Home बातम्या नेहा आणि शेखर… आनंदात विवाह संपन्न

नेहा आणि शेखर… आनंदात विवाह संपन्न

6

चि.सौ.का. नेहा स्मिता राजेंद्र भुजबळ आणि चि.श्री शेखर संगीता भानुदास शिंदे यांचा आंतरजातीय प्रेम विवाह अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ३० एप्रिल २०२५ रोजी अतिशय आनंदात, उल्हासपूर्ण वातावरणात सिन्नर येथे संपन्न झाला.

विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तीच एकत्र येतात असे नाही. तर दोन कुटुंब, त्यांचे नातेवाईक, मित्र, स्नेही असे सर्व मिळून एक नवा परिवार निर्माण होत असतो आणि तसाच तो व्हावा, असे मला तरी वाटते.

या दृष्टीने श्री शेखर आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी, सर्व नातेवाईकांनी इतक्या अगत्याने आगतस्वागत, सर्व व्यवस्था, दोन्ही कडची पाहुणे मंडळी, स्नेही, मित्रमंडळी या सर्वांच्या प्रेमामुळे मेहंदी, हळद, साखरपुडा, विवाह असे सर्व पारंपरिक कार्यक्रम, कार्यक्रमातील प्रत्येक क्षण कायमचा स्मरणात राहील.

https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2025/05/VID-20250502-WA0020.mp4
मेहंदी कार्यक्रमानंतर चा जल्लोष
https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2025/05/VID-20250502-WA0019.mp4
हळद नाचविणे….
https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2025/05/VID-20250502-WA0018.mp4

या निमित्ताने, या विवाह सोहळ्यास स्वतः उपस्थित राहून वधुवरास आशीर्वाद, शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे तसेच ज्यांना उपस्थित राहता आले नाही, पण ज्यांनी फोन करून, समाज समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या, अशाही सर्वांचे मनःपूर्वक आभार.

पुन्हा एकदा नेहा आणि शेखर यांना सुखी, समृद्ध, आनंदी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

6 COMMENTS

  1. चित्र.सौ. नेहा आणि चि. शेखर ह्यांना विवाहबंधनाच्या निमित्ताने हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा. संपूर्ण भुजबळ आणि शिंदे परिवाराला ह्या शुभ संयोगासाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि अनेक हार्दिक शुभेच्छा 🙏💐

  2. नेहा राणी – शेखर राजा या दोघं उपयतांना लग्न निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा….

    शुभेच्छूक:- श्री गोविंद पाटील सर
    सौ.मनिषा गोविंद पाटील
    नेहरूनगर जळगाव.

  3. खूपच छान विवाह सोहळा झाला ,🌹🌹 या प्रसंगी राजा काका ची आठवण कायम येत होती. ते हवे होते .या वेळी.

  4. नेहा आणि शेखर
    गाठलं सप्तपदीचं शिखर
    लक्ष्मी नारायणाचा सुंदर जोडा पाहून
    आला आनंदाला बहर

    प्रेम विश्वास व परस्पर सामंजस्याने
    दुधात साखर विरघळली
    दोन मने एक झाली
    हृदये हृदयाला भिडली

    दोघे आहेत सुंदर अनुरूप
    जन्मोजन्मीचे जोडीदार
    वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छांसह
    अर्पितो हार्दिक अभिनंदनाचा पुष्पहार

    शुभेच्छूक
    वाणी परिवार दहिसर मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version