Home साहित्य राजमाता माँ जिजाऊ

राजमाता माँ जिजाऊ

1

“राजमाता माँ जिजाऊंना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !”
— संपादक

जिजाऊ माँ जगदंबा राष्ट्राची जननी
धन्य जाहली शिवबास जन्म देऊनी ।।धृ।।

पती राजे होते निजामाचे वीरमणी
भूमिका निभावे आदर्श माता पत्नी
डगमगली ना कधी झुंजार रागिणी ।।1।।

पुत्राचे पाय पाळण्यात राहे ओळखुनी
शिवबाला समजावी स्वधर्म कहाणी
बाळगोपाळांना सांगे गोष्टी मर्दानी ।।2।।

स्वराज्य स्थापावे ध्यास तिचे मनी स्वप्नि
सुराज्य व्हावे शिवबास शिकवणी
जय जय कार करी म्हणे माय भवानी ।।3।।

शिवबा शूर मावळा राहे दुष्टां संहारूनी
प्रजेला सांभाळी सर्व धर्म भावनेनी
जाणता राजा कीर्ती राही संपादूनी ।।4।।

अरुण गांगल

— रचना : अरुण गांगल. कर्जत-रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. सुंदर कविता 👌👌👌🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version