Home साहित्य अहिराणी कविता इंग्रजीत!

अहिराणी कविता इंग्रजीत!

0

जेष्ठ साहित्यीक व लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ. सुधीर रा. देवरे यांच्या  ‘आदिम तालनं संगीत’ या कवितासंग्रहाचा इंग्रजी अनुवाद नुकताच चेन्नई येथील ‘नोशन प्रेस प्रकाशना’ तर्फे प्रसिध्द झाला. या कवितांचा इंग्रजी अनुवाद दिल्ली स्थित प्रा. राजीव कुलकर्णी यांनी केला आहे. याच पुस्तकाचा मराठी अनुवादही सोबत प्रकाशित झाला आहे. या दोन्ही पुस्तकांसह डॉ. सुधीर देवरे यांची आतापर्यंत वीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

“Melodies with a Primitive Rhythm” या नावाने इंग्रजी तर ‘आदिम तालाचं संगीत’ या नावाने मराठी अशी ही पुस्तके प्रकाशित झाली असून मूळ ‘आदिम तालनं संगीत’ हा कविता संग्रह डॉ. गणेश देवी यांनी स्वप्रस्तावनेसह बडोद्याच्या ‘भाषा केंद्रां’तून २००० साली प्रकाशित केला होता.

अल्प परिचय : डॉ. देवरे यांची आतापर्यंत ‘डंख व्यालेलं अवकाश’, ‘आदिम तालनं संगीत’, ‘कला आणि संस्कृती: एक समन्वय’, ‘पंख गळून गेले तरी’, ‘अहिराणी लोकपरंपरा’, ‘अहिराणी गोत’, ‘अहिराणी वट्टा’, अहिराणी लोकसंस्कृती’, ‘अहिराणीच्या निमित्ताने: भाषा’, ‘माणूस जेव्हा देव होतो’, ‘सहज उडत राहिलो’, ‘सांस्कृतिक भारत’, ‘माणसं मरायची रांग’, ‘मी गोष्टीत मावत नाही’, ‘टिंब’, ‘आस्वाद: भावलेल्या कवितांचा’ ‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ आणि ‘सायको’ ही ग्रंथसंपदा प्रकाशित झाली आहे. महाराष्ट्र शासनासह विविध पुरस्कारांनी त्यांना आतापर्यंत गौरविण्यात आले आहे.

लेखन – देवेंद्र भुजबळ.9869484800.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version