे आम्हावरी….
हे गणनायका…
एकदंत तू वक्रतुंड तू..
गणनायक तू सिद्धिविनायक तू……२
तो चरणी नतमस्तक आम्ही…
हे गणनायक शरण तुला रे…
शरण तुला रे गणनायका…
एकदंत तू गणनायक तू…
सिद्धिविनायक तू वक्रतुंड तू….३
काम क्रोध मद मत्सर नको आम्हा…
तसाच अहंकार नको आम्हा…
अशी सुबुद्धी दे रे…
सकाळ जना..
हे गणनायका सिद्धिविनायका..
एकदंत तू वक्रतुंड तू..
सिद्धिविनायक तू..
हे गणनायक तू… हे गणेश.. हे गणेश….४
माझ्या मनी वसु दे सदैव तू..
तिमिरातून प्रकाश उजळू दे..
सर्व स्वरूपी मिळू दे मजला…
गणेश हे सिद्धिविनायक….
एकदंत तू वक्रतुंड तू..
हे गणनायक तू सिद्धिविनायक तू…५

— रचना : शांतीलाल ननावरे. मुंबई/बारामती.
२
उद्या माघ शुद्ध पंचमी
म्हणजे वसंत पंचमी !!
या दिवशी पंढरी नगरीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा अत्यंत भक्ती, प्रेम रसात संपन्न होतो. त्या निमित्त श्री कृष्ण आणि रुक्मिणी विवाह गीत :-
पंढरी नगरी भरे भक्ती प्रेमाने l
लग्न मंडप बहु शोभे पुष्पालांकाराने ll
वाजंत्री आणि मंगलाष्टिका घोष ll
देखूनी दाटे मनी संतोष ll १ll
सुकन्या भीमक महाराजांची l
खाण असे सद्गुण आणि रुपाची ll
नाते शत शत जन्माचे जाणते l
प्रेम पत्र श्री कृष्णाला धाडते ll२ll
श्री विष्णू तू मी तव कमला l
युगे युगे जीव तव पदी वाहिला ll
मम बंधू ने अनर्थ केला l
शिशुपाल वर मजसाठी योजिला ll३ll
जाणुनी अंतर धावती भगवान l
करीतसे लीलया रुक्मिणी हरण ll
भीमक पित्याच्या हर्ष अति मनी l
जावई श्री कृष्ण लाभे म्हणुनी ll४ll
वसंत पंचमी या शुभ दिनी l
श्री कृष्ण रुक्मिणी विवाह बंधनी ll
शोभा यात्रा महाप्रसाद l
आत्मा परमात्माशी करी संवाद ll५ ll

— रचना : अलका मोहोळकर. पंढरपूर.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800