Home साहित्य आयुष्य क्षण भंगुर आहे

आयुष्य क्षण भंगुर आहे

0

आयुष्य क्षण भंगुर आहे
मनुष्य किती हतबल आहे
नको करू उद्याची चिंता
हाच क्षण तुझा आहे

कोण काय म्हणेल नको भीती
वेळ कितीसा तुझ्या हाती
नसे जेव्हा अपेक्षांचे ओझे
जगणे होते सहज सोपे

प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा
जीवाचा नुसता आटापिटा
कसला गर्व आणि अहंकार
हो लोकांच्या मनावर स्वार

जप अविस्मरणीय आठवणी
याच तुझ्या शेवटच्या सोबती
खोटे मुखवटे, खोटे देखावे
या सर्वांपासून जपून रहावे

अति चिंतेने होशील त्रस्त
जगून घे जरा मस्त
झुगारून दे वयाचे बंध
अस्तित्वाचा जप सुगंध

दुर्लक्ष कर लोकांचे बोलणे
मैत्रीच्या सानिध्यात रमणे
समाजाचा नको वाहू धाक
जगण्यात नको मोज माप

बागडण्यात कसले दडपण
जप तुझे हेच वेगळेपण
जगण्यातील तुझा वेडेपणा
हेच खरे जीवन

उधळू दे आनंदाचा झरा
निरागस, हसरा भाव खरा
सोडून दे नकोसे विचार
हाच खरा जगण्याचा सार

विसरून सारे अदृश्य घाव
कर आता प्रेमाचा वर्षाव
मोलाचा प्रत्येक श्वास
कर तो एकदम खास

हे आयुष्य पुन्हा नाही
मरण्याची नको करू घाई
हे आयुष्य पुन्हा नाही
मरण्याची नको आता घाई.

रश्मी हेडे

— रचना : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version