उपमुख्यमंत्री कै अजितदादा पवार यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांना वाहिलेली ही आदरांजली. कै अजितदादा पवार यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
अजित जीत जयंती
आठवे दादा आपले
हतबध्द शब्द स्तब्ध
हास्य कुठेतर लोपले
अनेकमोठे संकल्प
काळोघातातथोपले
वाट पाहती प्रकल्प
अल्पआयुष कोपले
रात्रंदिवस कार्यमग्न
सकाळीकसे झोपले
झंझावातकामकाज
कर्तृत्व डोळे दिपले
अमोल मोती हरवून
पोरके झाले शिंपले
संजीवनउपेक्षितांना
कृपामृत तूचं शिंपले
आगळेचंव्यक्तिमत्त्व
जनहितार्थ ते जुंपले
स्पष्ट परखड वक्तव्य
कैक नात्यांस गुंफले
घड्याळकाटे स्थीरवे
काळाने मध्ये रोकले
वेळ वाईट म्हणतात
जनसामान्य रे मुकले
खूपकाही दिले तुम्ही
भल्यांना जे न झेपले
आपले अजीतचरित
किर्ती गंधात व्यापले
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
