Sunday, April 20, 2025
Homeसाहित्य🌺मोदक🌺

🌺मोदक🌺

खोवले खोबरे, वेलची पुड
किसला गुळ, भाजली खसखस
बाप्पाच्या आवडीचे मोदक
करा सारे पटपट ||

घेतली उकड लाटली पारी
भरले सारनं वरती भारी
समोरासमोरची धरा टोके
बंद करा मोदकाचे डोके ||

तळहातावर फिरवा गरकन
होतील मोदक अगदी भरकन
सुरेख पाकळ्या निघती सरकन
गॅसवर पाणी ठेवा पटकन ||

चाळणी घ्या तेल लावा
ओळीत निट मोदक ठेवा
अलवार वरती झाकण ठेवा
पातेल्यावर छान उकड काढा ll

गरमा गरम मोदकावर
साजूक तुपाची पडता धार
घमघमाट जाई घरभर
बाप्पांबरोबर खुश सारे घरदार ll

आशा दळवी

— रचना : आशा दळवी. फलटण, सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. किती सुंदर काव्य मय रेसिपी वर्णन केली तुम्ही.! डोळ्या पुढे उभी राहिली. धन्यवाद..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता
शितल अहेर on काही कविता
मंदा विजय शेटे on अविस्मरणीय १० एप्रिल
शितल अहेर on ध्यानावस्था